नेहमी मदत करा

Print Friendly, PDF & Email
नेहमी मदत करा
उद्दिष्ट

मनोरंजक व परस्पर सुसंवादी कृती

संबंधित मूल्ये

सदाचरण, सेवा.

आवश्यक साहित्य

कार्ड

गुरुंनी करावयाची पूर्वतयारी

खाली दिल्याप्रमाणे विशेष गुण लिहिलेली कार्डे आणि कृतींची कार्डे गुरुंनी तयार केली पाहिजेत.

खेळ कसा खेळायचा
  1. वर्गातील मुलांची दोन गटात विभागणी केली पाहिजे.
  2. अ गटातील मुले गरजू लोकांना कोणती मदत हवी आहे, त्याचे वर्णन करतील.
  3. ब गटातील मुले मदतनिसांचे वर्णन करतील.
  4. गट अ मधील प्रत्येक सभासद गुणवैशिष्ट्यांचे एक कार्ड निवडेल आणि त्यातील व्यक्तींच्या
    स्वभावाप्रमाणे, वृत्ती प्रमाणे सूचक हावभाव करतील.
  5. ब गटातील प्रत्येक जण वृत्तींच्या कार्डांमधील एक निवडेल आणि त्यानुसार अ गटातील संबंधित
    गरजू व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करेल.
  6. एकदा व्यवस्थित योग्य जोड्या जमल्या, की त्यांनी आवश्यक ती अपेक्षित कृती करावी.
  7. आता दोन्ही गट कार्डांची अदलाबदल करतील, त्यामुळे ब गट गरजूंचे वर्णन करेल आणि अ
    गटातील मुले मदतनिसांच्या नावानुसार वर्णन करतील आणि ब गटातील संबंधित गरजू
    व्यक्तीला शोधतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: