श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ७)
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- श्रुत्वा तवाद्भुतचरित्रमखंडकीर्तिं
- व्याप्तां दिगन्तरविशालधरातलेऽस्मिन् ।
- जिज्ञासुलोक उपतिष्ठति चाश्रमेऽस्मिन्
- श्री सत्यसाई भगवन् तव सुप्रभातम् ।।
अर्थ
तुमच्या आश्चर्यकारक कथा ऐकून आणि क्षितिजापलीकडे दूरवर पसरलेली तुमची कीर्ती ऐकून सत्याचा शोध घेणारे जिज्ञासू आश्रमात आले आहेत आणि तुमच्या दर्शनाची आणि अंतर्जागृतीची वाट पाहात आहेत.
हे प्रभू, भगवान श्री सत्य साई, ह्या शुभ प्रभातीस (मंगल प्रभातीस) मी तुम्हाला वंदन करतो.
स्पष्टीकरण
श्रुत्वा | ऐकल्यानंतर |
---|---|
तव | तुमचे |
अद्भुत | आश्चर्यजनक |
चरित्रम् | कथा |
अखंड | अनंत |
कीर्तिं | प्रसिद्धी |
व्याप्तां | पसरते |
दिगंतर | क्षितिजापलिकडे |
विशाल | विस्तृत |
धरातलेऽस्मिन् | विस्तृत पृथ्वीच्या पृष्टभागावर |
जिज्ञासू लोक | जाणून घेण्याची इच्छा असणारे |
उप तिष्ठति | वाट पाहतात |
आश्रमेऽस्मिन् | या आश्रमामध्ये |
श्री सत्य साई सुप्रभातम (श्रुत्वा तवाद्भुत …)
स्पष्टीकरण :
भगवान बाबांचे जीवन चमत्कारांनी भरलेले आहे. देवाबद्दल चे आणि जगाबद्दल चे सत्य जाणून घ्यायची इच्छा असणारे लोक जगातील सर्व भागांमधून येथील दैवी उपस्थित आलेले आहेत.
दैवी शक्ती का आकर्षित करते?
हे कडवे बाबांच्या जीवनकथेचा व आपल्या बरोबरीन प्रत्यक्ष अनुभव यांचा परिचय करून घेण्याच्या साधनेचे आपल्याला स्मरण करुन देते.
माझ्या अस्तित्वाचे तेजस्वी दैवी सत्य माझ्या चैतन्यात प्रकाशू दे आणि तुमचा महिमा माझ्या स्मरणात नित्य राहू दे आणि नित्य तुमचाच राहण्याची प्रेरणा देऊ दे. आपल्यात परिवर्तन करण्यास आपली नवीन रचना करण्यासाठी व आपल्याला नवा आकार देण्यास दैवत्व आपल्याला आकर्षून घेते. अवताराच्या उपस्थितीत आपले आणखी चांगल्या व्यक्तीमध्ये रुपांतर होते. आपण आपल्या मनामध्ये स्वच्छतेची प्रक्रिया सुरु करतो. भगवानांच्या लीलांचा महिमा ऐकून आपले विचार उदात्त बनतात. श्रेष्ठ आणि दयाशील प्रेमाच्या प्रेरणादायी गोष्टी आपणाला आणखी ऐकाव्याशा वाटतात. नंतर आपण त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे काम करणारी त्यांची साधने बनतो, आपण त्यांच्या कृपेची वाट पाहतो. जसजसे आपण विचार करु लागतो तसा जीवनाचा अर्थ आपणास स्पष्ट उलगडत जातो. आपण ध्यान करु लागतो आणि भगवंताचे दर्शन मिळविण्यासाठी आपली मने शांत होतात.
जेव्हा आपण पुट्टपर्तीला जातो तेव्हा आपण दूरदूरच्या देशांमधून आलेल्या परदेशी लोकांना पाहतो. त्यामध्ये मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध इ. भक्त असतात. त्यांच्या पैकी सर्वांनी आपल्या देवाच्या – साईंच्या श्रेष्ठ लीला श्रवण केलेल्या असतात आणि त्यांच्या व्याधिमुक्त करणाऱ्या शक्ती व चैतन्य जागृत करणाऱ्या स्पर्शाबद्दल ऐकलेले असते. ते आध्यात्मिक भूमी असलेल्या भारतात, गुरुकृपेने आपली जीवने बदलून टाकण्यासाठी आलेले असतात. तेथे जात, पंथ अथवा वंशभेद नाही आणि ते सत्याच्या प्रामाणिक शोधार्थीना स्वीकारतात आणि मार्गदर्शन करतात.
या कडव्यामध्ये आपण आपल्या अस्तित्वाच्या आतंरिक विभागात – आनंदमय कोशात प्रवेश करतो. आपल्या मनामध्ये देवी कृपेचा सतत वर्षाव होत असतो.
आपल्या देवाच्या गोष्टी (लीला) आपण प्रेमाने ऐकतो. आपल्या जाणिवेची उंची वाढते आणि आपले अधिक चांगल्या माणसामध्ये रुपांतर होते. आपला देव किंवा गुरु प्रत्येकात निवास करतात असे आपल्याला वाटते.
स्वामींचे लीला :
आश्चर्यकारक रीतीने बरे करणे :
१९९० च्या बेंगलोरच्या वासंतिक वर्गात एका तरुण प्राध्यापकाने एका आश्चर्यकारक घटनेचे कथन केले. पर्ती येथे विद्यार्थी असताना एक दिवस तो ‘येशू ख्रिस्त’ या कॉलेजच्या नाटकातील भूमिकेची रंगीत तालीम करीत होता. जीझसने आश्चर्यकारक रीत्या ज्याला दृष्टी प्रदान केली अशा एका आंधळ्या मुलाचा तो अभिनय करीत होता.
ज्यावेळी तो आपले संवाद म्हणत होता त्याचवेळी स्वामी प्रेक्षागृहात रंगीत तालीम पाहण्यासाठी आले. ते आत आले आणि त्यांनी मुलाकडे पाहिले आणि ते म्हणाले, “साई आले आणि तुला तुझी दृष्टी परत मिळाली.” स्वामी काय म्हणतात याचे प्रत्येकाला आश्चर्य वाटले कारण ते नाटक येशू ख्रिस्ता बद्दलचे होते.
काही दिवसानंतर तो मुलगा पर्तीला कॉलेजच्या प्रयोगशाळेत प्रयोग करीत होता, त्याने चुकीने दोन द्रावणे एकत्र केली त्यापैकी एक सल्फ्युरीक अॅसिड होते आणि एकदम तेथे स्फोट झाला त्यामुळे तो पूर्णपणे आंधळा झाला. दुसरा एक मुलगा आवाज ऐकून तेथे आला आणि त्याने त्याचे डोळे धुण्यासाठी मदत केली. परंतु बराच उशीर झालेला होता. डॉक्टरांना बोलवण्यात आले परंतु त्यांना अत्यंत वाईट झाले असावे अशी भीती वाटली आणि त्यांना समजले की दोन्ही डोळ्यांच्या आतील नेत्रपटलांना कायमची दुखापत झाली आहे.
सायंकाळी डोळ्यांना बँडेज बांधलेल्या त्या मुलाला स्वामींनी पाहिले आणि त्याला खाण्यासाठी विभूती साक्षात करून दिली. चार दिवसानंतर बँडेज काढण्यात आले. आणि आता तो थोडे थोडे पाहू शकत होता. पंधरवड्यानंतर तो चांगल्या प्रकारे पाहू शकला आणि एका महिन्यानंतर त्याचे डोळे नेहमीप्रमाणे झाले. स्वामीनी त्या मुलाला सांगितले, “पुढच्या वेळी काळजी घे.” तो मुलगा काळजीत पडला. “काय खरोखरीच आणखी एक वेळ येणार आहे? स्वामींना सर्व कळते.”
होय त्या प्रयोगशाळेत आणखी एकदा स्फोट झाला आणि या मुलाचा एक डोळा गेला. नेत्रपटल पूर्णपणे निकामी झाले होते आणि दृष्टी पूर्णपणे गेली होती. यावेळी डॉक्टरांनी त्या मुलाला सरळ स्वामींकडेच पाठविले. स्वामींनी विभूती साक्षात केली आणि त्याच्या डोळ्यावर लावली. त्यांची करुणा अमर्याद आहे आणि यावेळी काही दिवसातच डोळा बरा झाला आणि आता मुलाला पूर्णपणे निर्दोष असे दोन डोळे आहेत.