तरुण परिक्षक

Print Friendly, PDF & Email
तरुण परिक्षक
उद्दिष्ट:

परस्परसंवादी व ज्ञान देणारा खेळ

संबंधित मूल्ये:

विवेकबुद्धी (योग्य/अयोग्य भेद करण्याची क्षमता)

आवश्यक साहित्य:

काही नाही

गुरुंसाठी पूर्वतयारी:

काही नाही

खेळ कसा खेळायचा:
  1. गुरूने मुलांना वर्तुळ करून बसायला सांगावे.
  2. एक मुलगा मध्यभागी उभा राहील आणि जणूकाही एखादी चुकीची कृती करत आहे, असा अभिनय करेल. (उदा. रस्त्यावर थुंकणे किंवा भिंतीवर काहीतरी लिहिणे.)
  3. आवश्यकतेनुसार ते मूल काही शब्दप्रयोग करू शकते.
  4. इतर मुलांना एक मिनिटाचा कालावधी मिळेल, त्या वेळांत त्यांनी – ‘तो मुलगा जे करत आहे, ते त्याने कां करू नये.’ ते एखादे चांगले कारण सांगून स्पष्ट करावे.
नियम/बक्षीस:

जो मुलगा /मुलगी सर्वोत्तम कारण सांगेल, तो आतां मधोमध उभा राहील. वर्तुळात बसलेल्या मुलांना त्याच्या कृतीसाठी योग्य स्पष्टीकरण/कारण सांगता आले नाही, तर मध्यभागी उभा असलेल्या मुलाला आणखी एक संधी मिळेल. यावेळी गुरु परीक्षकाचे काम करतील.