अवताराचा जन्मदिन
२३ नोव्हेम्बरची पहाट होताच, त्या पवित्र दिनाचे स्वागत करण्यासाठी प्रशांती निलयम लवकरच जागे होते. अवतारांच्या जन्मदिनाचा आनंद लुटण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या जनसमुदायामुळे संपूर्ण गावाला उत्सवाचे स्वरुप प्राप्त होते. दरवर्षी सेवेचे विविध उपक्रम राबवून व प्रार्थना करुन, जगभरात भगवान श्री सत्य साई बाबांचा जन्मदिन साजरा जातो. समारंभाची सुरुवात किमान १० दिवस आगोदर होते. भक्तगण मोठ्या आकाराचे केक व शुभेच्छा पत्रे घेऊन येतात.
या सर्वामध्ये भगवान बाबांचा एक संदेश होता. भक्तांनी सर्वांवर प्रेम करावे, सर्वांची सेवा करावी आणि आनंदी राहावे यासाठी जन्मदिवसांचे संदेश ही अजून एक दैवी साद होती.
२३ नोव्हेम्बर १९९७ च्या त्यांच्या दिव्य संदेशात भगवान बाबा म्हणाले, ” मला जन्मदिन समारंभाचा आनंद नाही. तुम्ही सर्वजण समारंभ साजरा करण्यासाठी येथे आल्यामुळे तुम्हाला संतोष देणे मला भाग आहे. मला कोणत्याही इच्छा नाही. मी जे जे काही करतो ते केवळ तुमच्याकरता करतो. हे सत्य जाणून घ्या. मला कोणाविषयी नापसंती वा नावड नाही. तसेच मी कोणाला आवडत नाही असे नाही. सगळे माझेच आहेत आणि मी सर्वांचा आहे. ‘ सर्वजण सुखी होवोत” हा माझा आशीर्वाद आहे. सर्वांनी धर्म मार्गाचे आचरण करावे. प्रत्येकाने आपल्यामधील आध्यात्मिक तत्त्व प्रकट करून परमानंदाची अनुभूती घ्यावी. जोपर्यंत तुम्हाला आध्यात्मिक एकत्वाचा बोध होत नाही तोपर्यंत तुम्ही भजन, नामस्मरण आणि प्रार्थना ह्यासारखी भक्तिपर कर्म केली पाहिजेत. आजच्या दिवसापासून आपल्या घटनेचा विस्तार होऊन तिचा सम्पूर्ण जगामध्ये प्रसार झाला पाहिजे, समाजाचे कल्याण करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून आपण आपले वैयक्तिक मतभेद विसरायला हवेत. समाज कल्याण म्हणजेच आपले कल्याण. एखाद्या खेडेगावातील, प्रांतातील वा देशातील सर्व उपक्रमांमध्ये सहभागी झाले पाहिजे.”
वस्त्र, खेळणी, अन्न इ. गोष्टींचे वाटप, ह्यासारख्या अनेक रुपांमधून लोकांना भगवानांचे आशीर्वाद प्राप्त झाले. त्यांच्या अद्वितीय शैलीने त्यांनी आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला व त्यांच्या कृतिंद्वारा सर्वांमध्ये वाटला. आपण सर्वांनी त्याचे अनुकरण करावे ह्यासाठी त्यांनी एक मार्गदर्शक प्रणाली मागे ठेवली आहे.