इच्छांवर नियंत्रण

Print Friendly, PDF & Email
इच्छांवर नियंत्रण
संपत्तीचे ही वेगवेगळे प्रकार आहेत ते जाणून घेण्यासाठी

गुरुंनी कौशल्य विकसित करण्याची सराव पुस्तिका हळूहळू वाचावी, जेथे टिंब टिंब आहेत तेथे थोडा विराम घ्यावा ….

जर गुरुंची इच्छा असेल तर त्यांनी त्या पार्श्वभूमीवर एखादे अल्हाददायक संगीत लावावे.

त्यानंतर खालील प्रमाणे कृती करावी.

१) “प्रथम, सुखकारक स्थितीमध्ये खुर्चीवर किंवा जमिनीवर मांडी घालून बसा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोकं सरळ ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, शरीर सैल सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या…… आणि अजून एक……”

२) आता शरीरामधील सर्व ताण बाहेर काढून टाका. तुमची बोटे ओढा आणि नंतर सैल सोडा. पोटरीचे स्नायू आवळून त्यांना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमच्या पायाचा वरच्या भागातील आणि मांड्यांच्या स्नायूंना ताण द्या आणि शिथिल करा. तुमचा पोटाचे स्नायू आत ओढून घ्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे मागे ओढून धरा आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे खाली आणि वर करा. डावीकडे पाहा, समोर पाहा, उजवीकडे पाहा, समोर पाहा. तुमचा चेहऱ्याचा स्नायूंना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे संपूर्ण शरीर तणावमुक्त झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्या शरीरातील सर्व ताणतणाव नाहीसा झाला असेल.

३) तुम्ही संगीत ऐकत असताना कल्पना करा, तुम्ही तुमच्या आवडत्या जागी पायी फिरत आहात. ती जागा अत्यंत सुंदर आहे. तेथील पक्ष्यांच्या मधुर कुजनाने तुम्हाला अत्यंत आनंदी आणि प्रसन्न वाटत आहे. निळ्याशार अनंत आकाशाकडे पाहा. तुम्ही स्वतःचा विस्तार करून आकाशाप्रमाणे व्यापक झाल्याची कल्पना करा… पाहा सूर्य किती तेजाने तळपून पृथ्वीवर प्रकाशाचे आणि प्रेमाचे किरण पाठवतो आहे. तुमच्या भोवतालचा निसर्ग अत्यंत सुंदर आहे आणि तुम्ही त्याचा मुक्तपणे आनंद लुटू शकता. हे समजल्यावर, तुमच्याकडे तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट आहे. तुम्ही तुमच्यामधून लोकांना… पशुपक्ष्यांना… वनस्पतींना… माशांना… पाषाणांना तुमच्या भोवती असणाऱ्या अखिल जगताला प्रेम आणि शांतीची किरणे पाठवा. प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला प्रेम आणि शांती प्रदान करणे तुम्हाला अत्यंत आनंदी बनवते.

४) आता तुमचे लक्ष पुन्हा वर्गामध्ये आणा, डोळे उघडा आणि ताण द्या.

हा सराव करून झाल्यानंतर तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघून स्मितहास्य करा.

‘सत्य साई मानवी मूल्य शिक्षण’ या पुस्तकातून (प्रकाशक: BISSE Limited)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: