- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

ज्ञानमौक्तिके

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row][vc_column el_class=”mr-yantramanav”][vc_column_text el_class=”mr-yantramanav”]
जीभ

इंद्रियनिग्रहाशिवाय साधना व्यर्थ आहे; ते गळक्या भांड्यात पाणी ठेवण्यासारखे आहे. सगळ्या इंद्रियांमध्ये प्रथम जर जीभ जिंकली तर विजय तुमचाच आहे जर जिभेला कुठल्या तरी भिष्टान्नाची तीव्र इच्छा झाली तर तिला ठणकावून सांगा की तुम्ही तिच्या लहरी पुरवणार नाही. या देशातील गोसावी आणि मठाधिकारी जिभेला बळी पडले आहेत आणि तिच्या लहरी आवरण्यास असमर्थ आहेत. ते त्यागनिदर्शक वस्त्रे परिधान करतात पण चविष्ट पदार्थांसाठी गलका करतात आणि अशा तऱ्हेने संन्यस्त अवस्थेला काळिमा लावतात. तुम्ही सतत मसालेदार किंवा तिखट नसेलेले पण पुरेसे पोषक असे साधे अन्न खात राहिलात तर थोडे दिवस जीभ चुळबुळ करील पण लवकरच ती त्याचा आनंदाने स्वीकार करू लागेल. जिभेने तुमच्यावर स्वामित्व गाजवले तर होणाऱ्या दुष्परिणामांवर मात करण्याचा व जिभेला कह्यात आणण्याचा हाच एक मार्ग आहे. तसेच खोट्या कुटाळक्या व वायफळ बडबड करण्याचा आग्रह असल्याने तिची तीही प्रवृत्ती तुम्हाला ताब्यात ठेवायला हवी. थोडे बोला, गोडव्याने बोला, अत्यंत गरज असेल तेव्हाच बोला, ज्यांच्याशी बोलणे आवश्यक आहे. त्यांच्याशीच बोला, ओरडू नका किंवा रागाने अथवा शांतीतही आवाज चढवू नका, त्याची परिणती सार्वजनिक संबंध बरे होण्यात आणि इतर असलेले संबंध व संघर्ष यांतील गुंतागुंत कमी होण्यात होईल. दुसऱ्याच्या आनंदावर विरजण घालणारा मनुष्य म्हणून तुमचा उपहास होईल परंतु त्याची पुरेशी भरपाई होणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुमचा वेळ व बळ वाचेल, तुमचे आंतरिक सामर्थ्य तुम्ही अधिक चांगल्या तऱ्हेने वापरू शकाल. तुम्ही माझा संदेश घ्या ‘तुमची जीभ आवरा. खाणे व बोलणे ताब्यात ठेवा.’

चार ‘एफ’

तुम्ही तुमची अंतस्थ जाणीव प्रबल आणि दृढ करायला हवी. तुमचा तुमच्यावर विश्वास असायला हवा. तुमची अंतस्थ जाणीव तुमचा मार्गदर्शक आहे आणि तुमच्या चांगल्या वाईट वर्तनावर तिची सत्ता असायला हवी. तुमची अंतस्थ जाणीव त्यास जबाबदार आहे. अपराधीत्वाच्या भावनेस वाईट वर्तन तर तुमच्यामधील बल आणि आत्मविश्वासास सद्वर्तन कारणीभूत आहे, म्हणून पहिल्या प्रथम, ज्या गोष्टी तुमच्या आत्मविश्वसास बढावा देतील त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत आणि म्हणून मी काही प्रसंगी तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही चार ‘एफ’ चे अनुसरण केले पाहिजे. तुमच्या आंतरिक जाणिवेचे म्हणजेच तुमच्या स्वामींचे (गुरुंचे)अनुसरण करा. दुसरी गोष्ट, दुष्ट दुर्जनांचा म्हणजेच जे वाईट आहे, विसंगत आहे त्यांचा सामना करा. तिसरी गोष्ट, शेवटपर्यंत लढा द्या. आणि नंतर खेळाचा शेवट करा. हे चार आदेश तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत आणि सतत त्यांचे स्मरण केले पाहिजे.

डॉ. झाकिर हुसैन ह्यांनी पुस्तके/ग्रंथ ह्याबद्दल व्यक्त केलेले विचार.

२0. डॉ. झाकिर हुसैन ह्यांनी पुस्तके/ग्रंथ ह्याबद्दल व्यक्त केलेले विचार.’आजकालच्या दिवसात ग्रंथांचा संग्रह म्हणजेच खरे विद्यापीठ होय’ असे म्हटले आहे. ग्रंथ आपल्याला जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देतात आणि जीवन कसे जगावे हे शिकवतात. ते दुःखितांचे दुःख हलके करतात.

ग्रंथांतील मार्गदर्शक साहित्यामुळे दुःखी कष्टी लोकांना दिलासा मिळतो. त्याचबरोबर दुराग्रही, हट्टी आणि आडमुठ्याला शिक्षा मिळेल असा संदेश दिला जातो. ग्रंथांमुळे मूर्ख लोकांना ईशारेवजा ताकीद दिली जाते तर ज्ञानी आणि समंजस व्यक्तीच्या विचारांना पुष्टी मिळते.

जेव्हा आपण अगदी एकाकी असतो तेव्हा हे ग्रंथ आपल्याला आधार देतात. बाह्य जगात वावरताना व्यक्ती आणि वस्तू (विषय) ह्याविषयी आपल्या मनात आसक्ती असते. ह्या गोष्टी आपल्या मनात बळजबरीने घुसू लागतात आणि आपल्या मनात घर करुन राहतात. हे टाळण्यासाठी वा त्याचे विस्मरण होण्यासाठी ग्रंथ आपल्याला सहाय्य करतात. मनातील चिंता काळज्या मिटवतात. विविध मनोविकार (ज्यामध्ये क्रोध, प्रेम, आसक्ती, अभिलाषा असते) व त्यामधून होणारा अपेक्षाभंग व नंतर येणारे नैराश्य, वैफल्य ह्यांना घालवून स्वस्थचित्त, समतोल वृत्ती देण्याचे काम हे ग्रंथ करतात. ग्रंथामुळेच काही जाणून, बुद्धी आणि आत्मा ह्यांच्यामध्ये नवचैतन्य संचारते. मनाच्या गाभाऱ्यातून उसळणाऱ्या विचारधारांना चिंतनशीलतेची जोड मिळते व तृषार्त मनाची तहान शमवली जाते.

ग्रंथ आपल्याला जीवनभर सोबत करतात, अत्यंत सभ्य, अद्भुत आणि प्रामाणिक असा हा सोबती, सदासर्वकाळ आपल्या मनाच्या कोणत्याही अवस्थेत आपल्यासाठी उपलब्ध असतो. आपण त्याला बोलायला लावल्याशिवाय तो स्वतःहुन कधीही बोलत नाही . ग्रंथ सदैव तुमच्या संपर्काची प्रतिक्षा करु शकतात. जो कोणी काही जाणून घेण्यासाठी येतो,त्याला सर्वोत्तम देऊन सहाय्य करण्यासाठी ग्रंथ सदैव तत्पर असतात. ते तुम्हाला मार्गदर्शनपर सूचना देतात, प्रोत्साहन देतात, चेतावणी देतात. एखाद्याने केलेल्या निरर्थक प्रश्नानी ते कधीही संतप्त होत नाहीत. केवळ श्वास रोखून स्मितहास्य करतात. ग्रंथ हा एक अद्भुत सोबती आहे. एकाकी लोकांसाठी तो एक जीवाभावाचा सोबती आहे. तर ज्यांना शिकण्याची तळमळ आहे त्यांच्यासाठी तो उत्तम शिक्षक आहे आणि आनंदाचा निखळ स्त्रोत आहे.

देशप्रेम

इतकी तपस्या केल्यानंतर मला समजले आहे की, परम सत्य असे आहे ते सर्व प्राणिमात्रात वसत आहे. हे सगळे त्याचे विविध आकार आहेत. शोध घ्यायला दुसरा कोणी देव नाही. जो सर्वांची सेवा करतो तोच फक्त देवाची आराधना करीत असतो. आगामी कित्येक वर्षांत वंश हाच देव फक्त जागा आहे त्याचे हात सगळीकडे आहेत, त्याचे पाय इतर सर्व अनावश्यक देव आमच्या मनातून लुप्त होवोत. आपला स्वतःचा सगळीकडे आहेत, त्याचे कान सगळीकडे आहेत. इतर सगळे देव झोपलेले आहेत. मग सर्वात प्रथम विराटची पूजा, जे आपल्याभोवती आहेत त्यांची पूजा! माणसे आणि जनावरे हे आपले देव आहेत आणि अग्रपूजेचा मान आपल्या देशबांधवांचा आहे.

स्वामी विवेकानंद

देशभक्ती

“तुम्हाला देशभक्त व्हायचे आहे का?” ते विचारतात आणि उत्तरही देतात. तुम्ही तुमच्या देशाशी आणि देशबांधवांशी प्रेमाचे सूर जुळवा. त्यांच्याशी एकत्व असल्याची भावना जाणवू द्या. तुमच्या आत्ताच्या व्यक्तिमत्त्वाची सावली देखील एक पातळ काचेची भिंत म्हणून तुम्ही आणि तुमचे देशबांधव यांच्यामध्ये येऊ देऊ नका. या भूमीच्या हितासाठी स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचे बलिदान देऊन खरा योद्धा बना. छोट्या, क्षुद्र अहंकाराचा त्याग करून तुम्हीच संपूर्ण देश बना आणि देशाच्या भावना देशबांधवांबरोबर जाणा. चला तर मग… कूच करा… तुमचा देश येईलच मागोमाग! चांगल्या आरोग्याचा भाव ठेवला तर तुमच्या देशबांधवांचे आरोग्य चांगले राहील. तुमची ऊर्जा त्यांच्या नसांमध्ये सळसळेल

मला असे वाटू दे की मी हिंदुस्थान आहे, सारा भारत मीच आहे. आहे. कन्याकुमारी ही ,माझी पावले व हिमालय माझे मस्तक आहे. माझ्या केसातून गंगा वाहते, माझ्या डोक्यातून ब्रह्मपुत्रा व सिंधु उगम पावतात, विंध्य हा माझा कंबरपट्टा आहे. कारोमांडेल किनारा हा माझा उजवा पाय व मलबार किनारा हा डावा पाय आहे. मी संपूर्ण हिंदुस्थान आहे. त्याची पूर्व व पश्चिम हे माझे हात आहेत. साऱ्या मानवजातीला आलिंगन देण्यासाठी मी ते सरळ रेषेत पसरतो. माझे प्रेम सर्वव्यापी आहे.माझा अंतरात्मा हा सर्वांचा आत्मा आहे.जेव्हा मी चालतो तेव्हा भारत चालत आहे असे मला वाटते, मी श्वास घेतो तेव्हा हिंदुस्थान श्वास घेतो आहे असे मला वाटते आणि बोलतो तेव्हा भारत बोलत आहे असे वाटते. मी हिंदुस्थान आहे, मी शंकर आहे, मी शिव आहे हा देशभक्तीचा उच्चतम साक्षात्कार आहे आणि व्यवहारातील वेदांत आहे.

स्वामी विवेकानंद

जर तुम्ही परनिंदा करण्यात जीवन व्यतीत करत असाल
तर तुम्ही सतत दुसऱ्यांचा धिक्कार करण्यास शिकाल.
जर तुम्ही शत्रुत्व करत जीवन व्यतीत कराल
तर तुम्ही लढणे झगडणे शिकता. तुमच्यामध्ये सबूरी येते.
जर तुम्ही इतरांची टर उडवण्यात जीवन व्यतीत करत असाल
तर तुमच्यामध्ये न्यूनगंड येतो.
जर तुम्ही लज्जास्पद जीवन जगत असाल
तर तुमच्यामध्ये अपराधित्वाची भावना येते.
जर तुम्ही सहिष्णुतेने जीवन जगत असाल
तर तुमच्यामध्ये सबूरी येते.
जर तुमच्या जीवनात प्रोत्साहित वातावरण असेल
तर तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त होतो.
जर तुम्हाला तुमच्या जीवनात कौतुकाचे चार शब्द मिळाले
तर तुम्ही इतरांची प्रशंसा करायला शिकता.
जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये निष्पक्षता लाभली
तर तुम्ही इतरांना न्याय द्यायला शिकता.
जर तुम्हाला जीवनामध्ये सुरक्षितता लाभली
तर तुम्ही श्रद्धा ठेवायला शिकता.
जर तुम्हाला जीवनामध्ये मान्यता लाभली
तर तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता.
जर तुमच्या जीवनामध्ये स्वीकृती आणि मित्रता असेल
तर तुम्ही जगामध्ये प्रेम शोधायला शिकता.

[/vc_column_text][/vc_column][/vc_row]