सूर्य
सूर्य
मुलांनो! ताठ बसा! श्वास घ्या आणि हळुवारपणे श्वास बाहेर सोडा. डोळे बंद करा. आता अशी कल्पना करा की तुम्ही एका सहलीला जायची तयारी करताय. भगवान सूर्य देवाला भेटायला जायची सहल!! सूर्य म्हणजे अग्नीचा प्रचंड गोळा. त्याच्यामध्ये लाल, केशरी, आणि पिवळा असे रंग असतात. आपण जसजसे सूर्याच्या जवळ जाऊ तसतशी त्याची उष्णता आपल्याला जाणवते. सूर्याच्या जास्त जवळ जाणं सोपं नाही.
सूर्य आपल्याला उष्णता आणि प्रकाश देतो. तो सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो. यातून तो आपल्याला शिस्त शिकवतो. केवळ सूर्यामुळेच पृथ्वीवरील जीवन शक्य आहे. सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती आपले अन्न तयार करतात.
सूर्य पृथ्वीवरील सर्वांना समानतेने वागवितो. तो नि:स्वार्थी आहे आणि तो नेहमी देतच असतो. आपणही नि:स्वार्थी असले पाहिजे आणि प्रत्येकाला प्रेमाने, आस्थेने आणि समानतेने वागविले पाहिजे.
आपल्याला सूर्य भ्रमण करताना दिसतो परंतु प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते. आता आपापल्या जागांवर परत या आणि हळूहळू डोळे उघडा.
सूर्य सर्वाना प्रकाश आणि उब देतो, सूर्यासारखे बना; प्रत्येकाला तुमचे प्रेम द्या.
उपक्रम:
मध्ये मुलांनी जे काही पहिले त्याचे चित्र काढण्यास गुरु मुलांना सांगू शकतात.
[उगम:- Early steps to self discovery step-2-, श्री सत्यसाई शिक्षण संस्था (भारत), धर्मक्षेत्र, मुंबई-]