मार्गदर्शित कल्पनादर्शन पद्धत
तरुण वयात एकाग्रता वाढीस लागण्यासाठी इन्द्रियांवर ताबा मिळविणे आवश्यक असते. गट पहिला, या वयोगटासाठी कल्पनाचित्रण हे एक उत्तम तंत्र आहे. देवाचे रूप मुलांच्या मनावर ठसेल, अशा पद्धतीने गुरुंनी त्या देवाच्या रूपाचे वर्णन केले पाहिजे. मार्गदर्शित कल्पनाचित्रण – प्रदर्शन प्रिय मुलांनो, साईराम! आपल्या प्रिय स्वामींचे चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्ही सर्वांनी या चित्राकडे लक्षपूर्वक पहावे. मुलांनो, आता हळूहळू डोळे मिटा. हात पुढे ताठ करतांना इतरांना स्पर्श करू नका. हाताच्या बोटांची चिन्मुद्रा करून हात मांडीवर ठेवा. सरळ बसा आणि पाठीचा कणा ताठ ठेवा. दीर्घ श्वास घ्या, मनातील सर्व विचार काढून टाका. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. आता हळूहळू अशी कल्पना करा, की स्वामींचे सुंदर रूप पाहण्यासाठी तुम्ही सर्वजण ई वर अनुस्वार नको कुलवंत सभागृहात वाट पाहत आहात. पहा! स्वामी हळूहळू चालत तुमच्या समोर येत आहेत. त्यांच्या मुखावर प्रेमाची व प्रकाशाची किरणे चमकत आहेत. त्यांच्या चेहऱ्याभोवतीचे दाट काळे केस तेजोवलयाप्रमाणे भासत आहेत. त्यांची तेजस्वी दॄष्टि आता तुमच्याकडे वळली आहे. ते आता तुमच्याकडे पहात आहेत आणि तुम्हाला अत्यानंद झाला आहे. काही क्षणांसाठीच जरी तुमची नजरानजर झाली असली, तरी खूप वेळ त्यांनी तुमच्याकडे टक लावून पाहिले, असे तुम्हाला वाटते. ते तुमच्याकडे पाहून स्मितहास्य करतात आणि प्रेमाची आणि आनंदाची तरतरी तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ते प्रेमाचे साकार रूप आहेत. त्यांच्या रूपात जणू साक्षात प्रेमच दोन पायांवर चालत आहे. त्यांचा लांब केशरी अंगरखा वाऱ्याबरोबर झुलत आहे. आणि त्यांच्या कोमल चरणांचा काही भाग त्या अंगरख्यातून दिसतो आहे. भगवान श्री सत्य साई बाबांच्या दिव्य दर्शनाने आमच्यावर मोठी कृपाच झाली आहे. अतिशय भक्तीने आणि श्रद्धेने त्यांच्या चरणकमली आपण ही छोटी प्रार्थना अर्पण करू या. हे परमेश्वरा! माझे पालक, गुरु, नातलग आणि मित्र यांना आपल्या कृपेने उत्तम आरोग्य लाभों, अशी मी प्रार्थना करतो. हे परमेश्वरा! मला माझ्या अभ्यासात एकाग्रता येण्यासाठी आपण सहाय्य करावे. हे परमेश्वरा! आपल्या चरणकमलांचे मला सदैव स्मरण राहो! समस्त लोकाः सुखिनो भवन्तु! आता हळूहळू डोळे उघडा.
मार्गदर्शित कल्पनाचित्रानंतर वर्गामध्ये चर्चेसाठी काही सूचक प्रश्न-
- स्वामी कसे दिसतात?
- हा अनुभव तुम्हांला कसा वाटला?