An overview
इच्छा या सामनाप्रमाणे असतात ज्यांचे आयुष्याच्या प्रवासात जड ओझे होते. कमी सामान,
अधिक सोय या मुळे प्रवास जास्त सुखकर होतो.
म्हणून हळू हळू तुमच्या इच्छा कमी करा. तुमच्याकडे कमी सामान असेल तर तुम्हालाआधी एक शांती लाभेल.
‘ज्या गोष्टीतून समाधान व आनंद मिळतो अशा गोष्टी मिळण्याची तीव्र अभिलाषा वा त्या गोष्टीसाठी व्याकुळता’ ही इच्छेची व्याख्या आहे.
इच्छा आपल्याला चुकीच्या समजूतीवर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात.
स्वामी म्हणतात त्या दोन्ही समजूती खोट्या आहेत.
“जशा इच्छा वाढत जातात तसा मनुष्याचा आनंद कमी होत जातो हे मनुष्य जाणत नाही. इच्छांना मर्यादा नाही त्या वारुळातील मुग्यांप्रमाणे बेसुमार वाढतात. तुम्ही कितीही इच्छांची पूर्ती करा वा आनंद मिळवा तरी तृप्ती होत नाही.”
“सर्वात गरीब मनुष्य कोण आहे? ज्याला सर्वात जास्त इच्छा आहेत, तो जगातील सर्वात गरीब मनुष्य आहे. सर्वात जास्त श्रीमंत कोण आहे? जो तृप्त आहे तो जगातील सर्वात श्रीमंत मनुष्य आहे.”- बाबा
जगामध्ये प्रत्येक गोष्टीस एक मर्यादा आहे. मानवी देहाच्या तापमानाची मर्यादा ९८.४ फॅरनाईट आहे. त्या मर्यादेपलीकडे गेल्यास मनुष्यास ताप येतो. जेव्हा रक्तदाब / मधुमेह ह्यांच्या मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा आपल्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
जेव्हा तुम्ही लखलखणाऱ्या विजेचा प्रकाश पाहता किंवा फोटो काढताना फ्लॅश लाईट पाहता तेव्हा तुमचे डोळे आपोआप मिटले जातात कारण डोळ्यांना एवढा दीप्तिमान प्रकाश सहन होत नाही. कानाचे पडदेही एका विशिष्ट प्रमाणाच्या पलीकडे आवाज सहन करू शकत नसल्यामुळे आपण कान झाकून घेतो किंवा कानात कापसाचे बोळे घालतो. ह्यावरून आपल्या असे लक्षात येते की आपले जीवन एक मर्यादित कंपनी आहे! त्याचप्रमाणे आपल्या इच्छाही मर्यादित असायला हव्यात. (दिव्य संदेश – १९८३ )
आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनासाठी इच्छांवर नियंत्रण आवश्यक आहे. अमर्याद इच्छा दुःखाप्रत घेऊन जातात. त्या मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळे बनतात. अमर्याद इच्छा मनुष्याचा आनंद आणि आरोग्य दोन्हीचा विध्वंस करतात. इच्छा कमी करणे हे इच्छांवर नियंत्रण मिळवण्याचे साधन आहे. जर आपण इच्छांचे बीज भाजले तर त्याला अंकुर फुटणार नाही.
पुराणांमध्ये व महाकाव्यांमध्ये इच्छांवर नियंत्रणाचे फार मोठे महत्व सांगितले आहे. इच्छांमधून इच्छा प्रसवतात. जेव्हा एखाद्या इच्छेची पूर्ती होते तेव्हा त्याची परिणती लोभामध्ये होते. जर इच्छा पूर्ण झाली नाही तर त्यातून क्रोध व मत्सर ह्या भावना जागृत होतात. अखेरीस, मानवी मूल्यांच्या घसरणीस ते कारणीभूत ठरते.
अमर्याद व अनैतिक इच्छांचे निर्मूलन कसे करावे? ह्यासाठी काय करावे व काय करू नये हे बाबांनी सांगितले आहे. ते खाली दिले आहे.:
- ABC – Always Be Careful – सदैव सावध राहा – Avoid Bad Company – दुर्जनांचा संग टाळा.
- वाईट पाहू नका – चांगले पाहा.
वाईट ऐकू नका – चांगले ऐका.
वाईट बोलू नका – चांगले बोला.
वाईट विचार करू नका – चांगले विचार करा.
वाईट करू नका – चांगले करा.
इच्छांवर नियंत्रण हे एक साधन आहे जे धन, अन्न, काळ आणि ऊर्जा ह्या ४ महत्वाच्या साधन संपत्तीच्या वापरावर मर्यादा घालून इच्छा कमी करण्यास साहाय्य करते.
- धन
- अन्न
- काळ आणि
- ऊर्जा
वेळ, ऊर्जा, पैसा आणि अन्न हि चार साधने मनुष्याला मिळालेल्या चार देणग्या आहेत. हि साधने पवित्र आहेत कारण ती परमेश्वराची मूर्त स्वरूपे आहेत.
1. काळ हाच परमेश्वर – काळाचा अपव्यय म्हणजे जीवनाचा अपव्यय
“काळाचा अपव्यय करू नका. काळाचा अपव्यय म्हणजे जीवनाचा अपव्यय होय. ‘कालाय नमः, कालकालाय नमः, कालातीताय नमः, कालस्वरूपाय नमः असे म्हणून आपण परमेश्वराचे स्तुतीगान करतो. पवित्र शब्दांचा वापर करून काळ व्यतीत करा. वेळेचा अपव्यय करू नका.
भगवान बाबा – समर शॉवेर्स-१९९३
2. ऊर्जा हाच परमेश्वर
क्रोध, इच्छा आणि सुविचार शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक ऊर्जेचा ऱ्हास करतात.
“ऊर्जेचा अपव्यय करू नका” लोक वाईट विचार, वाईट दृष्टी व वाईट कर्म ह्यांच्यामध्ये आसक्त होऊन ऊर्जेचा अपव्यय करतात.
समर शॉवर्स १९९३
3.धन हाच परमेश्वर
“परमेश्वर धनसंपदा आहे” परमेश्वर हाच धनसंपदा असल्यामुळे पैशाचा गैरवापर करणे चांगले नाही. पैशाची उधळपट्टी करण्याऐवजी धन, अन्न, वस्त्र व निवारा ह्या गोष्टी दान कराव्यात. पैशाचा गैरवापर करणे केवळ वाईट नसून पाप आहे.
समर शॉवर्स १९९३
4. अन्न हाच परमेश्वर
एका व्यक्तीने वाया घालवलेल्या अन्नातून एका भुकेलेल्या बालकाच्या भुकेचे शमन होऊ शकते.
अन्न वाया घालवू नका. अन्न म्हणजे परमेश्वर आहे. तुमचा देह अन्नाने बनलेला आहे. आणि तुमच्या पालकांनी ग्रहण केलेल्या अन्नाची निष्पत्ती म्हणजे तुम्ही स्वतः. अन्न ब्रह्मा (अन्न परमेश्वर आहे) मित थिंडी अति हाई.
“माफक अन्न तुम्हाला सुखसंतोष देते” असे स्वामी म्हणतात. जेवढे आवश्यक आहे तेवढेच अन्न ग्रहण करा. थाळीमध्ये एकदम भरपूर अन्न घेऊन फेकून देऊ नका.
समर शॉवर्स १९९३
स्वामी कारुण्यानंद: “स्वामी, तुम्ही परमेश्वराचा अवतार आहात आणि आता येथे स्थूल रूपात उपस्थित आहात आणि तेथे त्या भिंतींच्या मागे कचऱ्यातील क्षुल्लक अन्नाच्या तुकड्यासाठी मुले रस्त्यावरच्या कुत्र्यांशी झुंजत आहेत. हे कसे काय स्वामी?”
भगवान स्वामी कारुण्यानंदांना म्हणाले, “त्यांच्या पूर्व जन्मामध्ये त्यांनी ऐषोआरामात व सुखासीन जीवन व्यतीत केले त्यांच्यासाठी टेबलावर विविध शाही पदार्थ ठेवलेले असत. ते एक पदार्थ उष्टा कर, दुसरा पदार्थ उष्टा कर असे करून ते खाण्यापेक्षा बरेचसे अन्न फेकून देत असत व बहुमोल अन्नाचा अनादर करत असत. त्यांनी पूर्वजन्मात बेपर्वाईने कचऱ्यामध्ये वाया घालवलेले अन्न ते या जन्मात वेचत आहेत.”
इच्छांवरील नियंत्रणास साहाय्य करण्यासाठी साधन संपत्तीचा काटकसरीने वापर, निःस्वार्थता, सर्वांमध्ये वाटून घेण्याची वृत्ती आणि इतरांविषयी आस्था व कळकळ ही मूल्ये आवश्यक आहेत. मुलांच्या मनावर इच्छांवर नियंत्रण बिंबवण्यासाठी पालक, शिक्षक आणि बालविकास गुरूंनी त्याला अनुरूप बोधकथा निवडाव्यात. सूचित वर्ग उपक्रम