- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

ज्ञान मौक्तीके

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row][vc_column][vc_column_text el_class=”mr-yantramanav”]
परमेश्वर कोण आहे?

एकदा तुम्ही याचा शोध घेतलात की तुम्ही कोण आहात ते कळेल, मग तुम्हाला परमेश्वर कोण आहे हे जाणून घेण्याची गरज नाही कारण दोघंही एकच आहेत.

तुम्ही दिव्य बनू शकता , माझ्याकडे असे काही नाही जे तुमच्याकडे नाही. ते तुमच्यामध्ये सुप्त अवस्थेत आहे एवढाच काय तो फरक आहे.

स्वर्ग म्हणजे अलौकिक चिरंतन वसंत ऋतू नव्हे तर तो एक आंतरिक अनुभव आहे

देह वाकवा ,इंद्रिये वळवा,मनोनाश करा अमृतत्वाकडे जाण्याचा हाच मार्ग आहे.

श्री सत्य साई बाबा

सर्व जण ही एकाच माता पित्याची मुले आहेत म्हणून एकामेकावर दोषारोप न करता ,आपल्याच जवळच्यांविषयी वाईट न चिंतता हे समजून घ्या की तुमच्या इतर भावंडांना ही जे आवडते , त्याविषयी आसक्ती आहे,जशी तुम्हाला तुमच्या आवडत्या वस्तू विषयी आहे, दुसऱ्याला जे आवडते त्यामध्ये दोष शोधू नये वा त्याबद्दल उपहासाने हसू नये याउलट ते आवडण्याचा प्रयत्न करावा ,हे भारतीयांच्या सत्याचे वैशिष्ट्य आहे.

स्वार्थीपणा

धैर्य : विनयशीलता आणि सहनशीलता हे दोन गुण मानवासाठी अत्यंत अनिवार्य आहेत. दुदैवाने आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्वार्थीपणा दिसून येतो.आणि आज आपण समाजात जे कार्य करतो त्याचा स्वार्थ हाच प्रामाणिक हेतू बनतो.ज्या दिवशी आपण आपल्या हृदयातून स्वार्थरुपी राक्षसाचे उच्चाटन करू केवळ तेव्हाच समाजास आणि समाजामध्ये असणाऱ्या आपणास काही प्रमाणात आनंद मिळेल.त्यानुसार कर आपल्याला हा स्वार्थ काढून टाकायचा असेल,आपल्या मनातून दूर करायचा असेल तर चार अडथळे येतात.

  1. निष्काळजीपणा
  2. श्रध्देचा अभाव
  3. अहंकार आणि
  4. असूया

ह्या चार गोष्टीचे आपल्या मनातून उच्चाटन केले पाहिजे.

प्रत्येक चांगल्या वृक्षाला चांगली फळे लागतात. परंतु दूषित किडक्या वृक्षाला वाईट किडकी फळे लागतात.
चांगल्या वृक्षास वाईट फळे लागत नाही तसेच कीडक्या वृक्षास चांगली फळे लागत नाही. प्रत्येक वृक्ष ज्यास चांगली फळे लागत नाही तो कापून टाकल्या जातो व अग्निमध्ये फेकण्यात येतो म्हणून वृक्षाच्या फळावरून आपण वृक्षास जाळू शकतो.

जीझस ख्राईस्ट

स्त्रियांना पूज्य माना

स्त्रियांना नेहमी पूज्य मानावे. त्यांच्याशी प्रेमाने वागावे. ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते तेथे देवता संतुष्ट होतात असे म्हणतात.

ज्या ठिकाणी स्त्रियांना पूज्य मानले जात नाही तेथे सर्व प्रयत्न निष्फळ होतात. जर कुटुंबातील स्त्री मिळालेल्या वागणुकीने दुःखी होत असेल, रडत असेल तर कुटुंब लवकरच विनाश पावेल.

स्त्रिया या समृद्धीच्या देवता आहेत. ज्या माणसाला समृद्धी हवी असेल त्याने घरातील स्त्रीचा आदर करावा. स्त्रियांना आनंदित ठेवून प्रत्येकजण समृद्धीच्या देवतेला आनंदित ठेवू शकतो आणि तिला त्रास देणे म्हणजे समृद्धीच्या देवतेला त्रास देण्यासारखे आहे. तारखे आहे.

मनु, भारतीय कायद्याचा निर्माता

सीता

ख्रिश्चन धर्मीयांना जशी मोदेना तशी हिंदू धर्मीयांना अयोध्येची राणी सीता. कारण ती स्त्रीत्वाचा आदर्श आहे आणि तिने लाखो भारतीयांच्या हृदयातील प्रेमाच्या व दुःखाच्या अकलंकित स्त्रीत्वाचा सन्मान व अभिमान यांच्या राज्यांवर अविचल असे प्रभुत्व मिळविलेले आहे. ती जरी सुंदर राणी होती तरीसुद्धा तिने कधी आराम स्वीकारला नाही. तिच्या दृष्टीने साधुपुरुष आणि विद्वानांची जीवने अधिक आनंददायक असत. दरबाराच्या सुखसोयी त्या तुलनेत तिला तुच्छ वाटत. तिला वनातील प्रत्येक स्थितीचे ज्ञान होते. ज्यावेळी पक्षी जागे होत, कळ्या उमलत आणि दव पडलेले असे त्यावेळी त्यांच्या प्रभुप्रशंसेत ती सामील होई आणि संध्याकाळी तिचा माथा सर्वांबरोबर सायंवंदनात झुकत असे. तिने राजसिंहासन स्वीकारले परंतु ती कधीही विसरली नाही की स्वत:च्या सुखासाठी नव्हे तर प्रजेच्या हितासाठी सार्वभौम राजे राज्य करतात. तिने अत्यंत वाईट आणि दुःखाचा अनुभव घेतला होता. ती दुःखात ही अत्यंत शांत होती. अशी होती अयोध्येची राणी सीता, तिने प्रेमाचा मुकुट घातला होता ज्याला दुःखाची झालर (आवरण) होती आणि स्त्रियांमध्ये अद्वितीय होती.

भगिनी निवेदिता

दैवी माता

वासना, क्रोध आणि भय या मनाला अपवित्र करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मनात पाप विचार निर्माण होतात. या गोष्टींनी मन दूषित बनते.

ही सर्वसामान्य गोष्ट आहे की ज्यावेळी माणूस त्याच्या आईच्या सहवासात असतो त्यावेळी त्याच्या मनात पापविचार उत्पन्न होत नाहीत. जी गोष्ट आपल्या दैहिक मातेबद्दल सत्य आहे तीच आपल्या दैवी मातेबद्दल सत्य आहे.

पाण्यामुळे माणसाची शरीरे स्वच्छ होतात तशी मने ध्यानतीर्थात न्हाऊन दैवीमातेच्या पवित्र ध्यानाच्या पाण्यात बुडी मारुन स्वच्छ होतात.

जगतगुरु श्री शंकराचार्य कांची

[/vc_column_text][/vc_column][/vc_row]