- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

रत्ने

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row][vc_column][vc_column_text el_class=”mr-yantramanav”]
  1. तत्त्वज्ञानाविना धर्म, अंधश्रद्धेला जोपासतो. धर्माविना तत्त्वज्ञान, शुष्क नास्तिकतेकडे नेते.
  2. जो तुमचा निंदक आहे त्याचेबद्दल कृतज्ञता असू द्यात. आत्मपरिक्षणाच्या आरशात पहाण्याची आणि आत्मसंयमनाची संधि त्याच्यामुळेच तुम्हाला मिळते. तेव्हा यासाठी त्याच्या सुखाचे चिंतन करा आणि तुम्ही आनंदात रहा!
  3. परमेश्वर आणि तुमची त्याच्यावरची भक्ती यामध्ये, देऊ नका. परमेश्वरावर प्रेम करा. जगाला मग सांगू देत की प्रेम काय ? प्रेम हे तीन प्रकारानी प्रगट होते. पहिल्यात माणसाची मागणी असत पण तो स्वत: मात्र काहीच देत नाही. दुसऱ्या प्रकारचे प्रेम हे उभयपक्षी आदान-प्रदान, याद्वारे व्यक्त होते. तिसऱ्या प्रकारात मानव दुसऱ्यावर निस्वार्थीपणे व निरपेक्ष असे प्रेम करतो.
  4. भगवान बुद्धाने आपल्या सर्वात कट्टर शत्रूंचा सुद्धा उद्धार केला. सतत द्वेष करण्यामुळे, या शत्रूंच्या ध्यानीमनी स्वप्नी बुद्धच होता. बुद्धाचा सतत विचार केल्यामुळे त्याचे मन शुद्ध झाले आणि मक्तीला तयार झाले. म्हणून परमेश्वराचे सदैव स्मरण करण्यामुळे तुम्ही पावन व्हाल.
  5. अडथळे, उत्साहभंग आणि अशक्यता या सर्वांना न जुमानता आपल्या कार्यात टिकून राहण्याच्या वृत्तीमुळे सर्व बाबतीत एखादा जबरदस्त मनुष्य दुर्बलापेक्षा वेगळा उठून दिसतो.
  6. आपण चुकत आहोत असे आढळले तर त्यावेळी एक मोलाच पाळावा. मनुष्याला निष्ठापूर्वक खंबीरपणाने योग्य मार्गावर येण्यासा करू द्या. म्हणजे तो प्रतिदिनी अधिकाधिक योग्य होईल.
  7. मोकळ्या वाऱ्याला फूल जसा त्याचा सुगंध देते, त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा तुमचे प्रेम द्याल, तेव्हा तेथे पूर्णत्व होईल
  8. ज्याप्रमाणे विविध रंगांनी युक्त असे सुंदर फूल गोड सुगंध देते, त्याप्रमाणे गोडव्याने परिपूर्ण असलेला आणि त्याचे आचरण करणारा मनुष्य देतो.
  9. जर तुम्ही स्वर्थातून आपली सुटका करून घेतली असेल तर स्वर्गाची द्वारे तुम्हाला कधीहि बंद राहणार नाहीत.
  10. माझ्या प्रेमाच्या प्रकाशातच मार्ग आक्रमण करा म्हणजे तुम्हाला सावलीचा (दुःखाचा अनुभव येणार नाही)
  11. प्रेम, आदर आणि भक्ति हे सर्व एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालतात.
  12. काही जण आपला आत्मा ईश्वराला देतात. काही जण त्यांचे आयुष्य तर काही त्यांचे कार्य तर काही जण त्यांचे धन ईश्वराला देतात. आपल्याजवळ असलेल्या या सर्व गोष्टी म्हणजे आत्मा, आयुष्य, काम आणि धन आहेत. फारच थोडे देतात. पण तीच खऱ्या अर्थानि ईश्वराची मुले आहोत.
  13. तुमच्यामधील सर्वात चांगली गोष्ट बाहेर आणण्यातच खरे शिक्षण आहे. मानवतेच्या ग्रंथाखेरीज दुसरा चांगला ग्रंथ कोणता असू शकेल.
  14. आपल्या प्रार्थनांमधुन ‘ईश्वर हा सर्वांचा पिता आहे’ असे मानले आणि आपल्या प्रत्यक्ष दैनंदिन व्यवहारात मात्र प्रत्येकाशी आपण बंधुत्वाची वागणूक ठेवली नाही तर नुसत्या प्रार्थनांचा तरी काय उपयोग?
  15. प्रार्थनेशिवाय कृती म्हणजे केवळ आंधळेपणाने चाचपडणे होय. प्रार्थनेमुळे कृती ही प्रामाणिक आणि परिणामकारक होते.
  16. शिक्षण हे परिपूर्ण होण्यासाठी मानवतायुक्त असले पाहिजे. त्यात केवळ बुध्दीच्या प्रशिक्षणाचा अंतर्भाव नको. हृदयाची अभिजातता आणि आत्मसंयम यांचाही समावेश असावा.
  17. फळांच्या भाराने वृक्ष नम्र होतात, नवीन पाण्याने भरलेले मेघ खा लोंबू लागतात, उदात्त लोक वैभवाने गर्विष्ठ होत नाहीत, परोपक लोकांचा हा नैसर्गिक गुणच असतो.
[/vc_column_text][/vc_column][/vc_row]