वाया घालवू नका, गरजू होऊ नका
वाया घालवू नका, गरजू होऊ नका
प्रत्येक वस्तूचा काहीतरी उपयोग असतो आणि तिचे काहीतरी मूल्य असते. एखाद्या सापाचे विषसुध्दा, त्याची लस बनविली तर, सर्पदोश झालेल्या माणसाचे प्राण वाचवू शकते. तरीही नाणसे पुष्कळवेळा अन्न, द्रव्य, वेळ आणि शक्तीचा अपध्ययच करीत असलेली आपण पाहतो.
सगळ्या वस्तूंचा काळजीपूर्वक व बुध्दीने केलेला वापर म्हणजे काटकसर. काटकसर केली नाही तर एखादा श्रीमंत मनुष्यसुध्दा अगदी थोडया काळात दरिद्री होऊन जाईल तर काटकसरी मनुष्य, श्रीमंत नसला तरी श्रीमंतापेक्षा सुखाचे जीवन जगू शकतो.
महात्मा गांधींची काटकसर त्याच्या अनुयायांना अनेकदा आश्चर्यचकित करीत असे. एकदा गांधीजींच्या आश्रमात राहिलेल्या मीराबेन या इंग्लिश भगिनीला महात्माजी सगळ्या खोलीभर काहीतरी शोधत दिसले त्याची चिंताक्रांत मुदा पाहून मीराबेनने त्यांना विचारले, “आपण काय शोधत आहात बापूजी? काही हरवले आहे का?” बापूजी म्हणाले, “होय, पेंसिल हरवली आहे.” “केवढी होती? नवीन होती का?” त्यांना शोधायला मदत करायच्या इच्छेने मीराबेनने विचारले. “अग तुझ्या अंगठ्याच्या आकाराएवढी. ती मी नेहमी वापरत होतो ना तीच खोलीतल्या सगळ्यांना आश्चर्य वाटत होते की त्या पेन्सिलीच्या इतक्याशा तुकड्यासाठी बापूजी इतकी काळजी का करत आहेत.
त्यांच्यापैकी कोणीतरी एक नवीन पेन्सिल घेऊन आला आणि त्याने ती बापूजींना दिली. ते म्हणाले,”मला नवी पेन्सिल नको. गेले तीन आठवडे जी मी वापरत होतो, तीच हवी. त्यामुळे शोध चालूच राहिला आणि शेवटी एका फायलीत तो हरवलेला तुकडा सापडला. “ह” एखाद्या भयंकर पापापासून बचावल्यासारखा चेहरा करून बापूजी म्हणाले. त्यांच्या चेहल्यावर हास्य होते.
एकदा बापूजी मीराबेनसह दौऱ्यावर गेले होते. ते एका खेड्यात उतरले होते. बापूजींना जेवणामध्ये मध घ्यावयाची सवय होती, परंतु आश्रमातून निघताना मीराबेन मधाची बाटली घ्यायचे विसरून गेल्या होत्या. त्यांनी बाजारातून मधाची नवीन बाटली आणली. जेवणाची सर्व व्यवस्था झाली, पानावर बसता बसता बापूजींचे लक्ष त्या नया कोऱ्या बाटलीकडे गेले आणि त्यांनी मीराबेनना वापरात असलेल्या बाटलीचे काय झाले म्हणून विचारले. “मी, ती आणायला विसरले, बापूजी!” मीराबेन म्हणाल्या “आणि म्हणून तू नवीन विकत आणली.” बापूजीनी किंचित् नाराजीने विचारले, “आपण जो पैसा खर्च करतो तो लोकांचा आहे. त्याचा अपव्यय करणे परवडत नाही आपणाला! आपण जी बाटली वापरत आहोत ती रिकामी झाल्याशिवाय नी हा मध घेऊ शकत नाही” आणि बापूजींनी जसे म्हटले तसेच केले.
संपूर्ण दौरा संपेपर्यंत त्यानी मध घेतला नाही आणि जेव्हा आश्रमात परत आले तेव्हा जुनी मधाची बाटली त्यांची वाट पाहत होती.
प्रश्न:
- काटकसर म्हणजे काय? आपण तिेचे आचरण का केले पाहिजे?
- समजा तुम्हाला शंभर रुपयांचे बक्षीस मिळाले तर त्या पैशाचे तुम्ही काय कराल?
- पुष्कळदा लोक पैसा, वेळ आणि शक्ती यांचा अपव्यय करतात. त्याची प्रत्येकी चार उदाहरणे द्या.