आढावा

श्री सत्यसाई बालविकास म्हणजे “मानवी उत्कृष्टतेचे विकसन”. मुलांच्या अध्यात्मिक गरजांच्या पूर्तीसाठी , मुलांच्या चारित्र्याची जडणगडन करण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तसेच मुलांना भारताच्या समृद्ध संस्कृतीचा व मानव जातीचे ऐक्य जाणणाऱ्या आध्यात्मिकवर्षाचा परिचय करून देण्यासाठी, भगवान श्री सत्यसाई बाबांनी, मुलांच्या पालकांना घातलेल्या सादेस प्रतिसाद म्हणून भारतामध्ये बालविकास सुरु झाला.

भगवान श्री सत्य साई बाबांनी, सक्रिय नैतिक जीवनासाठी, व्यक्तिगत बांधिलकीचे विश्वव्यापक नूतनीकरण करण्याच्या हेतूने श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रमाची स्थापना केली. अंतिम ध्येय डोळ्यापुढे ठेवून, प्रत्येक बालविकास वर्गासाठी आठवड्यातून एक तासाचे वेळपत्रक बनवण्यात अली व शिकवण्याच्या काही सध्या, सोप्या परंतु प्रभावी तंत्राचा अंगीकार केला म्हणजे,

प्रार्थना
समूह गायन
स्तब्ध बैठक
कथा कथन
सामूहिक उपक्रम

अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य

 • ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी ३ टप्प्यांमध्ये विभागलेला ९ वर्षांचा रचनात्मक कार्यक्रम
 • सत्य , धर्म , शांती , प्रेम आणि अहिंसा ही मूलभूत मानवी मूल्ये शिकावीत व आचरणात आणावीत ह्या उद्धेशाने कार्यक्रमाची रूपरेखा तयार केली आहे

अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्धे

ग्रुप १ – ५ ते ९ वर्ष वयोगट

 • विविध देवदेवतांचे सोपे श्लोक
 • मूल्याधिष्टीत कथा
 • नामावली भजने / मूल्याधिष्टीत गीते
 • भगवान श्री सत्य साई बाबांच्या जीवनाचा परिचय

अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य

 • वर्गामध्ये पोशाखाची शिस्त पाळली जाते तसेच मुले आणि मुली ह्यांच्यासाठी वर्गामध्ये वेगळी बैठक व्यवस्था असते.
 • वर्गाबाहेर पादत्राणांसाठी व्यवस्था
 • ह्या शिस्तीचे इतर ठिकाणीही पालन केले जाते. उदा. घरी / इतर वर्गांमध्ये इ.
 • पालकांविषयी आदरभाव आणि दिवसभर प्रार्थनाच्याद्वारे (प्रातःकाळी , जेवणाअगोदर व रात्री) परमेश्वराचे स्मरण
 • सर्वांबरोबर वाटून घेणे व सर्वांविषयी आस्था हि मूल्ये ग्रहण करतात व केवळ परमेश्वर आपला खरा मित्र आहे असे मानतात

गट २ : ९ ते १२ वयोगट (२ आकडी वय ज्ञानसंपन्नतेचे वय )

 • विविध देवदेवतांचे सोपे श्लोक
 • रामायण आणि महाभारत ह्यामधील कथाभाग निवडणे नामवली भजने / मूल्याधिष्ठित गीते
 • संतमहात्मे ,महापुरुषांच्या कथा आणि सर्वधर्म एकटा
 • भगवान श्री सत्य साई बाबांचे जीवन आणि शिकवण

श्री सत्य साई बालविकास गट २ पूर्ण झाल्यावर

 • दैनंदिन जीवनात भगवद गीतेची शिकवण आचरणात आणणे . इतर धर्मातील महत्वपूर्ण मुद्धे व आचार पद्धती समजून घेऊन त्याची प्रशंसा करणे. सर्व उत्सव साजरे करणे
 • आपल्यामधील अंतरात्म्याचा आवाज ऐकण्यास शिकणे आणि योग्य व अयोग्य ह्यामधील भेद जाणणे
 • ५ ‘D’ च्या भूमिकेचा परिचय १) भक्ती (Devotion) २) विवेक (Discrimination ) ३) शिस्त (Discipline ) ४) दृढ निश्चय (Determination ) ५) दैनंदिन जीवनातील कर्तव्ये (Duty)
 • Accepting God as a mentor and Guru who is always watching us and guiding usआपले सदैव अवलोकन करणाऱ्या व मार्गदर्शन करणाऱ्या परमेश्वराचा गुरु आणि सल्लागार म्हणून स्वीकार करणे

ग्रुप ३ – १२ ते १५ वयोगट पौगंडावस्था – पेशवे वय

 • भजगोविंदम आणि भगवद गीता ह्यामधील निवडक श्लोक
 • रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद ह्यांच्यासारख्या महापुरुषांचे जीवन चरित्र
 • भजने / मूल्याधिष्ठित गीते आणि भारतीय संस्कृती आणि अध्यात्म
 • श्री सत्य साई सेवा संघटनेच्या मानवहितकारी कार्याचा प्रत्यक्ष अनुभवाचा परिचय

श्री सत्य साई बालविकास गट ३ पूर्ण झाल्यावर

 • भोवताली असणाऱ्या प्रत्येकामध्ये व प्रत्येक गोष्टीमध्ये दिव्यत्व पाहण्यास शिकणे आणि मानवी जीवनाचे सार व उद्देश ह्याचे आत्मनिरीक्षण करणे (भजगोविंदम मधील श्लोकांचा व्यवहारात वापर )
 • जीवनामध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पद्धतींचा अंगीकार करा (भगवद गीतेच्या श्लोकानुसार आचरण )
 • देशभक्ती आणि मातृभूमी प्रति असलेल्या प्रेमातून सामाजिक सेवेमध्ये सहभागी झाल्याने नैतिक व सामाजिक बांधिलकीची जाण विकसित होईल
 • आपल्या देशात विभिन्न , रूढी , परंपरा आहेत . तसेच विभिन्न सांस्कृतिक चालीरिती आहेत. विविधतेतील एकात्मतेचा व दिव्यत्वाचा मुख्य गाभा ओळखुन त्यानुसार इच्छांवर नियंत्रण आचरणात आणले पाहिजे.
 • विचार, श्वास , काल आणि शाळा , घर व समाजामध्ये योग्य तऱ्हेने कर्तव्य पालन , ह्यांच्या सुव्यवस्थापनाद्वारे त्यांच्या व्यक्तित्वाची जडणगडन करण्यासाठी आवश्यक ती कौशले वर्धित करणे
 • चांगल्या प्रकारे समस्या सोडवण्याचे, तसेच व्यवस्थापन / नेतृत्व इ. कौशले विकसित करणे. ‘ जीवन खेळ आहे , तो खेळा ‘आणि ‘ जीवन एक आव्हान आहे त्याला सामोरे जा ‘ ह्याचा खरा आशय समजून घेणे

वरील ठळक मुद्धे म्हणजे ह्या रचनात्मक दिव्या कार्यक्रमाच्या प्रत्येक स्तरावर, मुलांमध्ये अपेक्षित असणाऱ्या परिवर्तनाचे फक्त काही महत्वाचे मुद्धे आहेत. त्याची परिपूर्ण यादी नव्हे. म्हणून प्रत्येक मुलामध्ये मानवी मूल्यांचा विकास करणे, मूल्यांचे दैनंदिन जीवनात अनुसरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा विकास करणे व त्यायोगे, व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय अशा विविध स्तरांवर ताळमेळ साधण्यास हातभार लावणे हे श्री सत्यसाई बालविकासचे व्यापक उध्दीस्ट आहे.

मानवी मूल्यांच्या विकासावर यथोचित भर न देता केवळ ज्ञानास विखासर्हता दिली गेली हे आजच्या समाजातील बहुतांश समस्यांचे मूळ आहे. अशा दुर्दैवी नवीन प्रथांचा जगामधील तरुणांवर होणार परिणाम कमी कारवाईचा श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रम शोध घेत आहे. श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रमात ‘पालकत्व’ अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहे. श्री सत्यसाई पालकत्व कार्यक्रम, प्रसारमाध्याने व उपभोक्तावादाच्या दुष्परिणामांमुळे मुलांना तोंड द्यावे लागणाऱ्या आव्हानाविषयी पालकांना जागरूक बनवतो आणि मानवी मूल्यशिक्षणाचे तज्ज्ञ म्हणून त्यांच्या भूमिकेवर विशेष भर देतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, पालकांकडून खाली दिलेल्या मुद्यांवर किमान आवश्यक वचनबद्धता अत्यंत जरुरीची आहे.

श्री सत्य साई बालविकास कार्यक्रमात पालकांची भूमिका

 • ह्या नऊ वर्षीय रचनात्मक कार्यक्रमासाठी पूर्णपणे वचनबद्ध
 • दर साप्ताहिक वर्गासाठी त्यांच्या मुलांचा नियमित सक्रिय सहभाग असेल ह्याची खबरदारी घेणे
 • मूल्याधिष्ठित बालविकास कार्यक्रमा विषयी पूर्ण श्रद्धा हवी.
 • त्या मूल्यांचे घरांमध्येही अनुसरण करण्यास भाग पडावे व त्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करने
 • ह्या पूर्णपणे विनामूल्य सेवेची उदात्तता समजून घेणे
 • ठराविक कालावधीने अभिप्राय
 • मुलांच्या प्रागितिची चर्चा करण्यासाठी पालक संपर्क कार्यक्रमात सहभाग
 • कौटुंबिक नातीसंबंधसुधारण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी पालकत्व कार्यक्रमात सहभाग

समग्र व एकात्मिक व्यक्तिमत्व विकास

अशा तऱ्हेने श्री सत्य साई बालविकास कार्यक्रमाद्वारे मुलांचा खात्रीने सर्वांगीण विकास होतो
 • शारीरिक
 • बौद्धीक
 • भावनिक
 • मानसिक व
 • अध्यात्मिक

बहुआयामी पैलू असलेला श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रम, प्रत्येक बालक, विध्यार्थी, तरुण ह्यांच्यामधील मानवी उत्कृष्टता बाहेर काढण्याची तसेच त्यांच्यातील प्रत्येक जण दिव्यत्व आहे ह्याच्या बोध करून देण्याची व त्यांच्यातील मानवी मूल्ये बाहेर काढून,दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी प्रवृत्त करण्याची खात्री देतो. श्री सत्यसाई आत्मोद्भव शिक्षणाच्या तत्वज्ञानाद्वारे भगवान बाबांनी दिलेला हा संदेश आहे.

समग्र व एकात्मिक व्यक्तिमत्व विकास

त्याच बरोबर आपल्या मुलांना जीवनातील सर्व आव्हाने पेलण्यासाठी , आत्मविश्वास प्राप्त करण्यास आपण एकत्रित सहाय्य करूया त्याचबरोबर आपल्या मुलांना त्यांच्या अंतरात्माचा आवाज ऐकण्यासाठी व सदैव योग्य मार्गावर वाटचाल करण्यासाठी आपण त्यांना एकत्रितपणे सहाय्य करूया त्याचबरोबर आपल्या मुलांचे व्यक्तीमत्व धडाडीचे , आत्मविस्वासपूर्ण , सर्जनशील व आनंदी बनावे ह्यासाठी आपण त्यांना एकत्रितपणे सहाय्य करू या. त्याचबरोबर , आपण आपल्या मुलांना कुटुंब , समाज व देशासाठी सेवा करण्यास सहाय्य करू या त्याचबरोबर आपण आपल्या मुलांना भारताचे सुजाण नागरिक बनवू या.

Download WordPress Themes
Download WordPress Themes
Download Nulled WordPress Themes
Download WordPress Themes
lynda course free download
download mobile firmware
Download Premium WordPress Themes Free
udemy free download