शिव शंभो – उपक्रम
समूह उपक्रम: शिवाची विविध नवे असलेला तक्ता
रुजविणात येणारे मूल्य: संधीक उत्साह आणि सहकार्य.
साहित्य: तक्ता, शिवाचे चित्र, प्रत्येक संघाला एक मार्कर पेन.
तयारी: जुने कॅलेंडर किंवा मासिक यातून शिवाचे चित्र मिळविणे.
मुलांना विभागून वेगवेगळे संघ बनवावेत. संघ प्रमुखाने शिवाचे चित्र तक्त्यावर चिकटवावे. एक दोन मुलांनी या चित्राभोवती शिवाची वेगवेगळी नावे लिहावीत तर इतर मुलांनी नावे सांगावीत. ज्या संघाची तक्त्यावर शिवाची नावे जास्त असतील तो संघ जिंकला.