परमेश्वराला शरण गेलेली कोणीतरी व्यक्ती म्हणजे राधा . राधा म्हणजे केवळ स्त्री असे नव्हे.
भगवान बाबा म्हणाले,’जेव्हा कृष्णाला शरण जाऊन तुम्ही तुमचे कर्म आणि विचार त्याला अर्पण करता तेव्हा तुम्ही राधेच्या अवस्थेप्रत पोहोचता, म्हणून राधा शब्दापासून केवळ स्त्री अभिप्रेत नाही. आपल्याला हे समजले पाहिजे की जो कोणी कृष्णाला शरण जातो, तो राधा आहे. राधा हे शिकविते की आपण केवळ आपले मस्तक ज्ञान आणि सुज्ञता यांनी भरून टाकले पाहिजे असे नव्हे तर आपण आपले ह्रदय उत्कट प्रेमाने भरून टाकले पाहिजे. ती आपल्याला शिकविते की मस्तक ज्ञानानी भरून टाकण्यापेक्षा ह्रदय प्रेमाने भरून टाकणे कधीही चांगले. राधा आपल्याला सांगत आहे की जे खरोखर वैश्विक आहे अशा दिव्यत्वामध्ये विविधता शोधली पाहिजे. आपली ज्ञानेंद्रिये आपण शरणागत भावाने ईश्वराला अर्पण केली पाहिजेत. नाहीतर ती तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेतील.
राधा आपल्याला सांगत आहे की या क्षणभंगूर अशाश्वत जगावर आपण विश्वास ठेवता कामा नये. परमेश्वराचे नित्यत्व, शाश्वतता यांवर आपले ध्यान केंद्रित केले पाहिजे. ती आपल्याला सांगत आली आहे की आपण जगावर विश्वास ठेवता कामा नये. आपल्याला मृत्यूचे भय वाटता कामा नये आणि आपण परमेश्वराला विसरता कामा नये. राधेने आपल्याला या तीन प्रमुख आज्ञा दिल्या आहेत. राधा आपल्याला सांगत आहे की आपण सदैव सर्व काळांमध्ये सर्व गुणांमध्ये परमेश्वराच्या परमानंदाचा उपभोग घेतला पाहिजे.राधा आपल्याला सांगत आहे की आपण आपल्यामधील मत्सराचा त्याग केला पाहिजे खास करुन त्यावेळी जेव्हा आपण इतरांची उन्नती, भरभराट होतांना पाहतो. राधेने इतर गोपिकांच्या मनातील संशय दूर केला आणि त्यांना त्यांच्या मनातील मत्सराचा त्याग करण्यास लावला.
[source-:http://sssbpt.info/summershowers/SS1978/SS1978-23.pdf]