काही प्रारंभिक चमत्कार

Print Friendly, PDF & Email
काही प्रारंभिक चमत्कार
अन्नाची समृद्धता

“मी साईबाबा आहे” असी घोषणा करून स्वामी उवरकोंड्याहून आल्यावर सुबम्माकडे राहात असत. तिचे घर मोठे होते पण भक्तांची संख्या जशी वाढायला लागली तसे एका शेडचे आयोजन करावे लागले. तरी बाबा सांगत,
नव्हे त्यांचा आग्रहच असे की दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाला भोजन हे मिळायलाच हवे. सुबम्माच्या कुटुंबातल्या एका वृद्ध स्खीचा फार सुंदर अनुभव आहे. ‘अन तयार झाल्यावर सारखे असे वाटायचे की जेवण कमी पडेल, पण बाबा दोन नारळ मागवून एकमेकांवर आपटून दोन सारखे भाग करीत व त्यातील पाणी सगळ्या अन्नावर शिपडीत आणि त्यानंतरच वाढायला सुरुवात करायला सांगत. आलेले अतिथी कधीही उपाशी मात्र राहिले नाहीत हे खरं!”

कल्पवृक्ष

जशीजशी यात्रेकरूंची संख्या वाढायला लागली तशी जुनी शेड छोटी पडायला लागली. प्रार्थना व भजनासाठी सगळे लोक तर तिथे येऊ शकत नव्हते. त्यामुळे बाबा रोज चित्रावती नदीच्या किनाऱ्यावरील वाळूत सगळ्या भक्तांना घेऊन जात व तिथेच भजन करत. नदीच्या डाव्या अंगाला एका छोट्याश्या टेकडीवर एक चिचेचा वृक्ष होता. तो कल्पवृक्ष नामे प्रसिद्ध झाला तोही याच दिवसातली गोष्ट.
बाबा नेहमी आपल्या भक्तांना त्या झाडाखाली घेऊन जात व वेगवेगळ्या फांदीवरून, संत्रे, आंबा अंजीर वगैरे तोडून देत. कारण बाबा स्वतः प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याची क्षमता ठेवून असल्यानेच ते सामान्य वृक्षालाही कल्पवृक्ष बनवू शकत होते.

त्याच टेकडीवर अनेक भाग्यवंतांना बाबांचे चमत्कार अनुभवायला मिळाले. काहींना बाबांच्या डोक्याभोवती प्रभामंडळ दिसले तर काहींना भ्रूमध्यातून डोळे दिपविणारा प्रकाशपुंज दिसला. कोणाला पूर्ण चंद्रबिंबात सत्य साईंचे रूपदर्शन झाले. बाबांनी याच स्थानी दशावताराचे पण दर्शन कितीकांना घडविले.

साई, कृष्णाच्या रूपात

एक दिवस बाबांनी झाडाच्या फांदीला झुला बांधला व झोके घेऊ लागले.. भक्त आनंदाने पाहात असताच एकाएकी ते म्हणाले, ‘पहा’! आणि दिसले वृंदावनवासी श्रीकृष्ण सजविलेल्या झुल्यावर झुलतो आहे. काहींना हे अलौकिक दृश्य बघून घेरी आली बाबांनी स्वहस्ते अक्षत निर्माण करून त्यांच्यावर शिपडताच त्यांना शुद्ध आली. एकदा एका कृष्णभक्ताला कृष्णाच्या मधुर बासरीचे स्वर ऐकवले, ते कसे? तर त्याला आपल्या छातीला कान लावायला सांगून. तो भक्त किती आनंद विभोर झाला असेल हे सांगणे नकोच. बासरीचा दृष्टान्त देऊन बाबांनी फार सुंदर उपदेश केला आहे.

बासरीसारखे पोकळ आणि सरळ राहा. म्हणजेच कुटिलता आणि षड्रिपुंपासून मुक्त व्हा आणि जीवनाच्या बासुरीतून ईश्वरी आराधनेचे सूर आळवा. वेंकम्पासाठी चित्र.

वेंकम्मासाठी चित्र

सत्याची बहीण वेकम्मा शिर्डीसाईबाबांचे एक चित्र खूप दिवसांपासून बाबांजवळ मागत होती. कारण बाबा त्यांच्यावरची भजने रचून नेहमी गात असत. बाबांनी बचन दिले की या गुरुवारी ते चित्र तुला मिळेल. परंतु एक दिवस आधीच ते उरवकोंडा येथे निघून गेले. पण वेकम्माला हा विश्वास होता की एकना एक दिवस ते चित्र आपल्याला जरूर मिळेल. सारे गाव गाढ झोपेत असता अर्ध्या रात्री, अम्मयी, अम्मयी असा आवाज त्यांना ऐकू आला आणि आवाज बंद झाला. तिला वाटले शेजारी असेल कुणी. तेवढ्यात तिला मटका ठेवलेल्या ठिकाणी सरसर आवाज आला. तेव्हा साप किंवा उंदीर तर नसेल, या आशंकेने तिने दिवा घेऊन शोधायला सुरुवात केली तो काय आश्चर्य! तिथे शिर्डी साईबाबांचे चित्र तिला प्राप्त झाले. उरवकोंडा येथे असूनही बहिणीसाठी पर्तीला चित्र पाठवण्याचा चमत्कार बाबांनी केला. आजही वेकम्माच्या परिवारात ते चित्र जतन करून ठेवलेले आहे.

बाबांना कोणीही क्षति पोचवू शकत नाही.
झोपडीत लागलेली आग

काही लोक असे होते की ते बाबांचा द्वेष करीत असत. एक दिवस बाबा एका झोपडीत झोपले आणि दहा मुले बाहेर झोपली होती. सहा ते नऊ वर्षापर्यंतची ती मुले सगळी निरागस वयाची. झोपडीचे दार बंद करून बाहेरून कुलूप लावून काही दुष्टांनी छताला आग लावली. आता वाळल्या गवताचे ते छत. पेटायला कितीसा वेळ लागणार! मुले आग बघून घाबरून जोरजोराने ओरडू लागली. ‘राजू, राजू हे काय आहे? आम्ही तुझ्याशिवाय कसे जिवंत राहू रे?”

मुले बिचारी डोळे बंद करून राजू राजूचा पुकारा करू लागली. जसे काही एखादा मंत्र जपच. एकाएकी मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊन झोपडीला लागलेली आग विझली. पण गंमत अशी की फक्त तेवढ्याच भागात पाऊस पडला बाकी आजूबाजूला कोरडे ठक्क! मुलं तर चमत्काराने आवाक झालीत. तेव्हा बाबा म्हणाले,

“॥ धर्म इव हतो हन्ती, धर्मो रक्षति रक्षितः ॥”

‘तुम्ही जर धर्माला नष्ट कराल तर धर्म तुम्हाला नष्ट करेल आणि तुम्ही धर्माचे रक्षण कराल तर धर्मही तुमचे रक्षण करेल.’

पंचतत्त्वांवर नियंत्रण हे स्वामीच्या सर्व शक्तिमान असण्याचे लक्षण होय. सुबम्माला जेव्हा या घटनेबद्दल कळले तेव्हा तिने त्या दुष्टांना पकडले. ती गावातली श्रीमंत स्त्री आणि गाव जमिनी पण तिच्याच मालकीच्या. त्यामुळे त्या दुष्टांना तिने गाव सोडून जाण्याची शिक्षा फर्मावली. पण स्वामींनी स्वतः तिचे हात हातात घेऊन त्यांना दंड न देण्याबद्दल आणि माझ्यासाठी म्हणून त्यांना क्षमा कर असे विनवले, त्यांना इथून हाकलू नकोस असे ही सांगितले. असा हा प्रेमल आणि क्षमाशील स्वभाव,

विषयुक्त वडे

काही लोकांनी साईंना विष देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. कुठलासा सणाचा दिवस होता. बाबा काही घरांमध्ये गेले आणि थोडं थोडं खाऊन निघाले पण जिथे विषयुक्त भोजन बनविले होते तिथे मात्र त्यांनी जरा जेवणात जास्तच रस घेतला विशेष करून वडे वारंवार मागून खाल्ले, पण हीही दक्षता घेतली की मित्रांनी मात्र ते वडे खाऊ नयेत. सुबम्माकडे आल्यावर त्यांनी वड्यांबद्दल खरं काय ते सांगितले.

त्या कुटुंबाच्या मुर्खतेवर खूप परिहास केला आणि आख्खे वडे उलटीद्वारे बाहेर काढले. काही लोकांनी गुपचुप परीक्षण करून बघितले तर खरच ते विषारी होते. यावरही स्वामी म्हणाले, ‘लोक काही मला मारणार नव्हते. त्यांनी तर माझी परीक्षा घेतली की विषापासून स्वामी स्वतःचे रक्षण करू शकतात की नाही.’ भगवानांची ही एक प्रकारे शिकवणच म्हणायची की, वाईटाच्या बदल्यात नेहमी चांगलच द्याव! धन्य बाबा तुम्ही !

बाबा

ईश्वरम्माने एक दिवस सुबम्मांजवळ आपला अनुभव कथन केला की सत्याने त्यांना एका वृद्धाच्या रूपात दर्शन दिले. तो रोमांचक अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, एक दिवस सत्या म्हणाला की, ‘शिर्डीचे बाबा इथेच उपस्थित आहेत आणि लगेच खडावांचा ठकठक आवाज ऐकू येऊ लागला. जसे कोणी खडावा घालून फिरताहेत. बाबा जिथे बसले होते तिथपर्यंत जाऊन नंतर तो बंद झाला. हो अनुभूती इतकी अतर्क्य होती की ईश्वरम्मा एकदम ओरडल्या, “कोण फिरतय घरात खडावा घालून?”

अशीच अनुभूती त्यांच्या वडिलांनाही आली. पेनुकोंडाहून आलेल्या पाहुण्यांमध्ये एक कृष्णम्मचारी नावाचे वकील सुद्धा होते. त्या सगळ्यांनी मिळून वेंकप्पांवर आरोप केला की ते दांभिक आहेत आणि भोळ्याभाबड्या गावकऱ्यांना बनावट गोष्टी सांगून चुकीच्या मार्गावर नेत आहेत. वेंकप्पांनी व्यथित होऊन सत्याला विनविले की तुझ्या दिव्यत्वाचा साक्षात्कार आता तूच दाखव. सुबम्मा पण तिथे पोचल्या. सत्याने सुबम्मांसहित बाकी लोकांना आतल्या खोलीत बोलावून शिर्डी साईंच्या समाधीचे दर्शन घडविले. त्यांना असे जाणवले की शिर्डीला आपण मोकळ्या मैदानात असून फुलांनी सजलेली समाधी बघतो आहोत. उदबत्तीचा दरवळ आणि ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने वातावरणात पवित्रता नांदते आहे. मारुतीचे मंदिर आणि कडुलिंबाचे झाडसुद्धा डोळ्यांनी साक्षात दिसले. वेंकप्पाना सुद्धा ते दृश्य बघायला मिळाले. ज्या लोकांनी अविश्वास प्रकट केला होता ते आता क्षमायाचना करून सत्याचे देवत्व मान्य करते झाले. माता पित्यांना पण आता सत्या आणि शिर्डी साईंचे एकत्व पटले होते.

आता मद्रास येथील ही घटना बघा. तिथे एक शिर्डी साईची भक्त असलेली स्त्री रहात होती. एकदा तिचा मुलगा अत्यंत आजारी असल्याने त्याच्या प्राणरक्षणासाठी प्रार्थना करीत तिने त्याला बाबांच्या फोटोसमोर झोपविले. काही वर्षांनी सत्य साईबाबांबद्दल कळल्याने ती आपल्या मुलाला घेऊन पर्तीला आली. तो आता चांगला तरुण झाला होता. बाबांनी त्या दोघांना पहाताक्षणीच म्हटले, “माते! तू तर पंधरा वर्षापूर्वीच याला माझ्या संरक्षण छायेत पाठविलेस.” तिची खात्रीच पटली. शिर्डी साईच पुन्हा प्रकट झाले आहेत.

सहजता, गंभीर ज्ञान, सर्वांठायी प्रेम, सर्वशक्तिमत्ता आणि सर्वव्यापकता असणारे असे हे दोन्ही अवतार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: