तळ्यात मळ्यात
तळ्यात मळ्यात
उद्दिष्ट:
एक अत्यंत उत्साहजनक उपक्रम – श्रवण कौशल्ये अधिक सक्षम बनवणे व बुद्धिचा वापर करुन आदेशाचे पालन करण्याच्या आवश्यकतेवर विशेष भर देणे. ही ह्याउपक्रमाची उद्दिष्टे आहेत.
संबंधित मूल्ये:
आज्ञाधारकता
जागरुकता
विवेकबुद्धी
आवश्यक साहित्य:
काही नाही
गुरुंसाठी पूर्वतयारी:
काही नाही
खेळ कसा खेळायचा
- मुलांना एक रांग बनवण्यास सांगावे.
- गुरुंनी मुलांना खेळ कसा खेळायचा ते सांगावे. ‘सर्वांवर प्रेम करा’ असा आदेश दिला जातो तेव्हा मुलांनी चालले पाहिजे आणि ‘सर्वांची सेवा करा’ असा आदेश दिल्यावर त्यांनी थांबले पाहिजे.
- उदा. गुरुंनी सर्वांवर प्रेम करा, सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, सर्वांची सेवा करा, सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा – असे उलटसुलट सतत म्हणून रहायला पाहिजे.
- जे आदेशानुसार कृती करत नाहीत त्यांना खेळातून बाद करावे.
- त्यानंतर आदेश आणि कृती ह्यांची अदलाबदल करा.आता सर्वांची सेवा म्हटल्यावर मुलांनी चालले पाहिजे आणि सर्वांवर प्रेम करा हां आदेश दिल्यावर थांबले पाहिजे.
- मुलांना उत्साहित करण्यासाठी, त्याची अनेकदा पुनरावृत्ती केली पाहिजे.
- जी मुले आदेशानुसार योग्य कृती करणार नाहीत त्यांना खेळातून बाद करावे
- खेळाच्या अखेरपर्यंत जो मुलगा नाबाद राहील तो विजेता ठरेल.