- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

प्रेम

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row][vc_column el_class=”mr-yantramanav”][vc_column_text el_class=”mr-yantramanav”]

प्रेम हे सत्याचे प्रकटीकरण आहे. आत्मतत्त्व हे प्रेमाचे उत्पत्तिस्थान आहे. ते विशुद्ध, स्थिर, तेजस्वी, निर्गुण, निराकार, प्राचीन, शाश्वत, अमर आणि अमृतासारखे मधुर आहे. ही प्रेमाचे नऊ गुणविशेषणे आहेत. प्रेम कोणाचाही तिरस्कार करत नाही. सर्वांना एकत्र करते. एकात्म दर्शन प्रेम (प्रेम म्हणजे अद्वैताचा अनुभव)

जर विचार प्रेमाने ओथंबलेले असतील तर आपल्या हृदयात सत्य प्रकट होईल. जर आपल्या कृती प्रेमयुक्त असतील तर प्रत्येक कृतीतून सदाचरण दर्शवले जाईल. जर आपले भाव प्रेमामध्ये भिजलेले असतील तर आपण शांतीचा आनंद घेऊ शकू. आणि जर आपण सर्वव्यापक प्रकृतीमध्ये असलेले प्रेमतत्त्व अनुभवू शकलो, जाणून घेऊ शकलो तर अहिंसा तत्त्व आपल्याला वेढून टाकेल आणि आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये त्याचे अस्तित्व असेल.

म्हणून प्रेम हा सर्व मूल्यांचा अंतर्प्रवाह आहे जो त्यांना दैवी गुण प्रदान करतो. परमेश्वराप्रती प्रेम म्हणजे भक्ती. ह्या विभागामध्ये, पहिल्या कथेचे शीर्षक आहे “प्रार्थना” ह्यामध्ये बालकाची परमेश्वराप्रती भक्ती दिसून येते आणि अंत:करण पूर्वक केलेल्या प्रार्थनेस परमेश्वर कसा प्रतिसाद देतो, उत्तर देतो हे दर्शवले आहे. दयाळूपणा हे प्रेमाचे दुसरे उपमूल्य आहे. दोन कथा भूतदया म्हणजेच प्राण्यांविषयी दया ह्यावर आधारित आहे. ज्यातून अद्वैताचा अनुभव व्यक्त होत आहे.

[/vc_column_text][/vc_column][/vc_row]