गुरु

पहिली वर्षे चिरकाल टिकणारी असतात.

हा काळ कृती करण्याचा व घडवण्याचा आहे. “लवकर निघा ,सावकाश हाका व सुरक्षित पोहचा ” हे आपल्या स्वामींचे दिव्य वचन आहे. ह्याच दृष्टिकोनातून मुले वयाच्या सहाव्या वयात (लहान वयात) ह्या कार्यक्रमात प्रवेश घेतात. जर लहान वयात मानवी उत्कृष्टतेचे बीज बोवले तर त्याला मूल्यांची मुळे फुटतात व ती जीवनभर त्यांच्या लक्षात राहतात व त्यांचे अनुसरण केले जाते. ह्या वयात मुलांना काहीतरी करायचे असते बनवायचे असते म्हणून बालविकास गुरु तोंडी सांगण्यापेक्षा चित्रांद्वारे ,प्रात्यक्षिके , खेळ ,तक्ते , सामूहिक कृती ,रोल प्ले (नाटिका ) मनोवृत्तीची चाचणी ह्या गोष्टींवर जास्त भर देतात

Coming soon...

गट २ (९ ते १२ वयोगट)

ही अवस्था कार्य करण्याची व योजना आखण्याची आहे. ग्रूप १ मध्ये जी पायाभरणी केलेली असते ती आता आकारास येऊ लागते ह्या अवस्थेत विद्यार्थी केवळ कथा, गीते ,सामूहिक खेळ ह्याने खुश नसतात तर त्यांना त्यांच्या कांचना व जिज्ञासापुर्ती ह्याहून अधिक काही हवे असते, त्यांना विचारांसाठी खाद्य हवे असते , मुलांना मनावर विजय, इन्द्रियावर नियंत्रण, तसेच ५ डी चा विकास करण्यासाठी ५ तंत्रे वापरली जातात. अशा तऱ्हेने उच्चार व आचार ह्यामधील एकसूत्रतेचा पाया घातला जातो. ग्रुप २च्या पातळीवर मुलांना ज्यामध्ये रस आहे व ज्याची आवड आहे ती जिवंत ठेवण्यावर गुरूंचा विशेष भर असतो

Coming soon...

ग्रुप ३ ( १२ ते १५ वयोगट )

हे, योजना बनवण्याचे व प्राप्त करण्याचे वय आहे. ह्या वयात जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितीत मूल्यांचा वापर करण्यास सुरुवात होते ह्या अवस्थेत विद्यार्थ्यांना ते जे शिकले आहेत त्याचा सराव करण्याची व त्याची चाचणी देण्याची इच्छा असते म्हणून गुरु , त्यांनी वर्गामध्ये,कैंपसमध्ये वा संघटनेच्या प्रकल्प कार्याद्वारे वा अभ्यासवर्गाद्वारे शिकून जे आत्मसात केले आहे, त्याचा सराव करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देतात . ग्रुप ३ च्या वर्गात आल्यानंतर त्यांना गुरुचे स्थान आई व शिक्षक ह्याच्याहून महत्त्वाचे वाटते. गुरु त्यांच्या जीवनात मैत्रीण ,त्यांची गुपिते सांगू शकतील अशी जिवलग सखी वा त्यांच्या मनातील गरजा ओळखून असणारी,अशा विविध भूमिका करते