ओम श्री राम भजन – उपक्रम
ओम श्री राम भजन – उपक्रम
उपक्रम: साईं राम खेळ
सर्व मुलांनी गोल करून उभे रहावे. खेळ प्रमुख हा परीक्षक असेल. सर्व मुलांनी आपले दोन्ही हात तळवे उघडे ठेवून गोलाच्या केंद्राच्या दिशेने सरळ हात ताठ ठेवावेत. जेव्हा साई हा शब्द म्हटला जाईल तेव्हा प्रत्येकाने तळव्यांची पुढची बाजू दाखवायची आहे आणि जेव्हा राम हा शब्द उच्चारला जाईल तेव्हा प्रत्येकाने तळव्यांची मागची बाजू दाखवायची आहे. जर तळव्यांची मागची, पुढची बाजू दाखविण्यात काही चूक झाली तर ते मूल खेळातून बाद झाले. असे समजावे. राम शब्द साईच्या आधीही म्हणता येईल किंवा त्या उलट करता येईल किंवा तोच शब्द पुन्हा म्हणता येईल. जे मूल सर्वात शेवटी राहिल ते जिंकले म्हणून घोषित करता येईल.