अनुपम सुंदर
भजनाचे बोल
- अनुपम सुंदर नंदकिशोरा
- वृंदावन घनश्याम
- मुरली माधव राधे गोविंदा
- मधुसूदन घनश्याम सत्यसाई सुंदर श्याम
- वृंद विहारी मंदर गिरिधारी
- कमल नयन भगवान
- भक्तों के प्रभू पर्तीश्वर साई
- नटवर सुंदर श्याम सत्य साई सुंदर श्याम
अर्थ
हे नंदकिशोरा कृष्णा! तुझे सौंदर्य अनुपम आहे. तुझा वर्ण कृष्ण मेघांसारखा आहे. वृंदावनमध्ये तुला राधे गोविंद, मधुसूदन आणि गिरिधारी ह्या नामांनी पूजले जाते. हे कमल नयन, प्रभू सत्यसाई! तू तुझ्या भक्तांना प्रिय आहेस आणि ते नटवर कृष्णाप्रमाणेच तुझी भक्ती करतात.
स्पष्टीकरण
अनुपम सुंदर नंदकिशोरा | हे नंदाच्या प्रिय पुत्रा! तुझे सौंदर्य अतुलनीय आहे. |
---|---|
वृंदावन घनश्याम | हे अनाकलनीय नीलवर्णा! बालपणी जेथे तू क्रीडा केल्यास आणि सर्वांना मंत्रमुग्ध केलेस त्या वृंदावनातील प्रत्येकाचा तू लाडका आहेस. |
मुरली माधव राधे गोविंदा | हे राधेच्या प्रियतमा! तुझ्या ओठांमधून स्वर्गीय संगीत झंकारते. खरोखरच तू मायेचा आणि निर्मितीचा स्वामी आहेस. |
मधुसूदन घनश्याम सत्यसाई सुंदर श्याम | हे मेघश्याम सुंदरा, प्रभुवरा! तू आमच्या अहंकाराचा नाश करतोस. मनमोहक सत्यसाईंच्या रूपाने तूच पुन्हा भूतलावर अवतरला आहेस. |
वृंद विहारी मंदर गिरिधारी | हे सर्व शक्तिमान प्रभू! तू तुझ्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरलास आणि वृंदावनातील सर्वांना मंत्रमुग्ध केलेस. |
कमल नयन भगवान | हे प्रभुवरा सुंदरा! तुझे नयन कमला समान आहेत. |
भक्तों के प्रभू पर्तीश्वर साई | हे प्रिय प्रभू! हे पुट्टपर्तीश्वर, सत्यसाई, तू सदैव भक्तांच्या पाठीशी असतोस |
नटवर सुंदर श्याम सत्य साई सुंदर श्याम | अत्यंत कृपाळूपणे, सत्यसाईंचे सुंदर रूप धारण केलेल्या हे आनंददायी, नील मेघश्यामा! तू या विश्वातील सर्वोत्कृष्ट नर्तक आहेस. |
राग: वृंदावनी सारंग
श्रुती: डी
(पंचम) ताल: कहरवा किंवा आदि ताल – आठ मात्रा
Indian Notation
Western Notation
Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_12/01AUG14/Anupama-Sundara-Nanda-Kishora-radiosai-bhajan-tutor.htm