दृश्य
सुनिल : आज फुटबॉल खेळताना किती मजा आली!
विकी : हो ना, सुनिल तुझा नवीन फुटबॉल छान आहे.
सुनिल : अरे, ती माझी वाढदिवसाची भेट आहे. आता मी तो वर टाकतो अन हातात पकडतो. (त्याने बॉल उंच उडवला पण त्याला कॅच घेता आला नाही.)
अनिल : अरेरे तुझा नवीन बॉल नळाखाली असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडलाय.
सुनिल : अरे देवा !!!
अनिल : चल आपण तिकडे जाऊन तो घेऊन येऊ. (सुनील त्या डबक्यामधून बॉल आणतो.)
सुनिल : चल जाऊ या.
अनिल : हो, जाऊ या --- अरे, तो नळ चालू आहे, पाहा, तू बंद नाही केलास?
सुनिल : मी पाहिले--- पण आता आधीच खूप उशीर झालाय, आपण घरी जाऊ या.
अनिल : अरे, पण त्या नळाचं काय?
विकी : ते माळीबुवा बघतील. ते त्यांच काम आहे.
अनिल : थांब --- मी तो नळ बंद करुन येतो.
विकी : अनिल, ते आपलं काम नाहीय. इथे आजूबाजूला कितीतरी लोकं आहेत. त्यांनाही त्याचं काही वाटत नाही.
अनिल : आपण त्यांच्यासारखं का व्हावं? बघ किती पाणी वाया जातय! शिवाय तेथे कोणी पाय घसरून पडले तर इजाही होऊ शकते.
सुनिल : तू म्हणतोस ते बरोबर आहे अनिल. थांब मीच जाऊन नळ बंद करून येतो. (त्याने जाऊन नळ बंद केला.)
अनिल : चांगल काम केलस सुनील. आपण नेहमीच आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि ते वाया जाणार नाहीत हे पाहिले पाहिजे. दुसरे कोणीतरी ते काम करतील ह्याची प्रतीक्ष करु नका. वा दुसरे कोणी करत नाहीत म्हणून तुम्ही ते काम करण्याचे टाळू नका. सर्वांप्रती आस्था बाळगा.