आकाश – १
आकाश-१
ओळख:
सृष्टीच्या निर्मितीच्या सुरवातीस परमेश्वराने पहिला ओम हा शब्द उच्चारला, तेव्हा तो सामावून घेण्यासाठी कशाची तरी आवश्यकता भासली आणि आकाशाची निर्मिती झाली. त्याची व्याप्ती अपरिमित आहे. ते सर्वत्र आहे. सर्व काही सामावून घेऊ शकते. आपल्या पूर्वजांनी ‘शब्दब्रह्म’, आदिकालापासून अस्तित्वात असलेला शब्द, म्हणून आकाशाची पूजा केली.
तत्त्वे:
ह्या घटकाचे ध्वनी हे तत्त्व आहे. सर्व घन वस्तू आणि ऊर्जा यांचा स्रोत असलेल्या ओम या वैश्विक ध्वनीपासूनच संगीत आणि इतर श्रवण ध्वनी निर्माण झाले. जसे अवकाशाचे विस्तृती हे तत्त्व आहे, तसेच आपण आपले हृदय विशाल, सर्व समावेशक करून संपूर्ण सृष्टीसाठी वैश्विक प्रेम समाविष्ट करायला हवे.
गाणे:
आकाश जसे सर्व कवेत घेते
माझ्या हृदयात सर्व जीव सामावून जावे.
गोष्ट:
जपानमधे कागावा नावाचे थोर महात्मा होऊन गेले. त्यांना लोक ‘जपानचे महात्मा गांधी’ असे म्हणत. ते एका लहान गावात अतिशय साधेपणाने रहात. ते सर्वांचे लाडके होते. त्याच गावात एक दुष्ट माणूस रहात होता. तो सर्वांशी वाईट वागत असे. कोणालाही तो आवडत नसे. कोणी कागावांची स्तुती केली की त्याला कागावांचा खूप राग येई आणि त्याला त्यांना खूप त्रास द्यावासा वाटे. एका रात्री तो त्यांच्या घरी गेला. कागावा उठले, त्यांनी पहिले एक माणूस, डोळे लाल झालेले, त्यांना मारायच्या तयारीत आहे. तथापि ते शांत राहिले. त्यांनी हात जोडून परमेश्वरास प्रार्थना केली, “प्रभू, ह्याला सद्बुद्धी दे. मी ह्याच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. “त्या माणसाला खूप आश्चर्य वाटले की, ज्याला मारण्यासाठी तो आला, तोच त्याच्या सुस्थितीची प्रार्थना करतो आहे. कागावा प्रार्थना करीत होते. चेहऱ्यावर मंद स्मित होते. त्या माणसाने आपले हत्यार फेकून दिले. कागावांच्या पायाशी लोळण घालून तो रडू लागला. कागावांनी त्याला हाताला धरून उठवले, जवळ घेऊन त्याचे डोळे पुसले आणि म्हणाले, ‘चिंता करू नकोस. चूक करणे म्हणजे मानव आहे, परंतु क्षमा करणे हे दैवी आहे.” कागावांच्या प्रार्थना आणि आपुलकीने तो माणूस पूर्णपणे बदलला. तो एक चांगला माणूस बनला.
मौन बैठक:
मुलांनो शांत बसा. डोळे बंद करा आणि कल्पना करा:
“मी बागेत फिरतोय. बाग अतिशय सुंदर आहे. पक्षी आनंदाने मधुर गीत गात आहेत. थंडगार वाऱ्याची झुळुक येते. मी आकाशाकडे पाहतो. किती विशाल आहे ते? मी आकाशाप्रमाणे मोठा, विस्तारत जातो आहे. आकाश सर्व जीवांना उंच तरंगायला आणि आनंद घेण्यासाठी बोलावतो आहे. सूर्य त्याच्या प्रेमाच्या प्रकाश किरणांनी तळपतो आहे. मला दोन्ही हात विस्तारून, सर्व मानव, प्राणी, पक्षी, ग्रह, मासे, डोंगर यांना माझ्या जवळ घेऊन प्रेम वाटू द्या. मी खूप आनंदी आहे. मी सर्वांचा आभारी आहे.
उपक्रम:
शब्दकोडे – हयामधील ५ तत्त्वाची नांवे ओळखा
प्रार्थना:
समस्त लोका: सुखिनो भवन्तु