देवाबद्दलचे सत्य
देवाबद्दलचे सत्य
एकदा श्रेष्ठ साधु उद्दालक आरुणीला आपला शिष्य श्वेतकेतूला ब्रह्माचे ज्ञान शिकवायचे होते. त्यांनी साध्या युक्तीचा अवलंब केला. त्यांनी जवळ असणाऱ्या एका मोठ्या वादाच्या झाडाकडे बोट दाखवले आणि आपल्या मुलाला त्या झाडाचे एक पिकलेले फळ घेऊन येण्यास सांगितले. जेव्हा त्यानी एक छोटेसे तांबडे बोरासारखे फळ आणले तेव्हा त्यांनी मुलाला सांगितले, “मुला, त्याचे दोन तुकडे कर.”
“हे बघा मी त्याचे दोन तुकडे केले.”
“त्यात तुला काय सापडले ?”
“अगणित छोट्या बिया, आणखी दुसरे काय असणार ?”
“बरे, आता त्यातील एक छोटी बी घे आणि तिचे आणखी तुकडे कर.”
“बरे, हे पहा मी तुकडे केले.”
“आता तुला काय सापडले ?”
“काही सुद्धा नाही.”
माझ्या लाडक्या मुला, हे मोठे झाड काह शून्यातून आले नाही. केवळ तुला त्या बीमध्ये असणारी सूक्ष्म गोष्ट पाहता येत नाही. त्यातून हे मोठे झाड निर्माण झाले आहे. हीच ती शक्ती आहे, तेच अदृश्य चैतन्य आहे. जे सगळीकडे व्यापलेले आहे आणि प्रत्येकात आहे श्रद्धा ठेव, हेच ते चैतन्य सर्व अस्तित्वाच्या मुळाशी आहे. श्वेतकेतु , तेच चैतन्य तूही आहेस.”
“बाबा, हे सर्व गोंधळात टाकणारे आहे. जरी मे असलो तरी मला या सगळ्याचा अनुभव कसा येणार?”
उद्दालक म्हणाले, “एक गोष्ट कर. मिठाचे काही खडे घे. झपायला जाताना ते एका पाणी असलेल्या भांड्यात टाक, सकाळी ते माझ्याकडे घेऊन ये.”
जसे वडिलांनी सांगितले तसे त्या आज्ञाधारक मुलाने केले आणि दुसऱ्या दिवशी पाण्याचे ते भांडे घेऊन तो वडिलांकडे आला.
वडील म्हणाले “मुला, कृपया त्यातील मीठ बाजूला काढ.”
श्वेतकेतु वैतागला आणि म्हणाला “बाबा, तुम्हाला काय म्हणायचे आहे? पाण्यातून मीठ बाजूला करणे कसे काय शक्य आहे ?”
“बरे असू दे, पाण्याच्या वरील स्तराची चव घे. कसे काय लागले ?”
“ते खारट आहे आणि ते असे असणारच.”
“भांड्याच्या मधले आणि तळातील पाणी घे आणि मला सांग कशी चव लागते?”
“सर्वच खारट लागते, आणखी कसे लागणार ?”
“प्रिय मुला, पाण्याच्या भांड्यातील मिठाप्रमाणेच सर्वव्यापी चैतन्याचे आहे. हेच ते सूक्ष्य चैतन्य आणि ते तूच आहेस, श्वेतकेतू”
“प्रिय बाबा, हे सर्व कसे काय आत्मसात करायचे? दिसायला सोपे दिसणारे हे कळायला फार अवघड वाटते.”
उद्दालक म्हणाले, “आत्म्याचा साक्षात्कार कसा करुन घ्यावा ते तुला आता सांगतो. समजा अनोळखी जंगलात एखाद्याचे डोळे बांधून त्याच्या नेहमीच्या निवासस्थानापासून दूर नेले तर काय होईल? तो त्याचे घर कसे शोधून काढील? ज्या क्षणी त्याच्यावर हे सोपवले जाईल त्या क्षणी तो आपल्या डोळ्यावरचा पडदा बाजूला करील. नंतर ज्या ठिकाणाहून त्याला आणले त्याच्या आजूबाजूला तो चौकशी करीत फिरेल. तो एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात जाईल मग शेवटी त्याला कोणी भेटेल जो त्याला योग्य दिशा दाखवील. अशाप्रकारे तो त्याच्या घरी जाईल. अशा प्रकारे अरण्यात भटकत असणाऱ्या आम्हाला आमचे अध्यात्मिक घर शोधून काढायचे आहे. चैतन्य हेच एकमेव सत्य आहे ज्याच्याकडे आम्हा सर्वांना पावले उचलायची आहेत. हे श्वेतकेतू ते तूच आहेस.” असे छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक आरुणी म्हणाले.
प्रश्न
- उद्दालक केतूला काय सांगण्याचा प्रयत्न करीत
- त्यांनी त्याला काय आणायला सांगितले?
- त्यांनी त्याला काय करायला सांगितले?
- देव सर्वव्यापी आहे हे वेतकेतूला कसे समजले ?