ॐ सर्व मंगला श्लोक – पुढील वाचन
पार्वतीदेवीला आपल्या भक्तांविषयी प्रेम आहे. जर मंगलमय दयाळू मंगलमय आहे आणि भक्तांचा मोह घालवून व त्यांचे रक्षण करून ती त्यांना आशीर्वाद देते.
एकदा नरेंद्रनाथ नावाचा एक ब्राह्मण मुलगा यमुना नदीत स्नान करीत होता.
अचानक तिथे एक मगर आली आणि तिने त्या मुलाला पकडले. मुलाने पार्वतीदेवीला हाक मारायला सुरवात केली. तो इतक्या करूण स्वराने ओरडत होता की कैलास पर्वतावर असलेल्या देवीला दया आली.
ती घाईघाईने त्या ठिकाणी आली. तिने त्या मुलाला वाचविण्यासाठी आपली सर्व शक्ती, ज्ञान व मांगल्य मुलाला दिले. तिच्या तपश्चर्येचे बळ इतके मोठे होते की त्यामुळे तो मुलगा तेजाने तळपू लागला. ते तेज मगरीला सहन झाले नाही. तिने नरेंद्रनाथाला सोडून दिले आणि ती पाण्यात दिसेनाशी झाली.
आपण सारे नरेंद्रनाथासारखेच आहोत. भवसागरात पोहण्याचा प्रयत्न करीत असताना मोहरूपी मगरीने आपल्याला पकडले आहे. ज दयाळु व आनंदस्वरूप देवी पार्वतीची आपण प्रार्थना केली तर ती असे बळ देते की त्यामुळे आपल्याला मोहातून सुटायला व मोक्ष मिळवायला मदत होते.
[Illustrations by Selvi. Sainee, Sri Sathya Sai Balvikas Student]
[Source: Sri Sathya Sai Balvikas Guru Handbook Group I ]