उपक्रम

Print Friendly, PDF & Email
उपक्रम
  1. एका कागदाचे ४ भाग करून, एकेका भागावर श्लोकाच्चा प्रत्येक ओळीसाठी एक कार्ड बनवा. उदा. शान्ताकारं भुजगशयनं हे एक कार्डवर, पद्मनाभं सुरेशं दुसऱ्या कार्डवर.अशा पद्धतीने पुढील कार्ड बनवा. बालविकास गुरूनी घेण्या अगोदर हि सर्व कार्ड बनवून तयार ठेवावीत.
  2. वर्गामध्ये, मुलांना एकेक कार्ड उचलण्यास सांगावे. आठ मुले कार्ड उचलू शकतात ज्यावर श्लोकांची एक ओळ लिहिलेली आहे. जर वर्गामध्ये ८ हुन अधिक मुले असतील तर सर्वांना आळीपाळीने पुन्हा हा खेळ खेळता येईल व प्रत्येकास खेळण्याची संधी मिळेल.
  3. आता मुलांना अशा तऱ्हेने रांगेत उभे राहायला सांगा की ज्यायोगे श्लोकांच्या ओळींचा अनुक्रम पाळला जाईल.
  4. एकदा ह्या श्लोकाच्या अनुक्रमानुसार मुले उभी राहिली की प्रत्येक मुलाला त्याच्याकडे असलेल्या कार्डावरील श्लोकाच्या ओळीचे उच्चारण करण्यास सांगा.

ह्या उपक्रमामध्ये खालील बदलही करता येतील –

वेगळ्या कार्डवर श्लोकाचा अर्थही लिहू शकतो. मुलांना श्लोकांची ओळ व तिचा योग्य अर्थ ह्यांची जोडी जुळवण्यास सांगू शकतो.

उद्दिष्ट

उपक्रमाद्वारे, मुले सहजतेने श्लोक शिकू शकतात. हा उपक्रम सर्व मोठ्या श्लोकांसाठी ही वापरता येईल.