पृथ्वी – २

Print Friendly, PDF & Email

पृथ्वी – २

पृथ्वी आपली माता आहे. उंच पर्वत, अथांग समुद्र, घनदाट जंगल, नद्या, तळी या सर्वांचा ती भार वाहते. शेती, खाणी, यासाठी जागा देताना ती खूप कष्ट झेलते. ती आपल्याला अन्न, निवारा, अशा कितीतरी गोष्टी देते. तसेच, आपल्या वसाहतीसाठी चांगले वातावरण आणि इमारती देते.

Story:

एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याचा तरुण नातू रोज त्याच्याबरोबर शेतात जात असे. बाहेर जे बघेल त्यावर प्रश्न विचारण्याची त्याला सवय होती. जेव्हा त्याचे आजोबा भात पेरणी करीत होते, तेव्हासुद्धा त्याने अशीच चौकशी केली. आजोबांनी त्याला शेतात बियाणे लावण्याविषयी सर्व माहिती दिली. पुन्हा नातवाने विचारले, ‘का?’ यावेळी आजोबांनी त्याला सहा महिने थांबून निरीक्षण करण्यास सांगितले. सहा महिन्यांनी जसे भाताचे पीक पोत्यातून घरी आलं, तेव्हा पुन्हा नातवाने विचारले की ही पोती कुठून आली. आता आजोबांना सर्व समजून सांगण्याची संधी मिळाली. ते म्हणाले की हा आहे बियाणे पेरल्याचा परिणाम आणि सहा महिन्यांपूर्वी पेरलेल्या बियाणांची निष्पत्ती. नातवाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, “आपले शेत ही एक चांगली बँक आहे. ती थोड्या कालावधीसाठी सुद्धा सर्वात जास्त व्याज देते.”

गाणे:

मी पृथ्वी आहे, म्हणतात मला पृथ्वी
निर्मिले मज अखिल विश्वाच्या सेवेसी
जीवन माझे पूर्ण समर्पित त्या कार्यासी
नाही मज अपेक्षा सेवेच्या परतफेडीची (१)

निर्मिले मज सर्व सहन करण्यासी
संस्कार दिले मज सर्वांना सामावून घेण्यासी
सर्वांना सुखसुविधा देण्याची शिकवण दिली मजसी (२)
सुहास्याने, आनंदाने आलिंगन देते सकलासी

प्रचंड महा गिरी पर्वत स्थिरावती माझ्यावरती
महानद्यांचे जलप्रवाह वाहती माझ्यावरती
उंच मनोरे भव्य हवेल्या उभ्या राहती माझ्यावरती
जीवनदायी अन्नधान्य उगवते माझ्यावरती(3)

(स्रोत – श्री सत्यसाई एज्युकेअर, लेसन प्लॅन्म, श्री सत्यसाई बालविकास ट्रस्ट मुंबई)

स्तब्ध बैठक:

मुलांसाठी पृथ्वीचा गोल समोर ठेवा. त्यांना त्याचे नीट निरीक्षण करण्यास सांगा. एक ते दोन मिनिटे निरीक्षण केल्यावर त्यांना डोळे बंद करण्यास सांगा. आता मोकळे मैदान, देश आणि खंड, त्यांची लांबी, रुंदी याचे कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभे करण्यास सांगा.

प्रश्न:
  1. पीक कुठे उगवते?
  2. विटा कशापासून बनतात?
  3. पाणी मिळण्यासाठी विहीर कुठे खणता येते?
  4. खनिजे मिळणाऱ्या खाणी कुठे असतात?
  5. भाज्या कुठे पिकवता येतात?
गोष्ट:

एका गावात एक खूप श्रीमंत माणूस राहत होता. त्याला तीन मुले होती. तो वृद्ध झाला आणि मृत्यूपूर्वी त्याला त्याची संपत्ती मुलांमध्ये वाटायची होती. त्याच्याकडे खूप जमीन, गायी, म्हशी आणि सोन्याचे दागदागिने होते. मोठ्या मुलाला सोन्याचे दागिने घेऊन शहरात रहायचे होते. मधल्या मुलाला गायी, म्हशी आवडत. त्यामुळे त्याने जनावरे आणि त्यांची निगा राखणारे सेवक यांची मालकी घेतली. लहान मुलाला जमीन घेण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. कालांतराने तो श्रीमंत माणूस मृत्यू पावला.

मुले त्यांच्या मर्जीनुसार राहू लागली. एकदा त्यांच्या जिल्ह्यात खूप मोठा पूर आला. जनावरांना वाचवणे अशक्य होते. ज्या मुलाकडे गुरे होती, त्याच्या काही गायी म्हशी पुरात वाहून गेल्या. ज्या वाचल्या, त्यांना पुरेसे खाद्य न मिळाल्याने, त्यातील काही मरून गेल्या. त्यामुळे त्याचे खूप आर्थिक नुकसान झाले. नोकरी, अन्नाच्या शोधात लोक गाव सोडून जवळच्या शहरात गेली. काहींनी चोरीचा मार्ग पत्करला. मोठ्या मुलाच्या घरी, शहरात एकदा चोरी झाली आणि त्यात त्याचे बरेचसे दागिने चोरीला गेले.

पुरानंतर गावातील लोकांनी शेतात खूप मेहनत केल्याने भरपूर पीक आले. ते आनंदाने राहिले. सर्वात लहान मुलाने धरतीने दिलेल्या बक्षिसाबद्दल तिचे आभार मानले.

उपक्रम:

विद्यार्थ्यांचे दोन गट करणे. एका गटातील मुले एक शब्द सुचवतील. त्यावर दुसऱ्या गटातील मुले त्याचे उपयोग सांगतील. गुण द्यावेत.

[ [Adapted From: SRI SATHYA SAI EDUCARE, Lesson Plans, SRI SATHYA SAI BAL VIKAS TRUST, Mumbai]]

एज्युकेशन ‘शिक्षण’ हा शब्द मूळ लॅटीन भाषेतील “एज्युकेअर” शब्दापासून आला.
शिक्षणा हे केवळ उदरनिर्वाहापुरते नसून ते जीवनासाठी आहे, तर आत्मोद्भव शिक्षण हे अंतर्यामी असलेले बाहेर काढणे आहे.
शिक्षण हे जगण्यासाठी, तर आत्मोद्भव शिक्षण हे जीवासाठी, शिक्षण हे ‘जीवन उपाधी’ (उपजीविका )आत्मोद्भव शिक्षण हे ‘जीवित परमावधी’ (जीवनाचे अंतिम ध्येय).बाह्यजगातील गोष्टी समजून घेणे आपल्यासाठी सोपे असते, आणि अंतर्यामी पाहणे अतिशय कठीण. आपल्या अंतर्यामी अनेक गोष्टी आहेत ज्या प्रकट होत नाहीत. G,O,D ही तीन अक्षरे जोडल्यावर आपल्याला GOD शब्द मिळतो. ते प्रत्येक अक्षर वैयक्तिक पाहिले तर त्यांना काहीच अर्थ नाही. अर्थ मिळण्यासाठी आपण ही अक्षरे एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. हे आत्मोद्भव शिक्षण होय. आत्मोद्भव शिक्षण म्हणजे अंतर्यामीचे बाहेर काढणे.
आत्मा हे आपले सर्वाधिक आतंरिक सत्य होय. आत्मोद्भव शिक्षणाने ते बाहेर यायला हवे -भगवान बाबा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: