सत्य हाच देव
सत्य हाच देव
बाळ गंगाधर टिळक हे महापुरुषांपैकी एक होते. ब्रिटिश राज्य असताना भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला.
विद्यार्थीं म्हणून बाळ त्याच्या शिक्षकांना माहीत होता, तो अत्यंत हुशार, शिस्तीचा आणि सद्वर्तीनी विध्यार्त्यांपैकी एक म्हणून ! पण एके दिवशी शिक्षकांपैकी एकाला विलक्षण अनुभव आला. मधल्या सुटीमध्ये कोणीतरी शेंगा खाल्ल्या होत्या आणि त्यांची साले गुरुजींच्या टेबलाखाली टाकली होती. आत येणाऱ्या कोणाही मुलाने त्याची विशेष दखल घेतली नाही. घंटा झाली आणि सर्व मुले ल्या जागी जाऊन बसली. वर्गात पाऊल ठेवताना गुरुजींना पाशी पसरलेली साले दिसली व ते संतापले, “ही खोडी कुणी केली?” ते गरजले. विद्यार्थ्यांकडून काहीच उत्तर आले नाही. ” मी पुन्हा विचारतोय.” गुरुजी आणखी मोठ्याने ओरडले, ” ही खोडी कुणाची आहे? जर अपराधी मुलगा उभा राहात नसेल तर ज्यांना माहीत आहे त्यांनी त्याचं नाव सांगावं?”
मुले एकमेकांकडे पाह लागली. या बहु तेकांना खरेच विचार पडला होता की हा अपराधी कोण असेल? कोणी उभे राहिले नाही. कोणी एक शब्द बोललेही नाही.
रागायलेल्या गुरुजींनी मग टेबलावरची छडी उचलली आणि म्हणाले, “तुमच्या पैकी कोणीच मला खोडी करणाऱ्या मुलाला पकडायला मदत करीत नाही तर ठीक आहे. मी प्रत्येकाला छडी मारणार आहे.” गुरुजी मुलांच्या पहिल्या रांगेजवळ येऊ लागले तेव्हा बाळ उभा राहिला व धीटपणाने म्हणाला, “गुरुजी, आमच्यापैकी पुष्कळांना अपराधी कोण आहे हे खरंच माहीत नाही. अनेकांनी तर जमिनीवरली सालंसुद्धा पाहिलेली नाहीत. सुट्टीत आम्ही सर्व वर्गाच्या बाहेर गेलो होतो. दुसऱ्या वर्गातल्या एखाद्या मुलानेसुध्दा हो खोडी केली असेल. निरपराध मुलांना का म्हणून छड्या बसणार ?”
बाळाचे सद्वर्तन माहीत असल्यामुळे गुरुजींनी आपला राग आवरायचा प्रयत्न केला पण व्यर्थ! “जास्त शहाणपणा करफ नकोस, बाळ!, ते म्हणाले, “माझी खात्री आहे की तुमच्यापैकी काहींना अपराधी माहीत आहे. पण ते जर बोलत नसतील तर साऱ्या वर्गाला शिक्षा करणं मला भाग आहे.” बाळ ताबडतोब पण विनयशीलतेने म्हणाला, ” पण गुरुजी मला असं वाटतं की हे बरोबर नाही आणि न्याय्यही नाही. मी आमच्या निरपराधित्वाविषयी जे तुम्हाला सांगितले ते सत्य आहे, निरपराध व्यक्तींना शिक्षा झालेली मला पाहायची नाही, म्हणून कृपया मला वर्गाबाहेर जाण्याची परवानगी द्या. शिक्षक काहीही बोलण्यापूर्वीच बाळने आपली पुस्तके उचलली आणि तो वर्गाबाहेर चालता झाला, बाळच्या धैर्याचे आणि न्याय व सत्य यांविषयीच्या प्रेमाचे सर्व मुलांना खूप कौतुक वाटले. खुद्द त्या शिक्षकांनासुध्दा त्याची स्तुती केल्याशिवाय राहतीवले नाही. त्यांनी वर्गाकडे पाहिले आणि ते म्हणाले, “बाळ सामान्य मुलगा नाही. जर प्रत्येक विद्यार्थी त्याच्या इतकाच सचोटीचा व शिस्तीचा बनेल तर आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल ठरेल.”
सत्य व न्याय याविषयींच्या प्रेमाने बाळला आपल्या देशाचा पुढारी बनविले. त्यांना ‘लोकमान्य टिळक’ म्हणू लागले कारण त्यांनी, आपल्या सद्गुणांनी साऱ्या देशाचे प्रेम, आदर व वाहवा मिळवली.
प्रश्न:
- शिक्षकांची चूक कोणती होती?
- बाळ वर्गाबाहेर का गेला?
- समजा, या घटनेच्या दिवशी तुम्ही बाळच्या वर्गात असतात तर तुम्ही काय केले असते?