पूर्वम राम श्लोका – पुढील वाचन
पूर्वम राम श्लोका – पुढील वाचन
राम कथा
अनेक शतकांपासून, लाखो आबाल स्त्रीपुरुषांसाठी; शोकाकुल स्थितीत सांत्वना देणारी, किंकर्तव्य विमूढ़तेत चेतना देणारी, संभ्रमात प्रकाश दाखविणारी, नैराश्यात प्रेरणा देणारी आणि विवंचनेत सापडलेल्यांना मार्गदर्शन करणारी अशी ही रामकथा पवित्र अमृताचा स्त्रोत झालेली आहे. हे एक अत्यंत पराकाश्टाचे मानवी नाटक आहे ज्यात आपल्याला नीतिबोध आणि दृष्टान्ताद्वारा प्रज्ञेचे वरदान देण्यासाठी परमेश्वर मानवाची भूमिका वठवत आहे आणि विशाल विश्वमंचावर स्वतः भोवती, परिपूर्ण व अपूर्ण मानवी व अमानवी, पाशवी व राक्षसी व्यक्तिमत्वे गोळा करतो आहे. मानवी ह्रदय वीणेच्या तारांवरून हळुवार बोटे फिरवून कारुण्य, दया, परमानंद, पूज्यभाव, तन्मयता र शरणागतीच्या शुद्ध प्रतिसादांना आवाहन करणारी, आपल्याला पशुखतेतून म मानवतेतून आपले मूलस्वरूप असलेल्या दिव्यतेत बदलवून टाकणारीअशी ही कथा आहे.
माणसाच्या मनावर इतका खोलवर परिणाम करणारी अशी कथा मानवी इतिहासात दूसरी नाही. ही कथा ऐतिहासिक खुणा आणि भौगोलिक सीमांच्या अतीत आहे. या कथेने कित्येक पिढयांच्या वृत्ती व सवयींची घडवणूक व उदात्तीकरण केलेले आहे. रामायण ही राम-कथा, या भूगोला वरील विस्तृत प्रदेशावरील मानव जातीच्या रक्तप्रवाहातील रोग निवारक पेशी बनली आहे. हीने सत्य, धर्म, शांती व प्रेमाच्या मार्गावर चालण्यासाठी उध्युक्त व प्रेरीत करणारी मुळे माणसांच्या सदसदविवेक बुद्धीत रोवली आहेत.
आख्यायिका व अंगाईगीते, दंतकथा आणि कहाण्या, नृत्य व नाट्य, शिल्पकला, संगीत व चित्रकला, संस्कार, काव्य आणि प्रतीके या माध्यमातून असंख्य साधक व तपस्वी लोकांचा राम हा जीवनप्राण, संपत्ती व आनंद-बनला आहे रामकथेतील व्यक्तीमत्वांनी स्वतःचा उत्कर्ष करून घेण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्याली साहस व परिक्रमाची तेजस्वी उदाहरणे प्रस्तुत केली आहेत. चलबिचल झालेल्यांना दुष्प्रवृत्ति व हिंसा, अहंकार व क्षुद्रतेपासून सावध केले आहे. मनुष्यवाणीने आपल्या उच्च उद्दिष्टांना व्यक्त करण्यासाठी योजलेल्या प्रत्येक भाषा व बोलीला राम कथेने एक अवीट पोषक माधुर्य प्रदान केले आहे.
“विज्ञानाने” (Science) या पृथ्वी एखादया अवकाशयानाप्रमाणे आटोपशीर आणि कोशात्मक बनविले आहे, ज्यात मानवजातीला आपले प्रारब्ध जगूनच संपवले पाहिजे. साई ज्ञान (Sai-ence) या अवकाशयानाचे जलदच एका प्रेममय आनंदी वस्तूमध्ये रुपांतर करीत आहे हे आपण जाणतोच. ऐंद्रिय सुखाची विकृती वखवख, मातापिता, गुरुजन, वयोवृध्द, संतजन आणि उपदेशक यांच्याविषयीचा वाढता अनादर, साभाजिक, वैवाहिक व कौटुंबिक संबंध यातील अर्नथावह असभ्यता आणि छिचोरपणा, अनैतिक मिळकतीसाठी एक साधन म्हणून हिंसाचारावरील विश्वास, वैयक्तिक व सामुहिक स्वार्थासाठी दहशतवाद अणि छळवादाचा सर्रास उपयोग आणि याशिवाय आणखी कितीतरी अधिक क्रूर अशा वैश्विक प्रेमात अडथळे आणणाऱ्या दुष्प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी सर्व रोगनिवारक उपाय म्हणून साईनी या पुस्तकाचा संकल्प केला असावा.
राम म्हणून त्यांच्या स्वत:च्या दैवी कारकिर्दीला स्वत:च्याच साध्या मथुर आणि पोषक लेखन शैलीत साईनी येथे संक्षिप्तपणे मांडले आहे. या दिव्य कथानकाला आपल्या हाती धरण्याचे, आपल्या मनावर कोरून आपल्या हृदयपटलावर छापून ठेवण्याचे हे केवढे महान सौभाग्य आहे! या पुस्तकाच्या अभ्यासाने मानवजातीला एकाच कुटुंबात रूपातरीत करण्याच्या, आपल्यातील प्रत्येकाला साईराम हेच अंतिम व एकमेव सत्य आहे हे जाणवून देण्याच्या त्यांच्या कार्याची पूर्तता करण्याच्या कामी कार्यक्षम व उत्साही कारागिर म्हणून आपला सहभाग व्हावा हीच इच्छा आहे.
रामाने उद्घोषित केले आहे की तोच राम परत आला आहे आणि धर्माचे पुनरुत्थान करुन मानवाला प्रशांतीच्या स्वर्गाप्रत नेण्याच्या या अवतारकार्यात योग्य कार्यभाग सांभाळण्यासाठी आपल्या पूर्वीच्या साथीदाराना आणि सहकाऱ्याना (तेलगु मध्ये बंटु संबोधिलेल्या) ते शोधत आहेत. या कथेवर मनन करीत असताना आपल्यालाही या कार्यात सहभाग मिळावा आणि फलस्वरुप, या स्वर्गदर्शनाची देणगी मिळावी अशी प्रार्थना करुया.
[राम कथेसाठी श्री कस्तुरी यांनी लिहिलेल्या प्रस्तावंमधून]
या कथेचा गर्भितार्थ काय आहे ते पाहू या.
एन. कस्तूरी – राम कथा रसवाहिनी:
प्रत्येक जीवमात्राच्या अन्तर्यामी रामाचा वास आहे, तोच आत्माराम आहे. प्रत्येकातील राम (आनंदाचा स्त्रोत) आहे. स्था आतरिक स्त्रोतानून पाझरणारे त्याचे आशिष शांती व आनंदाची बरसात करतात. प्रेम व एकोप्यात मानवजातीला एकत्र धारण करणाऱ्या सर्व नैतिक मूल्यांच्या धर्माची तो साक्षात् मूर्ती आहे. हे रामायण रामाची कथा आपल्याला दोन पाठ शिकविते. अनासक्ती व सर्वाभूती वास करणाऱ्या देवत्वाची जाणीव ठेवण्याची गरज, परमेश्वरावरील श्रध्दा व भौतिक गोष्टी विषयीची अनासक्ती या मानव मुक्तीच्या किल्ल्या आहेत. काम सोडा की राम मिळेल. सीतेने अयोध्येतील ऐशारामाचा त्याग केला आणि म्हणून बनवासाच्या काळात ती रामाबरोबर राहू शकली. सुवर्ण मृगाची तिने कामना केली आणि रामापासून दूर गेली. त्यागाने आनंद मिळतो, तर आसक्तिने दुःख होते जगात रहा पण जगाचेच होऊ नका.
रामाचे भाऊ, साथीदार, सोबती व मदतगार, प्रतिकजण हा अत्यंत धार्मिक होता. दशरथ हा दशेंद्रियांसह केवळ भौतिकतेचे प्रतिनिधित्व करतो त्याच्या तीन राण्या म्हणजे सत्व, रज, तम हे तीन गुण आहेत त्याचे चार पुत्र हे चार पुरुषार्थ, लक्ष्मण बुध्धि आहे; सुग्रीव विवेक आहे. वाली निराशा आहे. हनुमान मूर्तिमंत धैर्य आहे.
भ्रमरूपी महासागरावर पूल बांधला आहे. रावण, कुंभकर्ण विभीषण है तीन राक्षस राजे अनुक्रमे राजसिक, तामसिक व सात्विक वृत्तीच्या मूर्ती आहेत. सीता ही ब्रह्मज्ञान आहे जे प्रत्येक व्यक्तिने आयुष्याच्या मुशीत सर्वचढ उतार सहन करीत. कठीण परिस्थितीतून मार्ग काढीत, मिळविलेच पाहिजे. रामायणाच्या या भव्यतेवर चिंतन करत तुमचे अंत:करण शुध्द व बलवान करा. तुमच्या अस्तित्वाचे सत्य रामच आहे ही श्रध्दा दृढ़ करा.
[बाबा – राम कथा रसवाहिनी]
रामाचे नाव हेच वेदांचे सार-सर्वस्व आहे. जणू शक्तिमान व शुध्द क्षीरसागरच अशी ही रामकथा. या काव्यासारखे भव्य-दिव्य व सुंदर काव्य आजपर्यंत दुसऱ्या कोणत्या देशात अथवा भाषेत निर्माण झाले नाही हे आपण ठामपणे सांगू शकतो. मात्र या काव्याने इतर प्रत्येक देशातील व भाषेतील काव्यात्मक कल्पनेला प्रेरणा दिली आहे. प्रत्येक भारतीयांच्या महत्पुण्यामुळे त्याला या संपत्तिचा जन्मसिध्द वारसा मिळाला आहे.
रामायणाने ज्या नामाचे गुणगान केले आहे ते नाम सर्वदुष्टतेचे, संकटाचे निवारण करते, त्या नामाने पापी लोकांत आमूलाग्र बदल होतो. नामस्मरणाने नामाइतकेच सुंदर मोहक रुप साक्षात् प्रकट होते जसा सागर पृथ्वीतलावरील सर्व पाण्याचे उगमस्थान आहे तसेच रामापासून सर्व जीवांची उत्पत्ती झाली आहे. जसा पाण्याशिवाय सागर असणे शक्य नाही तसे रामाशिवाय जीवांचे अस्तित्व आताच काय पण कधीही असणे शक्य नाही निळया महासागरात व सर्वशक्तीमान परमेश्वर खूपच साम्य आहे.
रामकथेचा स्त्रोत कित्येक वळणे घेत प्रवाहित होतो पण त्यातील करुणारस कोमलता, दया हो यत्किंचितही कमी होत नाही वा प्रवाह दुःख, नवल, कुचेष्ठा, धास्ती, भय, प्रेम, निराशा आणि चर्चा यांच्यातून वळणे घेत वाहतो पण मुख्य अन्तः प्रवाह धर्म प्रीतीचा व त्यामुळे पोसल्या जाणाऱ्या करुणेचा आहे.
(पृष्ट १ आणि २ – राम कथा रसवाहिनी)