उपक्रम : हस्तकला – जुन्या वर्तमानपत्रांपासून कृष्णाची बासरी बनविणे
साहित्य :
- वर्त्तमान पत्रांचे १० कागद
- कापड/ अस्तर/ पेपर
- सोनेरी धागा
- सुई, दोरा, मणी
- पट्टी, पेन्सिल, ग्लू
पद्धत :
-
- वर्तमानपत्रांचे पांच कागद घ्या आणि ते एकावर एक ठेवा.
- आता मध्ये छडी घाला आणि उघड्या बाजूकडून बंद बाजूकडे त्याची गुंडाळी करा.
- ग्लू लावून गुंडाळी चिकटवून टाका.
- ही बासरी ३६ से.मी. लांब आहे. पट्टी व पेन्सिल घ्या. ८ से. मी. वर, ११ से. मी. वर, १४ से. मी. वर व १८ से. मी. वर गोल काढा.
- आता कात्री घ्या (मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली) आणि हे गोल कापून काढा.
संपूर्ण कापले नाहीत तरी चालेल आणि मागची बाजू कापू नका. या छिद्रांमध्ये पेन्सिल घाला आणि ती थोडी मोठी करा.
- बासरीच्या लांबी इतके छान कापड घ्या. त्यावर बासरीवर आहेत तेवढ्याच अंतरावर गोल काढा आणि छिद्रे करा आणि ते कापड बासरीवर चिकटवा.
- गोळे बनविण्यासाठी एक थर्मोकोलचा गोळा घ्या आणि त्यामधून दोरा ओवा. त्यावर छान कापड चिकटवा, मग दोऱ्यामध्ये मणी ओवा.
- बासरीच्या एका टोकाला आणि मध्ये अस्तराच्या पट्ट्या किंवा लेस चिकटवा.
- गोंड्याचा दोरा अस्तराची पट्टी/ लेस वर चिकटवा आणि बासरीच्या दुसऱ्या टोकावर चिकटवून टाका.
- आता सोनेरी दोरा घ्या आणि छिद्रांच्या भोवती लावून टाका.
- बासरी तयार झाली.