आढावा
जप
“मानवाची कल्पनाशक्ती व बुद्धिमत्ता हयाद्वारे ओळखल्या जाणाऱ्या परमेश्वराच्या लक्षावधी नामांपैकी कोणत्याही नामाचे अखंड उच्चारण हे मानवी मनाचे शुद्धीकरण करण्याचे व त्यामध्ये सुपरिवर्तन घडवण्याचे उत्तम साधन आहे.”
SSS Volume 6, P133
स्वामींनी म्हटले आहे, “अनेक लोकं मला विचारतात, स्वामी! उच्चारण करण्यासाठी मला एक नाम द्या. तुम्हाला आवडणारे कोणतेही नाम घ्या. त्याच्या सर्व नामात सारखेच माधुर्य आहे.”
SSS volume 5, P33
जपयज्ञ हा सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ यज्ञ आहे. असे गीतेत म्हटले आहे. इतर यज्ञात मनुष्य अन्य काही समर्पित करतो परंतु जपयज्ञामध्ये स्वतःला समर्पित करून तो ज्या देवतेची भक्ती करतो ती देवता बनून जातो.
सुरुवातीस तो मोठ्या आवाजात, जिव्हेच्या अग्राने जप करतो. त्यानंतर तो घशाच्या मध्यभागातून मनामध्ये मंत्राचे उच्चारण करतो. त्यानंतर मंत्र गहिरा होऊन हृदयाच्या गाभाऱ्यात उतरतो. पुढे, तो मंत्र अधिक गहिरा होऊन नाभीकेंद्रात जातो. ज (JA) याचा अर्थ जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्तता आणि प (PA) चा अर्थ पापकर्मामधून मुक्तता. परमेश्वराचे अखंड नामस्मरण आपली जन्म आणि पाप ह्यांच्या चक्रातून मुक्तता करते.
ध्यान
परमेश्वर हा एकमात्र विचार आणि एकमात्र ध्येय मानून त्याच्याशी तद्रूप होणे हे खरे ध्यान होय. केवळ परमेश्वर, परमेश्वराचा विचार, परमेश्वरच श्वासोच्छ्वास, प्रेम हाच परमेश्वर, परमेश्वर हेच जीवन
सत्य साई बाबांशी संवाद P 133
ध्यानाद्वारे, शारीरिक दुर्बलता नाहीशी करता येते. मनाच्या अस्वस्थतेवर नियंत्रण ठेवता येते, कृपा संपादन करण्याच्या दिशेने प्रगती करणे सोपे होते. आदिम शक्तीची अनुभूती घेणे शक्य होते. एकाग्रतेमुळे इच्छाशक्ती व कौशल्य वृद्धिंगत होऊन सर्व प्रयत्नांना यश प्राप्त होते.
श्री सत्य साईबाबांची शिकवण p – 13.