गुरुंसाठी संदर्भ – गंगेविषयीचे शिव शंभो भजन
भगवान शंकरांच्या चित्रामध्ये, नेहमी त्यांच्या मस्तकावरुन गंगा वाहताना दर्शवली जाते. का?
राम कथा रसवाहिनी मध्ये, भगवानांनी गंगा नदीचे महत्त्व व ती भूतलावर कशी आणली हे विशद करून सांगितले आहे. बाबा म्हणतात, “गंगा म्हणजे दिव्य मांगल्याचा परम प्रवाह आहे. हे अमृतमय जल अमरत्व प्रदान करू शकते. ती जे देते ते सर्व लाभदायक असते.”
भगवान पुढे म्हणतात, “देवांनी समृद्धी प्राप्त होण्यासाठी त्यांना गंगा द्यावी अशी मागणी केली म्हणून हिमालयाचे दैवत हिमवान ह्यांनी, देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिन्ही लोकांच्या कल्याणासाठी देवांना गंगा भेट दिली. भूतलावर वाहणारी गंगा म्हणजे देवांनी त्यांच्याबरोबर आणलेली गंगा” आहे. ती भूतलावर आली आहे व तिचे तीन टप्पे आहेत. एक स्वर्ग. एक भूलोक आणि एक जमिनिखालील पाताळ लोक.
[(वरील सुवचने खाली दिलेल्या लिंक मधील १३२ व १३३ क्रमांकाच्या पानांवरून घेतली आहेत)
http://www.sssbpt.info/vahinis/ramkatha1/ramkatha107.pdf)]
त्रेता युगामध्ये सागर नावाचा एक राजा होऊन गेला. जो प्रभु रामांचा पूर्वज होता. एका ऋषींच्या शापामुळे त्याचे अनेक पुत्र भस्मिभूत झाले. एका आदरणीय वडीलधाऱ्यांनी सांगितले की गंगा नदीच्या केवळ स्पर्शाने ते पुन्हा मानवी रूप धारण करतील. परंतु हे अनेक पिढ्यानंतर घडले. जेव्हा महाराज सागर ह्यांचा वंशज भगिरथ यशस्वी ठरला.
भगिरथाने घोर तप केले. त्याला दिव्य दृश्य दिसले. त्याने दिव्य वाणी ऐकली. दिव्य वाणीने त्यास काय हवे असे विचारले. भगिरथाने त्याची मनोकामना व्यक्त केल्यावर त्याला सांगण्यात आले की गंगा प्रचंड शक्तीशाली व वेगवान असल्यामुळे, भूतलावर भयंकर आघात होईल म्हणून तिने प्रथम शिवाच्या मस्तकावर प्रवाहित होऊन मग भूतलावर येताना तिच्या प्रवाहाचा जोर थोडा मंदावेल.
त्यासाठी भगिरथाने शिवाला प्रसन्न करण्यासाठी तप सुरु केले. भगवान शिव प्रसन्न झाले व त्यांनी भूतलावर येऊन गंगेला आपल्या मस्तकावर धारण केले. त्यांच्या मस्तकावरुन गंगेचे सात वेगवेगळे प्रवाह पृथ्वीवर प्रवाहित झाले. त्यातील एक प्रवाह भगीरथ ज्या मार्गाने गेले त्याच्याबाजूने वाहिला व भगिरथांनी त्या नदीच्या पावन स्पर्शाने त्यांच्या वंशजांना पुनर्जीवित केले. वास्तविक, भागिरथाने गंगेला भूतलावर आणल्यामुळे गंगेला भागिरथी असेही म्हटले जाते. अशा तऱ्हेने भगवान शिवांनी गंगेचा एक भाग त्यांच्या जटांवर चिरकाल धारण केला आहे.
खरोखर बाबा, मस्तकावर गंगा धारण करणारे भगवान शिव आहेत.
बाबा १४/१५ वर्षाचे असताना त्यांच्या जन्मदिनी ईश्वरम्मा स्वामींच्या डोक्यास तेल लावत असत. अशाच एका प्रसंगी आता इथून पुढे डोक्यावरून पाणी घालण्याची गरज नाही असे स्वामींनी घोषित केले. ईश्वरम्मांनी पाहिले की भगवंताच्या मस्तकावरून कारंज्यासारखे पाणी भोवताली उडत होते. बाबांच्या भोवती असणाऱ्या ईश्वराम्मा व त्यांच्या बरोबर असलेले नातेवाईक त्या जल तुषारांनी भिजून गेले.
[Source- http ://media.radiosai.org/journals/vol_04/01FEB06/shiv-sai-mahadev.htm]
भगवान बाबा गंगा आरती स्वीकारतात
एकदा स्वामींनी प्रोफे. कस्तूरींना, त्यांच्या पत्नी व आईसह हरिद्वार, काशी, गया व इतर काही तीर्थक्षेत्रांना भेट देऊन येण्यास सांगितले. वास्तविक स्वामींनी कस्तूरींना म्हटले,” तू द्विधावस्थेत का आहेस? रेल्वे प्रवासाची तीन तिकीटे काढ. आपण चौघं त्यावर प्रवास करू शकतो.”
प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या तिघांना स्वामींचे अस्तित्व जाणवले. पहिल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आरती घाटावर गेले तेव्हा तेथे अगोदरच प्रचंड जनसमुदाय जमल्याचे त्यांनी पाहिले. परंतु घाटाकडे तोंड करून उभे राहिल्यावर तेथे एक छोटेसे बेट होते. त्यावर घड्याळ असलेला एक मनोरा होता. एखादी सोयीची जागा पकड़ली तर तेथून नदीच्या पाण्यावर तरंगणाऱ्या आणि पायऱ्यांवर पसरणाऱ्या दिव्यांचे मनोरम दृश्य पाहता येते. तेथे पायी चालत जाण्यासाठी एक पूलही होता. ते त्यावरून चालत जाऊन भाविकांच्या जनसमुदायात सामिल झाले. आरतीचे विधी सुरु झाले. शंखनाद, ढोल, तुताऱ्या, रणशिंगे व इतर अनेक वाद्यांचा आवाजाची सरमिसळ कानावर पडत होती. त्यानंतर जे घडले ते पाहून ते तिघही विस्मयचकीत झाले.
कस्तूरी लिहितात, “पुजाऱ्यांच्या हातामध्ये मोठे मोठे पितळी दिवे’ होते. ते ऊंच धरून ओवाळत होते. कोणासमोर?”—– हो बाबांसमोर!! ते त्यांच्या स्वागताचा आणि प्रेमाचा स्वीकार करत होते. ते सर्वांसाठी तेथे होते किंवा आम्हा तिघांना दर्शन देण्यासाठी तेथे होते. ‘गंगा मैया की जय’ ह्या जयजयकारात आरतीची सांगता होईपर्यंत बाबा तेथे होते.
सगळी लोकं निघून गेली होती. परंतु आम्ही थांबलो व सावकाशपणे आम्ही चालू लागलो. व बाबा जेथे दीर्घकाल उभे असलेले आम्ही पाहिले, त्याठिकाणी जाऊन त्या पायरीला खाली वाकून आम्ही स्पर्श केला. बाबांचे ते आरती स्वीकारणारे तेजस्वी व आशीर्वादात्मक चित्र बनारसच्या पवित्र विश्वनाथ मंदिरामध्ये पोहोचेपर्यंत आमच्या मनात घर करून राहिले होते. विश्वनाथाच्या मंदिरात आम्हाला परमानंदाची अनुभूती झाली.
बनारसला काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल वाटतेय का? कस्तूरी लिहितात,” आमच्या मंदिराच्या पहिल्या भेटीत विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये बाबांचे दर्शन झाले. ते नेहमी असतात तसेच तेथे उभे होते. केसांचा मुकुट, पायघोळ भगवी कफनी व एक आशीर्वादात्मक उंचावलेला हात. आम्हाला लिंग दिसत नव्हते. आम्ही लिंगाला विधीवत अभिषेक करण्यासाठी पायऱ्यांवरून एका पात्रामध्ये आणलेले गंगाजल बाबांच्या चरण कमलांवर अर्पित केले. त्यांनीही त्याला हरकत घेतली नाही.”
ते सर्व विस्मयकारक नव्हते का? साई केवळ पुट्टपर्तीनिवासी नाहीत तर विश्वाच्या प्रत्येक अणुरेणुला त्यांनी व्यापून टाकले आहे. ते सर्वत्र आहेत. ते जेथे नाहीत अशी कोणतीही जागा नाही! सर्व प्रार्थनांचा स्वीकार करतात, मग ती गंगामातेस केली असो वा भगवान शिवांना केली असो!
[SOURCE- Loving God]