कुंभकर्णाचा मृत्यु
हे घनघोर युद्ध सहा दिवस चालले. राक्षसांचा ह्या युद्धामध्ये पराभव झाला. ह्या पराजयाने रावण अत्यंत भयभीत झाला होता. तो सहाय्यासाठी त्याचा बंधु कुंभकर्ण ह्याच्याकडे गेला. दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करून त्याने अत्यंत निंदनीय कृत्य केले आहे आणि त्यासाठी त्याने रामाकडे क्षमा मागावी असे कुंभकर्णाने त्याला सांगितले. तथापि रावणाने त्यास साफ नकार दिला. अखेरीस रावणास सहाय्य करण्यासाठी कुंभकर्ण युद्धभूमीवर गेला. अखेरीस कुंभकर्ण सुग्रीवाला बगलेमध्ये दाबून युद्धभूमीपासून दूर नेऊ लागला. कुंभकर्णाने विचार केला की जर राजाला युद्धभूमीच्या बाहेर नेले की वानर सेनेवर विजय मिळवल्यासारखेच होईल. तथापि त्याच्या बगलेत दाबलेला सुग्रीव त्याच्या तावडीतून सुटला व पुन्हा शौर्याने लढू लागला. वानरसेना मात्र भयभीत झाली होती आणि अनेकांनी प्राण गमावले. त्यानंतर रामाने लक्ष्मणास सांगितले की आता त्याने (रामाने) युद्धक्षेत्रावर प्रवेश करण्याची वेळ आली आहे. व त्याला त्याचा अक्षय्यभाता’आणण्यास सांगितले. कोदंड हाती घेऊन सुसज्ज झालेला राम युद्धभूमीवर निघाला. रामाच्या बाणांचा मारा राक्षसांना असह्य झाला आणि ते पळून गेले. कुंभकर्णाने निकराने लढा दिला परंतु अखेरीस रामाच्या हातून त्याला मृत्यु आला. त्याच्या देहामधून दिव्य तेज बाहेर पडून रामामध्ये विलीन झाले.
गुरुंनी मुलांना सांगावे की आपण कोणत्याही अन्यायकारक वा अयोग्य कृतीमध्ये आनंद मानणाऱ्यांना कधीही सहाय्य करू नये. मग ते आपले अगदी जिवलग मित्र असले तरीही. तुम्ही त्यांना चुकीच्या मार्गावरून वाटचाल करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. आणि जर त्यांना सुमार्गावर आणण्यासाठी त्यांचे मन वळवणे तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. याउलट जर तुम्ही अशा लोकांबरोबर राहिलात तर त्यांच्याबरोबर तुमचे जीवनही उध्वस्त होईल.
गुरुंनी खालील अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत.
जीवनाचे ABC – Avoid bad company (दुर्जनांची संगत टाळा) आणि Always Be Careful सदैव सतर्क राहा./ तुमचे शब्द ,कृती ,विचार, चारित्र्य आणि अंतःकरण ह्यांचे अवलोकन करा.
[
गुरुंनी मुलांना जय विजय ह्यांची कथा सांगावी. ते महाविष्णुंचे द्वारपाल आहेत व त्यांनी त्यांचे कुकर्म फेडण्यासाठी त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण ह्यांच्या रुपात जन्म घेतला. आणि म्हणूनच कुंभकर्णास रामाच्या (विष्णुंचा अवतार) हातून मृत्यु आला. व तो त्यांच्यामध्ये विलीन झाला. जय विजयना तीन युगांमध्ये तीन जन्म घेण्याचा जो शाप मिळाला होता त्याविषयी गुरुंनी वेदानुद्दरते हा श्लोक शिकवताना त्यांना अधिक माहिती द्यावी.