ॐ सर्वे वै श्लोका – पुढील वाचन
ॐ सर्वे वै श्लोका – पुढील वाचन
प्रार्थना संबंधित गोष्ट
युधिष्ठिर धर्मज्ञ म्हणून विख्यात होता आणि तो अत्यंत सद्गुणी व सदाचरणी होता. त्याचे जीवन शुद्ध, पवित्र व दैवी कृतींनी भरलेले होते. त्याने आयुष्यात कधी पाप केले नसल्याने त्याने पुष्कळ पुण्य संपादन केले होते. पण अरेरे! त्याच्या पुण्यशील जीवनावर एक छोटासा कलंक होता.
कुरुक्षेत्र वरील युद्धात पांडव कौरवां व गुरु द्रोणाचार्य शी लढले, द्रोणाचार्यांचा पराभव करणे अवघड आहे हे कृष्णाला माहीत होते. जर द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवले आणि लढायला नकार दिला तरच त्यांचा पराभव करणे शक्य झाले असते. पण द्रोण आपले शस्त्र खाली कसे ठेवणार? त्यांचा एकुलता एक मुलगा अश्वत्थामा त्यांचा फार लाडका होता. जर अश्वत्थाम्याच्या मृत्यूची वार्ता त्यांच्या कानी गेली तर ते खेदाने शस्त्र खाली ठेवले, पण ते अफवांवर विश्वास ठेवणार नाहीत. युधिष्ठिर सत्यवचनी असल्याने ते त्याच्याकडून खात्री करून घेतील. खोटे बोलणे आवश्यक आहे हे युधिष्ठिराला कसे पटवावे?
भगवान कृष्णाने एक योजना आखली. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारण्यात आला. मग कृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की जर द्रोणांनी त्याला विचारले, ‘अश्वत्थामा मेला काय?’ तर त्याने मोठ्याने ‘होय’ म्हणावे आणि ‘नरो वा कुंजरो वा’ (माणूस की हत्ती कुणास ठाऊक) असे पुटपुटावे. या योजनेनुसार सर्व करण्यात आले आणि भगवान कृष्णाच्या अपेक्षेप्रमाणे सत्य स्थितीची खात्री करून घेण्यासाठी द्रोण युधिष्ठिर याकडे गेले. युधिष्ठिराने पाठ केलेल्या शब्दात उत्तर दिले. आता जरी युधिष्ठिराने खोटे सांगितले नव्हते तरी ते अंशतः असत्य होतेच, कारण त्याला अश्वत्थामा हत्ती मेला आहे माणूस नव्हे हे माहीत होते. या छोट्याशा कमनि त्याच्या जीवनावर बारीकसा पापकलंक लावला.
युधिष्ठिराच्या जीवनाच्या अंतकाळी आपल्या च्या कामाचा झाडा त्याला घ्यावा लागला. या छोट्याशा कर्माचा परिणाम म्हणून त्याला प्रथम काही क्षण नरकात घालवावे लागले आणि नंतर पुण्याचे आनदभाग अनुभविण्यासाठी त्याने स्वर्गात जायचे होते. याला युधिष्ठिराने आनदान समती दिली. त्याने नरकात प्रवेश केल्याबरोबर त्याच्या उपस्थितीमुळे तिथ दुःख भोगणारा आणि हाल हाल सोसणाऱ्या जिवांना एकाएका शातता, शीतलता आणि संतोष यांचा अनभव आला.
त्यांना ज्या अताव आनदाचा अनुभव आला तो त्यांनी पूर्वी कधीच अनुभवला नव्हता. नरकात झालेला बदल धर्मराजाच्या लक्षात आला. तो इतका प्रेमळ, दयाशील आणि कृपाळू होता की दुसऱ्यांचा आनंद तोच आपला आनंद असे त्याला नेहमी वाटत असे. त्याने यमराजाला विनंती केली, “हे प्रभो! जर मानवजातीचा बंधुभाव माणसाला कळला नाही तर मानवी जीवनाचा उपयोग काय? मला असं वाटते की नरकातल्या या लोकांना माझ्या उपस्थितीची गरज आहे. म्हणून मी माझे सर्व पुण्य त्यांना अर्पण करीत आहे.
त्यांच्या आनंदासाठी मी नरकात राहायला तयार आहे. सगळे सुखी असोत. कोणालाही दुःख नसो. सगळे शांतीचा शोध घेवोत.” केवढा हा स्वार्थत्याग! यमराज अत्यंत संतुष्ट झाले. त्यांनी नरकातील सर्वांना एकदम सोडन दिले. युधिष्ठिराला काय फळ मिळाले, माहीत आहे? इतरांना आपले पण्य देऊ केल्याने त्याला त्याच्या हजार पटीने पुण्य प्राप्त झाले!
प्रत्येकाने युधिष्ठिर प्रमाणे विश्वाच्या कल्याणासाठी, सर्व मानवजातीच्या सुखसमाधानासाठी प्रार्थना करावी. आणि स्वतःसाठी प्रार्थना करतो. आपण कदाचित् आपले आपे्ट, मित्र किंवा शेजारी यांच्यासाठी प्रार्थना करू. पण युधिष्ठिराने तो त्याला ओळखत नव्हता, जे त्याचे.
[Illustrations by Haripriya, Sri Sathya Sai Balvikas Student]
[Source: श्री सत्य साई बालविकास – 1, द्वितीय व तृतीय वर्ष]