सत्य हाच परमेश्वर

Print Friendly, PDF & Email
सत्य हाच परमेश्वर

कोल्हापूरमधील एका शाळेत वर्ग चालू होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यास अंकगणितामधील काही प्रश्न सोडविण्यास दिले होते. थोड्याच वेळात विद्यार्थ्यांमध्ये चालू असलेली कुरकुर त्यांनी ऐकली. गुरुजींनी मुलांना दिलेली गणिते त्यांना अजून न शिकवलेल्या पाठामधून निवडली असल्याने मुले तक्रार करत होती. त्यामुळेच मुलांना ते प्रश्न सोडवता आले नाहीत.

Gopal's love for truth

नंतर शिक्षकांना पण त्यांची चूक लक्षात आली. परंतु वर्गातील गोपाळ नावांचा अतिशय बुद्धिमान मुलगा शांतपणे आपल्या उत्तरांच्या वहीत काहीतरी लिहित असल्याचे त्यांनी पाहिले. ते त्याच्याजवळ गेले आणि गोपालने सर्वच गणिते अगदी बिनचूक सोडवल्याचे त्यांना दिसले. ते म्हणाले,” वा! वर्गात शिकवण्यापूर्वीच तू सर्व गणितं अगदी हुषारीने सोडवली आहेस. गोपाळ, छान केलंस! जा आणि पुढच्या बाकावरची पहिल्या क्रमाकांची जागा घे.

गोपाळ उभा राहिला आणि नम्रतेने म्हणाला,” गुरूजी, माझ्या स्वतःच्या बुध्दीने मी ती गणितं सोडवली नाहीत. गेल्या आठवड्यात आमच्याकडे कोल्हापूरला आलेल्या माझ्या एका भावाने ती मला शिकवली आहेत. अंकगणित हा त्याचा आवडीचा विषय आहे. हीच गणितं त्याने मला शिकवली असल्याने, मी ती सोडवू शकलो. म्हणून पहिला नंबर मिळवायला मी पात्र नाही.

गोपाळचे सत्याबद्दलचे प्रेम पाहून गुरुजींना खूप आनंद झाला त्याने या गोष्टीचे कोणतेही श्रेय आणि त्याची स्तुती नाकारली होती.

हा मुलगा म्हणजे दुसरा कोणी नसून, ते होते महान समाजसुधारक गोपाल कृष्ण गोखले. त्यांना महात्मा गांधीजी त्यांच्या अनेक गुरूंपैकी एक गुरु मानत असत. आणि त्यांचा आदर करत असत. गोपाल कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाजाची’ स्थापना केली होती. ही संस्था आजही आपल्या देशातील गरीब, शोषितसमाज आणि मागास वर्गीय लोकांसाठी खूप मोलाचे कार्य करीत आहे. व त्यासाठी नांवाजलेली आहे.

प्रश्न
  1. गोपाळच्या शब्दांनी गुरुजींना आनंद का झाला?
  2. अ) जर आपण श्रेय किंवा स्तुतीसाठी अपात्र असलो, तर ते का स्वीकारु नये? ब) आपण त्याचा स्वीकार केला तर काय होईल?
  3. ‘सत्य हाच परमेश्वर’ या बद्दलच्या तीन गोष्टींमधून आपण काय शिकतो?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: