गायत्री – वेदमाता
गायत्री सर्व वेदांची माता आहे. जेथे तिचे उच्चारण होते तेथे तिचे अस्तित्व असते. ती अत्यंत शक्तिशाली आहे. गायत्री प्रत्येक जीव (व्यक्तिगत अस्तित्व) पोषित करते. जो तिची भक्ति करतो त्याला ती शुद्ध विचार प्रदान करते. ती सर्व देवता स्वरुप आहे. आपला श्वास म्हणजे गायत्री, आपली अस्तित्वावरील श्रद्धा म्हणजे गायत्री. गायत्री पंचमुखी आहे, ती पाच जीवनतत्त्वे आहेत. ॐ,भूर,भुवः, स्वः तत सवितुर, वरेण्यं, भर्गो, देवस्य, ह्या ९ शब्दांमध्ये तिचे वर्णन केले आहे. गायत्री माता प्रत्येक जीवाचे पोषण आणि रक्षण करते. आणि आपल्याला इन्द्रियांना ती योग्य दिशेने संचालित करते. ‘धीमहि’ म्हणजे ध्यान। आम्हाला सद्बुध्दी देऊन प्रेरित कर अशी आम्ही तिची प्रार्थना करतो. ‘धियो यो नः प्रचोदयात’- आम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी तिने आम्हाला प्रदान कराव्यात अशी आम्ही तिला विनवणी करतो. अशा तऱ्हेने गायत्री संरक्षण, पोषण आणि अंतिमतः मुक्ती ह्यासाठी एक परिपूर्ण प्रार्थना आहे.