रामाचे पंचवटीत वास्तव्य
रामाचे पंचवटीत वास्तव्य
लवकरच राम,सीताआणि लक्ष्मणासमवेत अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले. अगस्त्यांनी रामाला गोदावरीच्या तीरावरील पंचवटी येथे प्रस्थान करण्यास सांगितले. पंचवटीला लागूनच दंडकारण्य आहे. तेथे ऋषिमुनी वास्तव्य करत असल्याचेही त्यांनी रामाला सांगितले. ते म्हणाले , “तो संपूर्ण जंगल प्रदेश शापित आहे व ते असूर यक्षांचे संचारस्थान बनले आहे.” अगस्त्यांना पूर्ण विश्वास होता की रामाच्या अस्तित्वाने तेथील सर्व असूर , राक्षस ह्यांचा संहार होईल आणि पुन्हा एकदा साधु ,संन्याशी येथे शांततेने राहू शकतील. राम, लक्ष्मण व सीतेने दंडकारण्यात प्रवेश करताच सुकलेल्या वृक्षांना पालवी फुटली व ते हीरवेगार दिसू लागले. सुकलेल्या वेलींना नवजीवन प्राप्त झाले.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून,अंतर्भूत मूल्ये त्यांच्या मनावर बिंबवावीत.
हा सर्व जो अचानक बदल घडला तो दिव्यत्वाच्या दर्शनामुळे घडला. दिव्यत्व सर्वांमध्ये विद्यमान आहे. मूलतः आपल्यामध्ये असणाऱ्या दिव्यत्वाचा आपल्याला बोध झाल्यावर , त्यानुसार जीवन व्यतीत करून आपण सर्वत्र प्रेम आणि आनंदाची कशी निर्मिती करु शकतो हे गुरुंनी मुलांना स्पष्ट करून सांगितले पाहिजे.
अंतर्भूत मूल्ये – आत्मोद्भव शिक्षण आपल्या आतमध्ये असलेली मानवी मूल्ये बाहेर आणते, आत्मोद्भव शिक्षण मूल्यांचे कृतीमध्ये रूपांतरण करते .
रामाने डेरेदार वृक्षाच्या शीतल छायेत विश्राम करत असताना लक्ष्मणास बोलावले व त्याठिकाणी त्याच्या पसंतीनुसार पर्णकुटी बांधण्यासाठी जागा निवडण्यास सांगितले. ते ऐकून लक्ष्मणाला अतीव दुःख झाले. जर त्याची स्वतःची काही पसंती , आवडनिवड असती तर तो रामाचा दास म्हणून पात्र ठरला असता का? ह्या विचाराने तो दुःखी झाला. रामाने त्याचे दुःख जाणले आणि कुटी बांधण्यासाठी एक जागा निवडली.
एक दिवस रावणाची बहिण शूर्पणखा हिने लक्ष्मणास पाहिले व त्याच्या भोवती असणाऱ्या तेजोमंडलाने ती त्याच्याकडे आकर्षित झाली. असूरांचा राजा रावण अत्यंत शक्तिशाली होता व तो लंकेवर राज्य करत होता. शूर्पणखेने सुंदर स्त्रीचे रुप धारण करून , लक्ष्मणास मोहित करण्याचा प्रयत्न केला . तिची लक्ष्मणाशी विवाह करण्याची इच्छा होती. लक्ष्मणाने तिला सांगितले की तो रामाचा दास आहे आणि तो केवळ त्याच्या आज्ञेचे पालन करतो. त्यानंतर शूर्पणखेच्या मनात रामाशी विवाह करण्याची इच्छा होती. परंतु तिचा प्रयत्न अयशस्वी झाला. सीता तिच्या मार्गातील अडथळा आहे ह्या विचाराने, सीतेचा नाश करण्यासाठी तिने सीतेवर हल्ला केला. रामाच्या आज्ञेने लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक आणि कान कापले. वेदनेने विव्हळत तिने मदतीसाठी खर आणि दूषण ह्या दोघा असूर भावांकडे धाव घेतली. ते ही त्या जंगलात वास्तव्यास होते. लवकरच ते दोघं १४००० नरभक्षक दैत्यांचे सैन्य घेऊन चालून आले. रामाच्या आदेशानुसार लक्ष्मणाने सीतेला एका गुहेत नेले व तो बाहेर पहारा देण्यासाठी थांबला. राम सस्मित चेहऱ्याने सैन्यास सामोरे गेला व त्याने खर आणि दूषण ह्यांच्या सह समस्त सैन्यास धराशाही केले.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवली पाहिजेत.
लक्ष्मण रामाच्या चरणी पूर्ण शरणागत होता. रामाने सांगितलेल्या सर्व सूचनांचे त्याने तंतोतंत पालन केले. मग ती पर्णकुटी बांधण्यासाठी जागेची निवड करण्याची सूचना असो वा शूर्पणखेला पळवून लावण्याची वा राम राक्षसांशी लढत असताना सीतेला पर्णकुटीपासून दूर नेऊन तिचे संरक्षण करण्याची सूचना असो.
स्वामींची मुले ह्या नात्याने आपण स्वहितासाठी , आपली सर्व कर्म स्वामींना शरणागत केली पाहिजेत.
अंतर्भूत मूल्ये- गुरु आज्ञेचे पालन करा -दुष्टांचा सामना करा. – अखेरपर्यंत लढा द्या – खेळ समाप्त करा.