पुढील वाचन

Print Friendly, PDF & Email
संबंधित दिव्य संदेश
भगवान श्री सत्य साई बाबांच्या संदेशामधून गणेशाच्या गजमुखाचा गर्भितार्थ काय आहे?
  • हत्ती त्याच्या तीव्र बुद्धीमत्तेसाठी प्रख्यात आहे. गणेशाचे मस्तक, तीक्ष्ण बुद्धी आणि उच्चतम विवेक बुद्धी ह्यांचे प्रतिक आहे. त्याच्या शुद्ध बुध्दीमुळे त्याला बुध्दीदाता म्हटले जाते. तो भक्तांच्या प्रार्थनांना प्रतिसाद देता. म्हणून तो सिद्धी विनायक (जे मागाल ते देणारा विनायक) म्हणून ओळखला जातो.
  • जंगलामध्ये फिरताना, हत्ती इतरांसाठी मार्ग मोकळा करतो. त्याचप्रमाणे गणेशाला आवाहन करून आपल्या कार्यांचा मार्गही मोकळा होतो. हत्तीचा पाय आकाराने खूप मोठा असतो त्यामुळे चालताना तो इतर प्राण्यांच्या पायांचे ठसे मिटवून टाकतों. येथे पुन्हा ह्याचा प्रतिमात्मक अर्थ असा आहे की गणेशाला प्रथम वंदन करून सन्मानाने आवाहन केले तर तो मार्गातील सर्व विघ्नांचे हरण करतो. गणेशाच्या कृपेने जीवनयात्रा सुखद आणि आनंदी बनते.
  • हत्तीची बुद्धीमत्ता ज्याला बहाल केली आहे तो, असे विघ्नेश्वरास मानले जाते. हत्ती त्याच्या कुशाग्र बुद्धी साठी प्रख्यात आहे. तसेच तो त्याच्या स्वामीप्रती अत्यंत निष्ठावंत म्हणून ओळखला जातो. त्याचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे साई गीता (भगवंताची हत्तीण) रस्त्यावरून शेकडो गाड्या जात असतात. साईगीता त्यांच्याकडे अजिबात बघणार ही नाही. परंतु स्वामींची गाडी तेथून जाणार असेल तर तिला अंतःप्रेरणेने तिला समजेल व ती मोठ्या आवाजात चित्कार करत धावत रस्त्यावर जाईल. केवढे प्रेम आहे तिचे स्वामींवर! श्रद्धा ही हत्ती एवढी प्रचंड आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
  • हत्ती जेव्हा झाडाझुडपांमधून चालतो तेव्हा इतर प्राण्यांना जा-ये करण्यासाठी तो नेहमीचा मार्ग बनतो. सर्व प्राण्यांसाठी तो गतीनिर्धारक आहे.
उंदीर-श्री गणेशाचे वाहन
  • उंदीर गणेशाचे वाहन आहे. उंदीर हुशार आणि चैतन्यशील प्राणी आहे. ह्याचा प्रतिकात्मक अर्थ आहे की आपणही हुशार आणि उद्यमशील असायला हवे. उंदीर हे रात्रीच्या अंधाराचे प्रतीक आहे. उंदीरास रात्रीच्या अंधारात चांगले दिसते. विनायकाचे वाहन उंदीर मनुष्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या वस्तूचे प्रतिक आहे. विनायक तत्त्व मनुष्यातील सर्व दुर्गुणांचा , कुकर्माचा आणि कुविचारांचा नाश करून सद्गुण , सद्वर्तन आणि सद्विचार मनामध्ये बिंबवते.
  • बुध्दीनिष्ट विवेकाशिवाय कोणतेही कौशल्य वा शक्तीचा लाभदायक वापर करता येत नाही. उदा. अग्नीचा वा विध्युतप्रवाहाचा वापर कसा करावा आणि आपल्या गरजांसाठी त्याचा साधन म्हणून वापर किती प्रमाणात करावा हे माहिती असणे आवश्यक आहे. मनुष्याची इंद्रियेही अग्निसारखीच आहेत.त्यांच्यावर सतत नियंत्रण ठेवले पाहिजे व दक्ष राहिले पाहिजे.
  • इंद्रियनिग्रह आणि शुद्ध अंतःकरण ह्यांच्याशिवाय भक्ती यशस्कर होत नाही. गणेश अडचणींवर मात करण्यास सहाय्य करणारा देव आहे. परंतु जेव्हा प्रामाणिक प्रयत्नांमध्ये कुप्रभाव अडसर निर्माण करत असतील तर तो त्यामध्ये अडथळे आणेल. प्रामाणिक माणसांसाठी तो मार्ग मोकळा करतो. तो प्रसन्नमुख आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे सुखान्तासाठी प्रार्थना करता तेव्हा त्याचा दृष्टीक्षेप लाभदायक असतो. परंतु जेव्हा तुम्ही दुष्ट क्लृप्त्यांसाठी त्याची मदत मागितली तर तो सहाय्य करणार नाही. तो प्रणव स्वरुप ॐ कार स्वरुप आहे. तो साक्षात मंगलमूर्ती आहे.
  • विनायक गणनायक आहे. विनायकाप्रती श्रध्दा अशी विकसित केली पाहिजे जी सर्व देवदेवतांसाठी आदर्श उदाहरण ठरेल. आणि मूर्तिमंत दिव्यत्व मानून त्याची भक्ती केली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: