प्रार्थना
किरण हा त्याच्या आई वडिलाचा एकुलता एक मुलगा होता. तो आज्ञाधारक होता आणि घरात व शाळेतही सद्वर्तनी होता. आपल्या मृदु आल्हाददायक वर्तनाने त्याने वडिलधाऱ्या मंडळींचे व शिक्षकाचे प्रेम संपादन केले होते.
किरण जरी केवळ दहाच वर्षाचा होता, तरी आईवडील काय करतात यावर त्याचे बारीक लक्ष होते. त्याचे वडील जिल्हा न्यायाधीश होते आणि प्रामाणिकपणा व न्याय यासाठी ख्यातनाम होते. त्याची आई देवाची परमभक्त होती आणि अतिशय दयाळू अंतःकरणाची व परोपकारी होती. किरणचे आपल्या आई वडिलांवर प्रेम होते व त्याला त्यांचा अभिमान होता. पण आपले आईवडील देवाला इतके महत्व का देतात आणि त्याची इतकी सेवा का करतात याचे त्याला नेहमी नवल वाटे, तो नेहमी आईला विचारत असे, “आई एखाद्या अडाणी गावकऱ्यासारखे दर रविवारी बाबा शिवालयात जाऊन तिथल्या सत्संगात भाग कशाला घेतात? रोज सकाळी आणि रात्री तू डोळे मिटून ध्यान करतेस, त्याने तुला काय मिळते? रोज अनेक मंत्र आणि प्रार्थना म्हणत कितीतरी वेळ तू दुर्गादेवीची पूजा करत कशाला बसतेस? तुम्हाला तुमच्या फावल्या वेळाचा विनियोग अधिक चांगल्या पद्धतीने करता येणार नाही का?
किरणची आई उत्तरादाखल केवळ स्मितहास्य करीत असे. ती मूकपणाने प्रार्थना करी, ‘आई दुर्गे, किरण अजाण आहे, पण निष्पाप आहे. त्याच्यावर कृपा कर आणि त्याला श्रद्धा आणि भक्ती दे! एके दिवशी सायंकाळी किरण शाळेतून घरी आला. तो शेजाऱ्यांनी त्याला धक्कादायक बातमी दिली, की त्याच्या वडिलांना एका भरधाव मोटारीने रस्त्यात धडक देऊन उडविले आहे. आणि ते सकाळपासून बेशुद्धावस्थेत इस्पितळात पडून आहेत.
किरण घ रातून धावत इस्पितळात जाण्यासाठी निघाला तोच आईने फुलांनी सुंदर साजविलेली दुर्गादेवीची मूर्ती त्याच्या दृष्टीस पडली. “दुर्गादेवी शक्तिस्वरूप माता आहे. जगज्जननी आहे, सर्वसामर्थ्यशाली आहे.” असे आईने वांरवार म्हटलेले त्याने ऐकले नव्हते का? अश्रुपूर्ण नयनांनी हात जोडून किरण त्या मुर्तीजवळ आला, त्याने तिची प्रार्थना केली. “हे दुर्गा मा, तुला माहिती आहे, की वडिलांशिवाय मी एक क्षणदेखील जगू शकत नाही, कृपा कर आणि त्यांचे प्राण वाचव!”
तो नमस्कार करण्यासाठी खाली वाकला आणि त्याने देवीच्या पायावरचे तांबडे फूल उचलून घेतले आणि तो दवाखान्यात गेला.
थोड्या वेळातच किरण वडिलांपाशी पोहोचला. बेशुद्ध पडलेल्या वडिलांना पाहून तो अगदी रडकुंडीला आला; परंतु जेव्हा त्याने आईकडे बघितले तेव्हा त्याची सर्व भीती व चिंता नष्ट झाली. डोळे मिटून ती प्रार्थना आणि ध्यानात निमग्न होती. तिच्या चेह्यावर शांती व विश्वास यांचे तेज विलसत होते. त्यामुळे ती फारच पवित्र दिसत होती. तो आईजवळ हळूच कुजबुजला ‘आई, दुर्गामातेच्या चरणकमलावरील हे फूल मी बाबांसाठी आणले आहे. तिने डोळे उघडल्याबरोबर त्याने ते फूल वडिलाच्या कपाळावर ठेवले. लवकरच किरणचे वडील हळूहळू शुद्धीवर येत असल्याची चिन्हे दिसू लागली. डॉक्टर आले, त्यानी किरणच्या वडिलांना तपासले आणि ते म्हणजे, “धोका टळला आहे. त्यांना देवाने वाचवले आहे.” किरणच्या आणि त्याच्या आईच्या प्रार्थनेला प्रत्युत्तर मिळाले होते.
या अनुभवातून किरणला मोठा धडा निळाला. त्याचे वडील जेव्हा महिन्याभराने इस्पितळातून घरी आले, तेव्हा आपल्या नुलानध्ये लक्षणीय बदल झालेला त्याना जाणवला, किरण त्याच्या आई बरोबर ध्यान करत होता आणि सुट्टीच्या दिवशी तिच्या पूजेमध्ये मदत करत होता. मथून मधून वडिलाबरोबर तो देवळातही जात होता. शाळेचा अभ्यास सपल्यानतर तो स्वामी विवेकानद, येशु ख्रिस्त आणि गौतम बुद्ध यासारख्या सत्पुरुषाची चरित्र वाचत होता.
श्रद्धा, भक्ती आणि प्रार्थना याच्यात रोगशांतिकर सानथ्थ्य आहे, हे किरणच्या लक्षाल आले होते. त्याच्यामुळे आपल्या हृदयात आशा, बल आणि धैर्य भरून राहते. या गोष्टी आपल्याला सन्मार्गावर आणतात आणि आपल्या अंतःकरणात शाती, समाधान व आनद भरून राहतो.
गोष्टीवर प्रश्न:
- तुमच्या स्वत:च्या शब्दात चागला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचे वर्णन करा.
- आपल्याला श्रद्धा व भक्ती कशासाठी पाहिजे?
- जर किरणला त्याची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी देवाची मदत हवी असती, तर काय झाले असते, असे तुम्हास वाटते? त्याला मन लावून अभ्यास करण्याची गरज राहिली नसती काय?