परमेश्वराची कृपा
खूप पूर्वी पेरिसमध्ये फ्राँसिस नावाचा एक जादुगार राहत होता. त्याच्या युक्त्या जादू आणि हातचलाखीने तो लहान थोर सर्वांना खुश करायचा. आणि खेळाच्या अखेरीस लोकांनी त्या टोपीमध्ये नाणी देऊन त्याला खुश करावे म्हणून तो त्याची टोपी घेऊन एक फेरी मारायचा. दिवसा अखेरीस तो व्हर्जिन मेरीच्या चर्चमध्ये जाऊन तिने त्याच्या उदरभरणाची सोय केल्याबद्दल तिचे आदर मानायचा.
एक दिवस तो चर्चमध्ये गेला असताना, त्याने काही भिक्षूंना गुडघे टेकून मोठ्या आवाजात माऊंट मेरीची प्रार्थना करताना पाहिले. ते दृश्य पाहून तिच्या विषयीचा प्रेमभाव ओसंडून वाहू लागला. तो वरती मातेकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,” अरेरे! मला त्या प्रार्थना माहित नाहीत. हे मेरी माते, मग मी तुला कसा संतोष देऊ?”
पण लवकरच त्याच्या शुध्द अन्तःकरणाने त्याला मार्ग दाखवला. ते सर्व भिक्षु चर्चमधून बाहर पडे पर्यंत शांतपणे थांबला. जेव्हा चर्चमध्ये पूर्ण शांतता होती. तेव्हा तो हळूच आत आला. कोणी व्यत्यय आणू नये म्हणून त्याने मोठा दरवाजा बंद केला.
फ्राँसिसने त्याच्या बेगेतून, सुऱ्या, काचेच्या ताटल्या, बॉल्स, व इतर अनेक गोष्टी बाहेर काढल्या, आणि आपला खेळ सुरु केला. अधून मधून तो सारखा आनंदाने, मोठ्या आवाजात ओरडून विचारत होता,” हे जादुचे प्रयोग तुला आवडले का मेरी माते?” त्यातील एक भिक्षू चर्चच्या जवळच राहत होता. त्याच्या कानावर हे विचित्र शब्द पडले चर्चमध्ये आला. व तो धावतच चर्चमध्ये आला. मोठा दरवाजा बंद असलेला पाहुन त्याने किल्लीच्या फ़टीतून आत डोकावून पाहिले. त्या भिक्षुने काय पाहिले? फ्राँसिस खाली डोके वर पाय ह्या स्थितीत होता. दोन्ही पाय गोल फिरवून तो मोठे दोन बॉल एका मागोमाग एक अशा तऱ्हेने फेकत होता.
अत्यंत हर्षोल्हासाने तो कुमारी मेरिस विचारत होता,” हा खेळ तुला आवडला का मेरी माते?” तेवढ्यात त्यातील एक वजनदार बॉल त्याच्या पायावरून निसटला आणि त्याच्या कपाळावर जोरात आपटून खाली पडला. फ्राँसिसची शुध्द हरपली व तो जमिनीवर निचेष्ट पडला.
तो भिक्षु त्या किल्लीच्या फ़टीतून हे सर्व पाहत होता. परंतु त्याला काय करावे ते कळेना. तितक्यात त्याने आतमध्ये एक मोठा प्रकाश ज्योत पाहिला. त्या प्रकाशातून मेरी माता अवतरली. व वेदिकेच्या पायऱ्यांवरून खाली उतरली. फ्राँसिसच्या जवळ आली व गुडघ्यावर बसून तिच्या रेशमी वस्त्राच्या टोकाने त्याच्या कपाळावरचा घाम पुसला. भिक्षुने दार उघडे पर्यंत कुमारी मेरी अंतर्धान पावली होती.
शुध्द अंतःकरण असणारे भाग्यशाली असतात. कारण त्यांनी परमेश्वराची कृपा जिंकलेली असते.
प्रश्नावली
- फ्राँसिसकडून भिक्षु काय शिकला?
- शुध्द अंतःकरण म्हणजे काय ते तुमच्या शब्दात लिहा.
- जर तुम्हाला देवाला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही काय कराल?