देणे

Print Friendly, PDF & Email
देणे
योगदानाची शक्ती जाणून घेण्यासाठी

(गुरुंनी अभ्यास पुस्तिका हळूहळू वाचावी, जेथे टिंब टिंब आहेत तेथे थोडा विराम घ्यावा ….

(जर गुरुंची इच्छा असेल तर त्यांनी त्या पार्श्वभूमीवर एखादे अल्हाददायक संगीत लावावे.)

त्यानंतर खालील प्रमाणे कृती करावी.

१) “प्रथम, सुखकारक स्थितीमध्ये खुर्चीवर किंवा जमिनीवर मांडी घालून बसा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोकं सरळ ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, शरीर सैल सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या…… आणि अजून एक……”

२) आता शरीरामधील सर्व ताण बाहेर काढून टाका. तुमची बोटे ओढा आणि नंतर सैल सोडा. पोटरीचे स्नायू आवळून त्यांना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमच्या पायाचा वरच्या भागातील आणि मांड्यांच्या स्नायूंना ताण द्या आणि शिथिल करा. तुमचा पोटाचे स्नायू आत ओढून घ्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे मागे ओढून धरा आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे खाली आणि वर करा. डावीकडे पाहा, समोर पाहा, उजवीकडे पाहा, समोर पाहा. तुमचा चेहऱ्याचा स्नायूंना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे संपूर्ण शरीर तणावमुक्त झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्या शरीरातील सर्व ताणतणाव नाहीसा झाला असेल.

3) तुम्ही खोलीमध्ये असल्याची जाणीव ठेवा…

सद्भावना अधिक व्यापक होऊन त्या खोलीमध्ये, इमारतीमध्ये आणि संपूर्ण शहरामध्ये भरून राहिली आहे अशी कल्पना करा….. अशी कल्पना करा की आनंद विस्तार पावून, त्याने समस्त पृथ्वीला व्यापून टाकले आहे. येथील प्रत्येक जण तुमचा भाऊ वा बहीण आहे….. प्रत्येकजण जशी स्वतःची काळजी घेतो तशी त्याने इतर सर्वांची काळजी घेणे गरजेचे आहे.

असा एखादा प्रसंग आठवा जेव्हा तुम्ही एखाद्याला,परतफेडीची कोणतीही अपेक्षा न ठेवता काहीतरी दिले होते…. आणि अजून एखादा प्रसंग……अजून एखादा प्रसंग……

नि:स्वार्थ बुद्धीने तुम्ही कोणाला काही देऊ शकता याबद्दल स्वतःचे अभिनंदन करा…..

स्वतःला अधिक उदात्त बनवण्याचा तसेच भविष्यामध्ये अधिकाधिक देण्याचा निश्चय करा…. तुम्ही ते कसे कराल यावर विचार करा.

४) आता तुम्ही पुन्हा खोलीमध्ये असल्याच्या जाणीवेत या. डोळे उघडा आणि हा अभ्यास संपल्यावर, हात ताणून लांब करा.

तुमच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे पाहून स्मितहास्य करा.

‘सत्य साई मानवी मूल्य शिक्षण’ या पुस्तकातून (प्रकाशक: BISSE Limited)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: