प्रामाणिकता
प्रामाणिकता
नवीन आव्हानांना सकारात्मकतेने कसे सामोरे जायचे हे जाणणे
(दोन पॅरेग्राफ आणि बिंदूंमध्ये विराम)
त्यानंतर खालील प्रमाणे कृती करावी.
१) “प्रथम, सुखकारक स्थितीमध्ये खुर्चीवर किंवा जमिनीवर मांडी घालून बसा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोकं सरळ ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, शरीर सैल सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या…… आणि अजून एक……”
२) आता शरीरामधील सर्व ताण बाहेर काढून टाका. तुमची बोटे ओढा आणि नंतर सैल सोडा. पोटरीचे स्नायू आवळून त्यांना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमच्या पायाचा वरच्या भागातील आणि मांड्यांच्या स्नायूंना ताण द्या आणि शिथिल करा. तुमचा पोटाचे स्नायू आत ओढून घ्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे मागे ओढून धरा आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे खाली आणि वर करा. डावीकडे पाहा, समोर पाहा. उजवीकडे पाहा, समोर पाहा. तुमचा चेहऱ्याचा स्नायूंना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे संपूर्ण शरीर तणावमुक्त झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्या शरीरातील सर्व ताणतणाव नाहीसा झाला असेल.
३) आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलेल्या क्रियाकलापांवर विचार करा. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात का यावरही विचार करा.
तुम्ही इतर लोकांशी प्रामाणिक आहात का यावर विचार करा. तुमचा भोवतालच्या परिस्थितीच्या दृष्टीने
तुमच्या कृती चांगल्या आहेत का यावर विचार करा. या
कृतींविषयी तुम्हाला समाधान वाटते का? तुमच्या कृती संतुलित आहेत का?
तुमच्या कृती पुढे चालू ठेवाव्यात अशा आहेत का?
जर त्या तशा नसतील तर त्या ऐवजी तुम्हाला, तुमच्या भोवताली असणाऱ्यांना आणि तुमच्या
भोवतालच्या परिस्थितीला अधिक लाभदायी होणाऱ्या कृती करता येतील का? तुम्ही तुमच्या स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला स्वतःविषयी अत्यंत चांगले वाटेल.
४) आता तुमचे लक्ष पुन्हा वर्गामध्ये आणा, डोळे उघडा आणि ताण द्या.
हा सराव करून झाल्यानंतर तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघून स्मितहास्य करा.
‘सत्य साई मानवी मूल्य शिक्षण’ या पुस्तकातून (प्रकाशक: BISSE Limited)