राष्ट्रध्वज & राज्यचिन्ह

Print Friendly, PDF & Email

राष्ट्रध्वज

National Flag

  • राष्ट्रध्वजात तीन रंगाचे आडवे पट्टे आहेत.
  • गडद केशरी ( केसरिया) सर्वात वर आहे.: पांढरा पट्टा मध्यभागी आणि: गडद हिरवा तेवढ्याच आकाराचा पट्टा सर्वात खाली आहे.
  • ध्वजाच्या रुंदीचे लांबीबरोबरचे प्रमाण दोनास तीन आहे.
  • पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी असलेले सुंदर निळ्या रंगाचे चाक चक्राचे प्रतिनिधित्व करते.
  • सर्वात वरचा केशरी रंग देशाच्या सामर्थ्याचे आणि धैर्याचे प्रतीक आहे.
  • मधला पांढरा पट्टा शांतीचे आणि सत्याचे प्रतीक असून त्यावर धर्मचक्र आहे.
  • हे धर्मचक्र कायद्याचे चक्राचे प्रतीक असून, ते ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोकाने उभारलेल्या सारनाथ सिंह स्तंभातून (लायन कॅपिटल) घेतले आहे.
  • त्याचा परिध पांढऱ्या पट्ट्याच्या रुंदी एवढा असून त्याला २४ आर्या आहेत.
  • चक्र असे दर्शविते की गतीत जीवन आहे आणि गती थांबणे म्हणजे मृत्यू समान आहे.
  • हिरवा रंग सुपीकता, वाढ आणि भूमिच्या पावित्र्याचे प्रतीक आहे.
  • २२ जुलै १९४७ रोजी भारतीय मतदारसंघाने निवडलेल्या सभेने राष्ट्रध्वजाच्या या नमुन्याचा स्वीकार केला.

राज्यचिन्ह

National Emblem

  • हे राज्यचिन्ह अशोकाच्या सारनाथ सिंहस्तंभातून (सारनाथ लायन कॅपिटल) निवडण्यात आले आहे.
  • भारत सरकारने २६ जानेवरी १९५० मध्ये राज्यचिन्ह म्हणून हे स्वीकारले असून , यांतील तीन सिंह दृश्यमान आहेत. पण चौथा सिंह मात्र दृष्टीस पडत नाही.
  • वरील भागातील पहिल्या थरात मध्यभागी चक्र असून त्याच्या उजवीकडे बैल आणि डावीकडे घोडा आहे.
  • मुंडकोपनिषदातील ‘सत्यमेव जयते’ हे शब्द त्याच्याखाली देवनागरी लिपीत कोरले असून त्याचा अर्थ ‘सत्याचाच विजय होतो’ असा आहे.
वर्गासाठी सूचक उपक्रम:

वर्गात वैदिक आज्ञा ‘सत्यं वद, धर्मं चर’ यावर चर्चा करा. मुलांना राष्ट्रध्वज व राज्यचिन्ह वर्गात दाखवा; आणि राष्ट्रीय चिन्हे आणि वेदमंत्र यांतील साधर्म्य मुलांना समजावून सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: