पाणी – २

Print Friendly, PDF & Email
पाणी – २

गोष्ट:

रमेश नावाचा एक मुलगा होता. त्याला त्याचा रिकामा वेळ बागेत घालवायला आवडत असे. एकदा त्याने काही फुलझाडांची रोपे आणली आणि बागेत लावली. त्याने त्यांची व्यवस्थित निगा राखली. साधारण एक आठवड्याने, त्याच्या आई बाबांना दक्षिण भारतात काही स्थळांना भेट द्यायची होती, त्यामुळे रमेशला त्यांच्याबरोबर जावे लागले. ते १५ दिवसांनी परत आले. रमेशला त्याची सर्व रोपे मरून गेलेली दिसली.

  • प्रश्न १: मला सांगा, रोपे का मरून गेली?
  • प्रश्न २: रमेशने काय करायला हवे होते?
  • प्रश्न ३: पाणी नसेल तर काय अडचणी उद्भवतात?
उपक्रम:

५ ते ८ च्या संख्येत मुलांचे गट करा. त्यांनी चर्चा करून पाण्याचे उपयोग लिहून काढायचे. नंतर त्याची चित्रे काढून त्याला योग्य शीर्षक द्यायचे. प्रत्येक गटांनी ते वर्गासमोर सादर करायचे आणि शेवटी शिक्षिका फळ्यावर त्याचा सारांश लिहितील. नंतर चित्रे भिंतींवर सर्व मुलांना अभ्यासासाठी लावावीत.

समूहगान:

Water, Water, Water
God is your creator

I cannot live without your favour
You are my life sustainer – Water

You make everybody’s life a pleasure
I promise to keep you ever pure.
Water, Water, Water

गोष्ट:

भगीरथ हा राजा दिलीपचा पुत्र होता. भगीरथ राजा झाल्यावर त्याने प्रतिज्ञा केली की तो पवित्र गंगा नदीचे पाणी स्वर्गातून खाली प्रथ्वीवर आणेल. त्याने ब्रह्मदेव आणि भगवान शिवास प्रसन्न करण्यासाठी खूप वर्षे तप केले.

त्याचा दृढ निश्चय आणि भक्तीमुळे ते प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी गंगेस आपल्या जटांमध्ये धारण केले. त्यानंतर गंगा पृथ्वीवर अवतरली. गंगेचा प्रवाह जिथून गेला, तिथे सुबत्ता, आनंद आणि प्रेम आले. जमीन सुपीक झाली, नदीच्या काठावर गावे वसली. गंगा माता ही शुद्धतेचे आणि दिव्यत्वाचे प्रतीक आहे.

स्तब्ध बैठक:

“मी पहाटे लवकर उठले, परमेश्वराची प्रार्थना करून अंथरुणातून बाहेर आले. मी माझा चेहरा पाण्याने धुतला. घरातील वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर मी दात घासणे, आंघोळ आणि इतर कामे करण्यासाठी पाणी वापरले. कपडे धुण्यासाठी पाण्याचा उपयोग केला. माझ्या आईने भांडी घासायला, व्हरांडा धुवायला पाणी वापरले. घरातील इतरांनीसुद्धा माझ्यासारखेच त्यांच्या दैनंदिन कामासाठी पाणी वापरले. माझ्या आईने मुख्यतः पाण्याचा वापर करून जेवण बनवले. शाळेतून परत आल्यावर, मी झाडांना पाणी घातले आणि नंतर पाण्याने माझे हात, पाय धुतले. मी डबा आणि पाणी घेऊन जातो. हे जल, मी या जगात तुझ्याविना जगूच शकत नाही. तू खरंच महान आहेस. ज्यानी तुझी आमच्यासाठी निर्मिती केली त्या परमेश्वराचा मी खूप आभारी आहे. मी तुला व्यर्थ वाया घालवणार नाही. मी तुला नेहेमी शुद्ध ठेवण्याचे आश्वासन देतो.”

ॐ शांतिः शांतिः शांतिः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: