शिवाचा तिसरा नेत्र ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो. तो नेत्र म्हणजे वैश्विक ज्ञानाचा नेत्र होय.त्याच्या प्राप्तीसाठी निवडल्या जाणाऱ्या कर्म,भक्ती
आणि ज्ञान ह्या तिन्ही मार्गांचे ज्ञान तो प्रदान करू शकतो. हे त्रिनेत्र, तो भूत, वर्तमान आणि भविष्य ह्या तिन्ही कालांचा स्वामी असल्याचे ध्वनित करतात. वास्तविक त्याचे कालावर नियंत्रण आहे तसेच तो कालातीत आहे.
नंदीसारखे आपलेही लक्ष सतत परमेश्वरावर केंद्रित असायला हवे.त्यासाठी सुदृष्टी म्हणजेच “सुदर्शनमु” असायला हवी.पवित्र दृष्टी, सुदृष्टी प्राप्त करण्यासाठी परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे, त्याचे नामस्मरण केले पाहिजे आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.–बाबा
आपण भगवान शिवाचे चिंतन करू आणि ही भजने गाऊन त्यांची प्रार्थना करू.