वसुधैव कुटुंबकम्
वसुधैव कुटुंबकम्
(पशूवर दया)
वसुधैव कुटुंबकम् हा जोड्या लावण्याचा खेळ आहे. यामधे मुलांनी प्राण्याच्या नावाशी त्यांच्या त्वचेच्या नमुन्याबरोबर जोडी लावायची असते.
उद्दिष्ट:
हा खेळ मुलांना परमेश्वराच्या निर्मितीची अद्वितीयता जाणणे आणि त्याची प्रशंसा करण्यास मदत करतो, ही निर्मिती अतिशय विभिन्न विलक्षण प्रेरणादायी आहे. आपल्या धर्मग्रंथांमधे म्हटलेच आहे की हे संपूर्ण विश्व हे परमेश्वराचे एक कुटुंब आहे आणि या प्रत्येक निर्मितीत देवत्व वास करते, आपल्या विचार, उच्चार आणि आचरणातून ते प्रकट होण्याची जाणीव सतत असायला हवी. या खेळामुळे मुलांमधे त्यांच्या पशुमित्रांप्रती सहानुभूतीची भावना वाढीस लागेल, तसेच ते त्यांना कोणत्याही प्रकारे इजा पोहोचू देणार नाहीत.मुले आपल्या प्रिय स्वामींनी वेळोवेळी सांगितलेली खालील एकात्मतेची प्रशंसा करण्यास शिकतील.सर्व एक आहेत, आणि सर्वांशी समानतेने वागा
संबंधित मूल्ये:
- निरीक्षण
- स्मरणशक्ती
- चौकसबुद्धी
- वेगळेपणा जाणणे
- निसर्ग आणि देवाप्रती प्रेम
गुरुची पूर्वतयारी:
- गुरूंनी पशु, पक्षी यांच्या चित्रांची कात्रणे पुठ्ठ्याला चिकटवून त्यांची कार्ड तयार ठेवावीत. तसेच गुरूंनी प्राण्यांच्या नावांची कार्डेही तयार ठेवावीत.
खेळ कसा खेळावा:
- गुरु वर्ग दोन भागात विभागतील.
- प्रत्येक ग्रुपला चित्रे आणि नावांची कार्डे दिली जातील
- एक उदाहरण देऊन गुरु वर्गातील मुलांना समजावून सांगतील की मुलांनी विचार करून कोणत्या प्राण्याची त्वचा कोणत्या प्राण्यांशी जुळते हे ठरवायचे. (उदा: मोर- पिसारा)
- जरूर पडल्यास काही संकेत द्यावेत
- जो ग्रुप सर्व त्वचा आकृत्या अचूक नावांशी प्रथम जोडतील, तो ग्रुप जिंकेल.
गुरूंसाठी सूचना:
- ह्या उपक्रमास, मानवी मुल्यांशी जोडून, गुरु त्यांचा हा क्लास अधिक मनोरंजक व प्रभावी करू शकतात. प्राण्यांची शिकार करणे, त्यांची त्वचा विकण्यासाठी प्राण्यांना शिकार करून मारणे, अशा हिंसक गोष्टींवर गुरु मुलांना अधिक माहिती देऊ शकतात.
- या विषयावर प्रश्न मंजुषा घेता येऊ शकते.
- स्वामींना प्राण्यांवर किती प्रेम आहे – कुत्री, हत्ती, साई गीता, कोंबडया, म्हशी, गायी, हरिणे इ. हे गुरु सांगू शकतात.
- गुरु धर्मग्रंथांमधील गोष्टी सांगू शकतात – कामधेनू गाय तिला गोमाता संबोधले जाते. हिंदू धर्माने गायीला पूजा, आदर तसेच संरक्षण दिले आहे.
- गणेश आणि कार्तिकेयबरोबर बसलेल्या शिव-पार्वतीचे लोकप्रिय चित्र – याविषयी गुरु सांगू शकतात. या फोटोत वेगवेगळे प्राणी, पक्षी दिसतात, सर्व प्राण्यांमधे परिपूर्ण सुसंवाद दिसतो. हे चित्र म्हणजे भिन्नतेत एकतेचे छान उदाहरण आहे.
- यानंतर प्राण्यांवर करुणा या विषयावर चर्चा सत्र घेता येईल या विषयावर मुले चित्र काढू शकतात.
भिन्नता-:
ग्रुप १ – काहीही संकेत न देता प्राण्यांच्या त्वचेचे नमुने नावाशी जोडणे.
ग्रुप २: वृक्षांना पाने जोडणे
पौराणिक कथांतील शिकवण
उदा.- मासा- मत्स्य अवतार, पोपट- शुक मुनी, वाघ – भगवान अयप्पा, मोर- कृष्ण आणि कार्तिकेय, कासव- इन्द्रिय नियंत्रण, झेब्रा- जीवनातील भिन्नता (सुख- दुःख, सफेद आणि काळी पट्टे)