नमस्तेऽस्तु श्लोका – खड़े किंवा नाणी
उपक्रमाचे उद्देश्य
पहिल्या गटाच्या मुलांना हे समजावून देणे की देवी लक्ष्मीच्या हातातील चक्र, शंख आणि गदा हे अनुक्रमे काळ (चक्र), ध्वनि(शंख), आणि शक्ती (गदा)दर्शविते. आणि म्हणून आपण यापैकी कशाचाही अपव्यय करता कामा नये.
लागणारे साहित्य
खडे किंवा नाणी, पत्र्याचा डबा.
- सर्व मुलांनी गुरुकडे पाठ करून बसावे, जर सर्व मुले गोल करून बाहेरच्या बाजूला तोंड करून बसली आणि गुरु गोलेच्या मध्ये बसला तर चांगले.
- मुलांना डोळे बंद करण्यास सांगा व लक्षपूर्वक ऐकण्यास सांगा.
- गुरुने एकेक करून खडे पत्र्याच्या डब्यामध्ये टाकावे.
- खडे डब्यात टाकले जात असताना होणाऱ्या आवाजावरून मुलांना ते मोजण्यास सांगावे.
- सुरवातीला मुलांना सर्वांनी मिळून मोठ्या आवाजात मोजण्यास सांगावे.
- यानंतर डब्यामध्ये खड़े टाकले जात असताना मुलांना मनातल्या मनात मोजण्यास सांगावे. गुरुने काही खड़े अगदी हळूवारपणे डबा जवळ घेऊन टाकावे.
- जसजशी मुलांची एकाग्रता आणि लक्षपूर्वक ऐकणे वाढेल तसतसे गुरुने जास्त खडे डब्यात टाकण्यास सुरुवात करावी व आता गुरुने पटापट क्वचित एकावेळी दोन, तीन खडेही टाकावेत.
- मुलांना पुनःपुन्हा आठवण करून द्यावी की त्यांची स्पर्धा इतर मुलांबरोबर नसून स्वतःशीच आहे.
वर्गामधील चर्चेसाठी सुचविलेले काही प्रश्न
- हा उपक्रम सगळ्यांना आवडला का? का?
- सुरवातीला सगळ्यांची उत्तरे वेगवेगळी का होती?
- जेव्हा मुले बोलायची थांबली आणि त्यांनी नीट लक्ष दिले तेव्हा काय झाले?
- लक्ष केंद्रित करण्यास शांतता महत्त्वाची आहे का?
- आपण कोणकोणत्या मार्गांनी आपली शक्ती आणि आपला वेळ यांचा अपव्यय करतो? आपली शक्ती आणि वेळ यांचा भविष्यातील अपव्यय आपल्याला कसा टाळता येईल?
निष्कर्ष
चर्चा झाल्यानंतर गुरुंनी मुलांना हे स्पष्ट करून सांगावे की काळ, ध्वनी आणि शक्ती या ईश्वरी देणग्या असून त्यांचा उत्तम प्रकारे उपयोग केला पाहिजे.