ॐ सर्वे वै श्लोका – उपक्रम
उपक्रम: आनंद विभागावर उड्या मारण्याचा खेळ
समाविष्ट मूल्य:
सदैव आनंदी राहा.
साहित्य:
म्यूसिक प्लेअर (उपलब्ध नसल्यास गुरु भजने गाऊ शकतात), खडू.
सिध्दता:
हा खेळ शक्यतो मोकळ्या जागेत खेळावा
गुरुनी जमिनीवर मार्ग रेखाटावा (चित्राचा संदर्भ घ्यावा) २ समकेंद्री वर्तुळे काढून त्यामध्ये विभाग पाड़ावेत (प्रत्येक विद्यार्थ्यासाठी किमान एक विभाग असावा) प्रत्येक विभागामध्ये. एकाआड़ एक हसऱ्या किंवा दुःखी चेहऱ्याचे चित्र ठेवावे.
हे सर्व झाल्यानंतर, मुलांना एकेका विभागात उभे करावे.
संगीत सुरु करावे, मुलांनी शिस्तबध्दतेने घड्याळाच्या दिशेने, वर्तुळातील मार्गावरून उड्या मारत पुढे जावे.
ह्यामध्ये चालण्याची परवानगी नाही. केवळ दोन्ही पायांनी उड्या मारायच्या आहेत. दोन विभागांमध्ये थांबण्यास वा अंतर ठेवण्यास परवानगी नाही. एका विभागातून पुढच्या विभागात उड्या मारत राहणे अपेक्षित आहे. एका विभागात दोनदा उडी मारण्यास परवानगी नाही. कोणीही विभागाच्या बाहेर जाऊ नये. दोन पाय वेगवेगळ्या विभागांमध्ये असू नयेत.
जेव्हा संगीत थांबते, तेव्हा प्रत्येकाने जेथे आहे त्या विभागात स्तब्ध उभे राहायचे आहे.
ज्यांच्या विभागामध्ये दुःखी चेहेरा आहेत, त्यांनी खेळातून बाहेर पडावे. एक खेळाडू राहीपर्यंत हा खेळ असाच पुढे सुरु ठेवावा. जो खेळाडू शेवटपर्यंत राहिल तो जिंकला.