राष्ट्रीय पक्षी- मोर
- भारतीय मोर- (पेव्हो क्रिस्टेटस) हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. तो रंगीबेरंगी, हंसाच्या आकाराचा पक्षी असून, त्याच्या माथ्यावर पिसांचा तुरा असतो. डोळ्यांखाली पांढरा टिपका असून, लांब बारीक मान असते.
- या जातीतील नर मादीपेक्षा जास्त रंगीबेरंगी असून, त्याची छाती व मान चकचकीत निळ्या रंगाची’असते. कांस्य, हिरव्या रंगातील अतिशय नेत्रदीपक अशा सुमारे दोनशे पिसांनी बनलेला त्याचा मोठा पिसारा असतो.
- मोराची मादी तपकिरी रंगाची असून ती नरापेक्षा आकाराने लहान असते व तिला शेपूट नसते.
- माणसांतील कांही अतिशय स्तुत्य गुण मोरामध्ये सुद्धा आढळतात. आणि तो अखंडता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. आपणही प्रयत्न केल्यास आपली सुप्त गुणवैशिष्ट्ये प्रकट करू शकतो.
- हिंदू धर्मात मोराला मेघनाद, पाऊस आणि युध्द यांच्या देवाचे इंद्राचे प्रतीक म्हणून चित्रित करण्यात आलं आहे. दक्षिणेत मोराला भगवान मुरुगांचे, कार्तिकेयांचे वाहन मानले आहे.