षड्रिपू
षड्रिपू
उद्दिष्ट:
मुलांना आपल्यातील अंतस्थ षड्रिपू व त्यांचे वाईट प्रभाव याबद्दल सावध करणे आणि ते सर्वतोपरी टाळण्यासाठी सूचना देणे.
संबंधित मूल्ये:
- जागरुकता / सावधानता
- सद्सद्विवेक
- समयसूचकता
आवश्यक साहित्य:
- (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) ज्यावर यापैकी एक दोष लिहिलेला आहे, असे ६ बोर्ड तयार करणे आणि ‘देवाचा आवडता’ असे लिहिलेला एक बोर्ड करणे.
- वाजवण्यासाठी आवश्यक असलेले संगीत.
- पिसण्यासाठी आणि निवडण्यासाठी आवश्यक असलेल्या ६ छोट्या चिठ्ठ्या तयार करणे, त्यावर १,१ षड्रिपूतील दोष लिहिलेला असेल.
- ‘देवाचा आवडता’ असे लिहिलेली एक चिठ्ठी तयार करणे.
गुरुंसाठी पूर्वतयारी:
असे ७ बोर्ड खोलीतील भिंतीवर वेगवेगळ्या कोपऱ्यात उंचावर टांगून ठेवणे आवश्यक आहे.
खेळ कसा खेळायचा
- मुलांनी वर्तुळ तयार करावे आणि चालू असलेल्या संगीताच्या तालावर हळूहळू गोल पळत राहावे.
- संगीत थांबल्यानंतर मुलांनी ६ पैकी कोणत्याही एका बोर्ड जवळ जाऊन थांबावे.
- नंतर षड्रिपूंपैकी एक चिठ्ठी गुरु उचलेल. (उदा. काम)
- काम या बोर्ड जवळ उभी असलेली सर्व मुले बाद होतील.
- आता ‘काम’ लिहिलेला बोर्ड खेळातून काढून टाकायचा.
- अशाप्रकारे संगीताच्या तालावर खेळ पुढे चालू राहील. जेंव्हा सहापैकी षड्रिपूतील एक कार्ड शिल्लक राहील, तेव्हा ‘देवाचा आवडता’ असे लिहिलेली चिठ्ठी आणि बोर्ड खेळायला द्यावा.
- ‘देवाचा आवडता’ या बोर्डजवळ जो मुलगा थांबेल, त्याने षड्रिपूंना टाळले व तो त्यांच्यापासून दूर राहिला, म्हणून स्पर्धेतील या परीक्षेत तो यशस्वी झाला, असे जाहीर करावे.